Sunday, August 14, 2022

कॉंग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना जीभ घसरली ; ब्राह्मण समाजावर केली टीका...

वेध माझा ऑनलाइन -  कॉंग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांची भाजप नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना जीभ घसरली. ब्राह्मण समाजावर टीका करताना शिवराळ भाषा वापरली.

काँग्रेसच्या आझादी गौरव यात्रेनिमित भद्रावती येथे शनिवारी झालेल्या कार्यक्रमात खासदार बाळू धानोरकर बोलत होते. वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून केंद्रातील भाजप सरकारवर टीका करतांना धानोरकर यांनी त्यांचा मोर्चा राज्यातील सत्ताधाऱ्यांकडे वळवला.ते म्हणाले, राज्याच्या मंत्री मंडळात भ्रष्टाचारी, नालायक लोकांचा समावेश आहे.

मंत्री भ्रष्टचारी असले तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना क्लीन चीट दिली आहे. त्यांना मानावे लागले. जन्माला यायचं असेल तर ब्राह्मणांच्याच पोटी याव. आज ब्राम्हणांची पोर खारिक बदाम खात आहेत आणि बहुजनांची मुलं जांभया देत आहेत,असे ते म्हणाले.


No comments:

Post a Comment