वेध माझा ऑनलाइन - कराड शहरात समाविष्ठ झालेला सुर्यवंशी मळा बर्गे वस्ती शिंदे वस्ती वडार वस्ती हुसेन मोहल्ला या भागातील रस्ता पावसामुळे खूपच खराब झाला आहे याबाबत प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पवार यांनी तो रस्ता स्वखर्चाने दुरुस्त करण्याचे काम हाती घेऊन शहरासमोर एक आदर्श निर्माण केला आहे
एखाद्या वार्डातील काम वारंवार तक्रार करूनही प्रशासन करत नसेल किंवा त्या कामाला... आज या...उद्या या...असे म्हणत... उशीर करत असेल तर त्या भागातील लोक अक्षरशः पालिकेत हेलपाटे मारून हतबल झाल्याचे आपण अनेकदा पाहीले आहे...मग त्याच वार्डातील एखादा दानशूर तिथंल्या लोकांच्या पाठीशी उभा राहतो... आणि ती समस्या स्वखर्चाने सोडवतो... अशीच काहिशिं परिस्थिती शहरातील सूर्यवंशी मळा याठिकाणी सध्या पहायला मिळत आहे...
त्याठिकाचा रस्ता झालेल्या पावसामुळे खूपच खराब झाला असल्याने तेथील लोकांची मोठी गैरसोय होत आहे गाड्या घसरून अपघात होणे लहान मुले वृद्ध लोकांना त्या रस्त्यावरून जाताना कसरत करून जावें लागणे अशा अनेक घटना तिथे होत आहेत... तेथील लोक पालिका प्रशासनाकडे याबाबत तक्रार घेऊन गेले तर प्रशासनाने त्याबाबतची कसलीच दखल घेतली नाही अशा तक्रारी तेथील लोक बोलून दाखवु लागले आहेत...तेथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पवार यांना ही बाब लक्षात आली तेव्हा त्यांनी त्या रस्त्याबाबत आपण स्वतः स्वखर्चाने काम करून घ्यायचा निर्णय घेतला व तेथील रस्त्याचे काम सुरू केले... त्या ठिकाणी एकूण 3 ते 4 हजार लोकवस्ती आहे, शेकडो कुटुंब आहेत... या सर्वांना त्या खराब रस्त्याचा त्रास होणार नाही यासाठी आता प्रवीण पवार सरसावले आहेत... त्या ठिकाणी ड्रेनेज लाईनची खुदाई करून ठेवली होती... त्यामुळे त्याठिकाणी पावसाने मोठया प्रमाणात चिखल झाला आहे... त्या रस्त्याचे डांबरीकरणदेखील काही वर्षांपूर्वी आणि एकदाच झाल्याचे बोलले जात आहे... अशा प्रकारची अवस्था असलेल्या त्या परिसरातील लोकांना आता प्रवीण पवार यांच्या प्रयत्नामुळे पुन्हा सर्व नागरी सुविधा त्याठिकाणी नक्की मिळतील अशी आशा आता वाटू लागली आहे...
No comments:
Post a Comment