Wednesday, August 17, 2022

लवकरच कराडात मातोश्री ग्रुपच्या वतीने "रोटी बँक' सुरु करणार: मातोश्री ग्रुपचे अध्यक्ष नवाज सुतार यांची माहिती ...

वेध माझा ऑनलाइन -कराड  शहरात अनेक गरीब, निराधार लोक आहेत, ज्यांना अन्न न मिळाल्याने उपाशीपोटी झोपावे लागते... एक वेळचे जेवणही त्यांना मिळणे कठीण झाले आहे. यापुढे या लोकांनी उपाशीपोटी झोपू नये, यासाठी 75 व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मातोश्री ग्रुप चे सर्वेसर्वा नवाज सुतार (बाबा) यांनी ‘मातोश्री रोटी बँक’ सुरू करण्याचे ठरवले आहे. येथे अन्नदात्यानी दररोज दोन पोळ्या व भाजी आणून दिल्यास, गरजू, गरीब, हातावर पोट असणारे सर्वसामान्य आपली भूक भागवू शकतात, असा मानस नवाज सुतार यांनी निवेदनाद्वारे व्यक्त केला आहे

अनेकांकडे रोज अन्न शिल्लक राहते. यातील काही नागरिक आपल्याकडे शिल्लक राहिलेले चांगले अन्न या बँकेत आणून दिल्यास हेच अन्न गरीब, निराधारांना वाटप करून गरजुंची भूक भागू शकते. यासाठी संस्थेच्या वतीने अन्नदात्यांची नावनोंदणी केली जाणार आहे, नावनोंदणी केल्यावर आपण आपल्याकडून तांदूळ गहू तेल अशा प्रकारे सामान त्यांच्याकडून स्वीकारले जाईल. या उपक्रमाला चांगला प्रतिसादही मिळेल, लग्नात शिल्लक राहिलेले अन्न नेण्याची व्यवस्था सुध्दा केली जाईल. लग्न, समारंभात मोठ्या प्रमाणात अन्न शिल्लक राहते; अशांनी जर आमच्या सेंटरशी संपर्क साधला तर आम्ही आमचे लोक व गाडी ते अन्न नेण्यासाठी लग्नस्थळी पाठवू व रोटी बँकेच्या माध्यमातून गरजू, गरिबांना ते अन्न वाटप करू कराड मधील दानशूर लोकांनी या उपक्रमासाठी जास्तीत जास्त मदत करावी असे आवाहन मातोश्री ग्रुपचे अध्यक्ष नवाज सुतार यांनी केले आहे

No comments:

Post a Comment