वेध माझा ऑनलाइन - 26/11 रोजी मुंबईत झालेला दहशतवादी हल्ला महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. या दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप लोकांनी आपले जीव गमावले होते. अशातच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. 26/11 सारखाच हल्ला पुन्हा करण्याची धमकी पाकिस्तानमधून देण्यात आली आहे. 26/11 सारखा दहशतवादी हल्ला करण्याची धमकी मुंबई ट्राफिक पोलिसांना देण्यात आली आहे.
ट्राफिक पोलिसांच्या कंट्रोल रुममधील व्हॉट्सअॅप नंबरवर धमकीचा मेसेज आला आहे. या मेसेजमध्ये ६ दहशतवादी भारतात पोहोचल्याचा दावा केला गेला आहे. तसंच लवकरच मुंबईत २६/११ सारखा हल्ला करण्याची धमकी यात दिली गेली आहे. या मेसेजनंतर एकच खळबळ उडाली असून मुंबई पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला आहे
No comments:
Post a Comment