Friday, August 26, 2022

आझाद यांच्या राजीनाम्यावरून माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचा काँग्रेसला घरचा आहेर ; काय म्हणाले, ..? वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय स्तरातून प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. आझाद यांनी पक्ष सोडणं दुर्दैवी आहे. पक्षाने आत्मपरीक्षण करावं, असं म्हणत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. तसेच पृथ्वीराज चव्हाण यांनी अध्यक्ष पदावरुन काँग्रेस अध्यक्षांवर निशाणा साधला पक्षाचा अध्यक्ष कळसूत्री बाहुली नसावा. या पदावरील व्यक्ती सर्वसामान्य असावी अशी अपेक्षा व्यक्त करताना पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस अध्यक्षांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक नेत्यांनी आझाद यांच्या राजीनाम्यावरुन काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

 दरम्यान, राजीनाम्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये स्वत:चा राजकीय पक्ष काढणार असल्याचं आझाद यांनी जाहीर केलं आहे. याबाबतचं वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. 16 ऑगस्ट आझाद यांनी जम्मू काश्मीर काँग्रेस प्रचार समितीच्या प्रमुखपदाचा राजीनामा देत आपल्या नाराजीचे संकेत दिले होते. त्यानंतर त्यांनी प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देत आझाद यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पत्र लिहून आझाद यांनी नाराजी व्यक्ती केली आहे.
या पत्रात खासदार राहुल गांधीवर आझाद यांनी गंभीर आरोप केले आहेत.
राहुल गांधींमध्ये अपरिपक्वता असून त्यांनी पक्षातील सल्लागार यंत्रणा उद्धवस्त केल्याचा आरोप आझाद यांनी केला आहे.
राहुल गांधींनी प्रसारमाध्यमांसमोर सरकारी अध्यादेश फाडला हे त्यांच्या
अपरिपक्वतेचं उदाहरण असल्याचा हल्लाबोल आझाद यांनी या पत्रात केला आहे.

 


No comments:

Post a Comment