वेध माझा ऑनलाइन - न्यायालयाच्या नियमांचे पालन करून सार्वजनिक गणेश मंडळांनी नियमावली बाबत माहिती घेवूनच गणेशोत्सव साजरा करायचा आहे अन्यथा पोलिसांची कारवाई होणार असल्याचा इशारा वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी आज शहरातील
गणेशोत्सव मंडळांच्या आयोजित बैठकीत दिला.
गणेशोत्सव काळात कायदा, सुवव्यवस्था राखून पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा असेही आवाहन यावेळी पो नि पाटील यांनी केले
आज अरबन बँक शताब्दी हॉल येथे शहरातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्याधिकारी रमाकांत डाके, डीवायएसपी डाॅ. रणजित पाटील यांच्यासह गणेश मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment