काही दिवसावरच येथील पालिकेची निवडणूक येऊन ठेपली आहे त्यानिमित्ताने सर्वच राजकीय पार्ट्यानी आपापल्या परीने काल 15 ऑगस्टच्या निमित्ताने रॅली काढून लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला येथील काँग्रेसची रॅलीदेखील काल खूपच चर्चेत राहिली त्यांमधून हजारोंच्या संख्येने असणाऱ्या उपस्थितीची चर्चादेखील शहरात झाली काही दिवसांपूर्वी झालेल्या शिवजयंती रॅलीची आठवणदेखील याचनिमित्ताने लोकांमध्ये काल जागी झाली
काहो दिवसांपूर्वी झालेल्या शहरातील शिवजयंतीला येथील हिंदू एकता आंदोलन व भाजप च्या वतीने शहरातुन मोठ्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते संपुर्ण पश्चिम महाराष्ट्रात या रॅलीविषयी चर्चा झाली त्यामध्ये हजारोंच्या संख्येने असणारी उपस्थिती आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी या रॅलीला मुंबईहून येऊन बराच काळ लावलेली खास हजेरीदेखील त्यावेळी चर्चेत होती त्यानंतर शहरात भाजपची ताकद वाढल्याचे बोलले जाऊ लागले होते याचा फायदा भाजपला होणार असेही कार्यकर्ते बोलत होते तोच काल काँग्रेसने तेवढ्याच ताकदीची रॅली काढुन शक्तिप्रदर्शन करत आपलीही ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे आणि या रॅलीची चर्चाही सध्या जोरदार शहरात सुरू आहे... त्याचेही एक कारण आहे...
येथील पालिका निवडणूक कदाचित ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस होईल असे समजते त्याच पार्श्वभूमीवर या दोन्ही राजकीय पक्षाची भूमिका व तयारी कितपत आहे हे या दोन्ही राजकिय पक्षांना जनतेच्या मिळणार्या प्रतिसादावरून या रॅल्यांच्या माध्यमातून बऱ्यापैकी शहराला समजून आले आहे विशेष म्हणजे मुस्लिम बांधवांची प्रचंड व एकगठ्ठा उपस्थिती हे काँग्रेसच्या कालच्या रॅलीचे वैशिष्ठ्य ठरले काँग्रेस व भाजप या दोन्ही राजकीय पक्षाच्या वेगवेगळ्या निमित्ताने निघालेल्या रॅली ने लोकांची निवडणुकीकरिता असणारी मानसिकता जवळजवळ स्पष्ट झालेली दिसली आहे अशी त्या-त्या पार्टीचे लोक करताना दिसत आहेत तरी अजून या निवडणुकीसाठी बरेच पाणी डोक्यावरून जायचे बाकी आहे तरी कराडमधील लोकांचा पक्षचिन्हं घेऊन लढणाऱ्या पक्षांकडे अधिक गर्दी करण्याकडे सहजपणे कल दिसतोय असे प्राथमिकरित्या जाणवले आहे मग, पक्षचिन्हवर ही पालिका निवडणूक झाल्यास भाजप विरुद्ध काँग्रेस अशी यावेळी प्रमुख लढत होईल का?असा प्रश्न यामुळेच आता अनेक जाणकाराना देखील पडला आहे आघाड्यांच्या राजकारणाला जनता वैतागली आहे असे लोकांच्या विविध प्रतिक्रियेतून शहरातून समजत असतानाच काही पार्ट्यांमधील कार्यकर्ते आपला व्यक्तिगत स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून निवडणूक आघाडी च्या माध्यमातून व्हावी असे बोलत असल्याचे बऱ्याच ठिकाणी दिसतंय अशीही चर्चा आहे
एकूणच भाजप व काँग्रेसची रॅली व त्याना मिळणारा वेगवेगळ्या समाजातील समर्थकांचा मिळणारा प्रतिसाद यावरून जनतेला सध्याची पालिका निवडणूक पक्षचिन्हावर व्हावी याकडे कल मोठ्या प्रमाणात दिसतोय असच आतातरी दिसतंय जनतेचा प्रतिसादही मोठा मिळतोय असेही रॅलीत होणाऱ्या गर्दीवरूनही दिसतंय... बघूया पुढे काय होतय ते...पण असे झाल्यास यापुढे आघाड्यांचे राजकारण शहरात मागे पडेल का? असा प्रश्न देखील जाणकारासमोर सध्या याचनिमिताने उभा आहे!
No comments:
Post a Comment