Tuesday, January 31, 2023

पाकिस्तानमधील पेशावरमध्ये मशिदीत आत्मघाती हल्ला ; 100 जणांचा मृत्यू ;

वेध माझा ऑनलाईन - पाकिस्तानमधील पेशावरमध्ये सोमवारी मशिदीमध्ये तालिबानी दहशतवाद्याने आत्मघाती हल्ला घडवला होता. या हल्ल्यातील मृताची संख्या 100 वर पोहचली आहे. तर जखमींची संख्या 150 पेक्षा जास्त आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, मृताची संख्या आणखी वाढू शकते. सोमवारी दुपारच्या वेळी मशिदीमध्ये लोक नमाज अदा करत होते, त्यावेळी दहशतवाद्याने स्वत:ला बॉम्बने उडवले. यावेळी मशिदीमध्ये 400 ते  500 जण उपस्थित होते. मृत आणि जखमींमध्ये पोलिसांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. 

पेशावरमधील कडेकोट सुरक्षाव्यवस्था असलेल्या पोलीस वसाहत परिसरातील मशिदीत दहशतवाद्यानं बॉम्बस्फोट केला.  सोमवारी नमाजासाठी 400 पेक्षा जास्त नागरिक जमले होते, त्यावेळीच तालिबानी आत्मघाती हल्लेखोराने हा बॉम्बस्फोट घडवला, अशी माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली. मशिदीत पोलीस, सैनिक आणि बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाचे कर्मचारी दुपारचा नमाज अदा करत होते. यावेळी पुढच्या रांगेतील आत्मघाती हल्लेखोराने बॉम्बस्फोट घडवला, असेही तेथील सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले. या हल्ल्यात आतापर्यंत 100 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 150 पेक्षा जास्त जण जखमी आहेत. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, मशिदीमध्ये स्वत:ला बॉम्बने उडवून घेणाऱ्या हल्लेखोराचं शीर मिळालं आहे. 

या हल्ल्याची अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेनं जबाबदारी घेतलेली नाही. पण या हल्ल्यामागे तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान हा गट असल्याचा  अंदाज आहे. टीटीपी ने 2009 मध्ये लष्कराच्या मुख्यालयावर हल्ला केला होता. तर 2008 मध्ये इस्लामाबादमधील मॅरियट हॉटेलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटासह इतर हल्ल्यांमागे हाच गट होता. 2014 मध्येही याच गटाने पेशावर शहरातील सैनिकी शाळेवर हल्ला केला होता. या बॉम्बस्फोटात 131 निराधार विद्यार्थ्यांसह 150 जणांचा मृत्यू झाला होता.  

सोमवारी झालेल्या बॉम्बस्फोटात मशिदीचा एक भाग कोसळला होता. त्यामुळे ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती आहे. सुरक्षेमध्ये अक्षम्य चूक झाल्याची कबुली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. पेशावर पोलीस अधिकारी मोहम्मद एजाज खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आणि बचाव पथकाकडून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध सुरू आहे. मशिदीमध्ये सध्या बचावकार्य सुरू आहे. त्याशिवाय जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

शिंदे सरकारचा मोठा निर्णय! महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम वाढवली, पुरस्कारचं स्वरुपही बदललं; महाराष्ट्र भूषण हा महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा सर्वात मोठा पुरस्कार

वेध माझा ऑनलाईन - महाराष्ट्र शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सन्मानदर्शक महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम दहा लाखांवरून 25 लाख रुपये करण्यात आली आहे. याबाबतचा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. तसेच हा पुरस्कार नव्या स्वरुपात, आणखी दिमाखदार ठरावा यासाठी प्रय़त्न व्हावेत, असा निर्णय घेण्यात आला.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या अनुषंगाने बैठक झाली. या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे तसेच पुरस्कार समितीचे सदस्य ज्येष्ठ शास्त्रज्ज्ञ डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ विधीज्ज्ञ अँड. उज्ज्वल निकम, प्रा. शशिकला वंजारी, ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत आदी दृकश्राव्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
बैठकीत पुरस्काराच्या स्वरुपाबाबत तपशीलवार चर्चा झाली. पुरस्कारासाठी सुमारे 27 नावांचा प्रस्ताव सरकारकडे आला होती, त्याबाबतही चर्चा झाली. काहींनी आणखी नवी नावेही सुचविली. त्यांचाही नव्याने विचार करण्याच ठरले. तसेच पुरस्कारच्या रक्कमेत भरीव वाढ करण्याच्या सूचनेवरही चर्चा झाली. आतापर्यंत पुरस्कारात 10 लाख रुपये देण्यात येत होते. या पुरस्काराच्या रक्कमेत वाढ करून ती 25 लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हा पुरस्कार आणखी दिमाखदार ठरावा, यासाठी नव्या स्वरुपातील नियमावली निश्चित करण्यात यावी असेही ठरले. महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा सर्वात मोठा पुरस्कार आहे. महाराष्ट्रात अनेक कर्तबगार व्यक्तिमत्व आहेत. अनेकांनी विविध क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. अशा अनेक व्यक्तिमत्वांच्या या पुरस्कारासाठी विचार व्हावा. याकरिता सर्वंकष अशी नियमावली करण्याचे निर्देश देण्यात आले.





पूर्वीप्रमाणे पाणी बिले घ्या, किंवा 24 तासाचे पैसे घेता मग,24 तास पाणी द्या ; कराडकराना वेठीस धरू नका; दक्ष कराडकर प्रमोद पाटील यांची मागणी ;

वेध माझा ऑनलाइन - कराडमधील पाणी प्रश्न पेटला असताना येथील सामाजिक कार्यकर्ते दक्ष कराडकर ग्रुपचे प्रमोद पाटील यांनी याबाबत आपले मत मांडताना सांगितले की कराड पालिकेने आणलेली पाणी मीटर्स ही साध्या पद्धतीची अंदाजे अडीच हजाराची आहेत तर त्याच्या तुलनेत मलकापूरचे हेच मीटर 12 हजाराचे आहे त्यामुळे त्याच्या काम करण्याच्या परफॉर्मन्स मधील दर्जात फरक आढळणाऱ हे नक्की आहे शहरातील लोकांना उगीचच वेठीस धरले जात आहे याबाबत मुख्याधिकारी डाके यांच्याशी बोलताना प्रमोद पाटील म्हणाले जर 24 तास योजना चालू नाही तर 24 तास योजनेचे पैसे जनतेकडून  का घेताय ? त्यावर सी ओ म्हणाले... नागरिकांना शिस्त व याची सवय लागावी म्हणून आपण याची शहरात अशी सुरुवात करत आहोत त्यावर प्रमोद पाटील म्हणाले नागरिकांना शिस्त लावण्यासाठी तुम्ही अशी शक्कल लढवता तर... प्रभात टॉकीज ते गुजर हॉस्पिटल हा रस्ता... तसेच सोमवार पेठेतील भैरोबा मंदिर शेजारील कुंभार पांणवठ्यावरील रस्ता... केवळ 6 महिन्यातच खराब झाला... अशा रस्ता करणार्यां कॉन्ट्रॅक्टरना कराडात शिस्त लावायची गरज असताना... तुम्ही नागरिकांना शिस्त लावण्यासाठी त्यांच्याकडून पाणी बिलाचे भरमसाठ पैसे घेता हा कुठला न्याय? यावर सी ओ निरुत्तर झाले...

मिटर्समध्ये दोष असल्याने काही ठिकाणी पाणी बिल अधिक येतंय तर काही ठिकाणी कमी येतंय 15 टक्के,30 टक्के 50 टक्के अशी सवलत देण्यापेक्षा शहरात पूर्वीप्रमाणे पाणीबिल दिली पाहिजेत अन्यथा 24 तास पाण्याच्या योजनेचे पैसे घेता मग 24 तास पाणीच दिले पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली दरम्यान ही योजना सुमार दर्जाची असल्याची शंका असल्याने ही योजना फेल जाईल अशी शक्यताही प्रमोद पाटील यांनी व्यक्त करत आपले परखड मत मांडले

दरम्यान कराड शहरात पालिकेने मीटर प्रमाणे पाणी बिल आकारणी सुरू केली यामध्ये बिलाची रक्कम मोठी आल्याने कराडच्या लोकशाही आघाडीने पाणी बिलात नागरिकांना 20 टक्के सूट द्यावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर काँग्रेसने तसेच बाळासाहेबांची शिवसेनेचे शहर अध्यक्ष राजेंद्र माने यांनी सी ओ डाके यांची भेट घेऊन 30 टक्के सवलतीची मागणी केली आहे तसेच यशवन्त विकास आघाडीने 50 टक्के सवलत देण्याची मागणी केली आहे  त्यामुळे सी ओ डाके यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की मी कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही केवळ आश्वासन दिले आहे किती सवलत कराडकराना मिळणार याचा अंतिम निर्णय 6 फेब्रुवारीला सर्व पक्षीय नेत्यांना बोलावून त्यांच्यासमोरच घेण्यात येईल त्यामुळे 15 टक्केचा घेतलेला निर्णय स्थगित करण्यात आला आहे असेही डाके म्हणाले

आसाराम बापूना जन्मठेप ; गांधीनगर कोर्टानं सुनावली शिक्षा

वेध माझा ऑनलाईन - आताची सर्वात मोठी बातमी आहे. स्वयंघोषित धर्मगुरू आसाराम बापू यांना गांधीनगर कोर्टाने मोठा दणका दिला आहे. आसाराम बापू हे 2013 मधील एका बलात्काराच्या प्रकरणात दोषी आढळले आहेत. आसाराम बापूना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गांधीनगर कोर्टानं ही शिक्षा सुनावली आहे.

काय आहे आसाराम बापू प्रकरण ?
आसाराम बापू यांच्यावर उत्तर प्रदेशच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. ही मुलगी मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे आसारामच्या आश्रमात शिकत होती. या मुलीच्या आरोपानुसार, आसारामने तिला जोधपूरजवळच्या आश्रमात बोलावलं होतं. आणि ऑगस्ट 15, 2013 ला तिच्यावर बलात्कार करण्यात आला.

आसाराम बापू यांच्या खटल्याचा घटनाक्रम
20 ऑगस्ट 2013ला आसाराम बापूनी 15 ऑगस्ट रोजी एका मुलीचं लैंगिक शोषण केल्याची तक्रार दिल्लीत दाखल करण्यात आली नंतर हा खटला जोधपूर कोर्टाकडे सोपण्यात आला.
23 ऑगस्ट 2013ला आसाराम बापू विरोधात गुन्हा दाखल झाला. 
28 ऑगस्ट 2013ला पीडित मुलीच्या वडिलांनी आसाराम बापुना फाशी देण्याची मागणी केली. तर दुसरीकडे मुलगी मनोरूग्ण असल्याचा दावा आसाराम बापू यांनी केला.
 29 ऑगस्ट 2013ला काँग्रेस नेते मुद्दाम त्यांना लक्ष्य करून असले आरोप करत आहेत असा अप्रत्यक्ष आरोप आसाराम बापूनी केला.
 31 ऑगस्ट 2013 ला त्यांना जोधपूर पोलिसांनी अटक केली, त्यांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली. 
नोव्हेंबर 2013ला जोधपूर पोलिसांनी बापू विरोधात आरोपपत्र दाखल केलं. आसाराम बापू आणि चार लोकांवर बलात्काराचे आरोप करण्यात आले.
 फेब्रुवारी 2014ला आसाराम बापू विरोधात कोर्टात सुनावणीला सुरूवात झाली.
ज्येष्ठ कायदेतज्ञ राम जेठमलानी यांनी आसाराम बापू यांचं वकीलपत्र घेतलं होतं.
आसाराम बापूंना वेगळाच आजार आहे ज्यामुळे ते महिला त्याच्याकडे आकर्षित होतात असा अजब युक्तिवाद कोर्टात करण्यात आला.
 फेब्रुवारी 2015ला आसाराम बापू केसमधील एक साक्षीदार राहूल सचान जेव्हा आपलं स्टेटमेंट द्यायला कोर्टात चालला होता तेव्हा त्याच्यावर हल्ला करण्यात आला.
8 जुलै 2015ला दुसऱ्या एक साक्षीदार सुधा पाठक साक्षी देण्यावरून मागे फिरल्या आणि त्यांनी कोर्टात सांगितलं की आम्हाला आसाराम बापूबद्दल काहीच माहिती नाही.
12 जुलै 2015रोजी क्रिपालसिंग या साक्षीदारची हत्या शहाजहानपूरमध्ये करण्यात आली.
7 एप्रिल 2018रोजी जोधपूर कोर्टात दोन्ही पक्षांचे युक्तीवाद संपले. आणि आज 25 एप्रिल रोजी त्याच्या शिक्षेवर कोर्टात सुनावणी झाली.

Monday, January 30, 2023

यापुढे सातारा जिल्ह्याला अधिक ताकद देणार ; शिवसेनेबरोबर युती?... अशक्य ; अमित ठाकरे यांनी केले स्पष्ट

वेध माझा ऑनलाइन - यापुढे सातारा जिल्ह्यात माझे दौरे वारंवार होतील राजसाहेब इकडे येणारच आहेत या भागाला अधिक ताकद देऊ असे आश्वासन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी काल कऱ्हाड (जि. सातारा) येथे दिले  दरम्यान शिवसेना मनसे एकत्र येणार नाही. मुंबई महापालिकेत आमची कोणासोबत युती होईल का नाही हे माहित नाही. मात्र, मनसेनं स्वबळावर निवडणुकीसाठी तयारी केली आहे, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.शिवसेना व मनसे एकत्र येणार का? असा प्रश्न वारंवार विचारला जातो. मात्र, त्यामध्ये सत्य नाही आणि ते शक्यही नाही, असंही त्यांनी यावेळी सांगून टाकले

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी ठाकरे  कऱ्हाड दौऱ्यावर होते. त्यादरम्यान विद्यानगर परिसरातील मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या शाखेचं उद्घाटन झालं. नंतर त्यांनी पत्रकारांशी गप्पा मारल्या. मनसेचे जिल्हाध्यक्ष अॅड. विकास पवार, धैर्यशील पाटील, उपजिल्हाध्यक्ष महेश जगताप, राजेंद्र केंजळे, शहराध्यक्ष सागर बर्गे, तालुकाध्यक्ष दादा शिंगण, नितीन महाडिक आदी उपस्थित होते. 

ठाकरे म्हणाले, राजसाहेब ठाकरे यांच्या एवढा महाराष्ट्र फिरलेला नेता मी पाहिलेला नाही. 
राजसाहेबांनी सांगितलं तर राजकारणात नक्की येईन. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दोघंही चांगलं काम करत आहेत. परंतु, राजसाहेब ठाकरे यांच्याकडं सत्ता दिल्यानंतर अधिक चांगलं काम होईल महापुरुषांची बदनामी करायची आणि विषय बदलायचा, असं सध्या राज्यात सुरु आहे हे मीडियावाल्यांनी दाखवणंच बंदच केलं पाहिजे, असही ठाकरे म्हणाले

कराडचे शिंदे गटाचे नेते राजेंद्र यादव यांची डायरेक्ट मुख्याधिकारी डाके यांच्या केबिनमध्ये एन्ट्री ; पाणी प्रश्नी झाले आक्रमक ; म्हणाले... 50 टक्के सवलत कराडकराना मिळालीच पाहिजे ...डाके म्हणाले...15 टक्के घेतलेला सवलतीचा निर्णय स्थगित...

वेध माझा ऑनलाईन - कराडचे पाणी पेटले आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे लोकशाही आघाडीने केलेली 15 टक्के सवलतीची मागणी किंवा काँग्रेसची 30 टक्क्यांची पाणी बिलावर मागितलेली सवलत आम्हाला बिलकुल मान्य नाही आमची मागणी 50 टक्के सवलत द्या अशी आहे लवकरात लवकर यावर मुख्याधिकारी निर्णय घेतील अशी अशा आहे नाहीतर आम्ही शहरात आंदोलन उभारू तसेच शासन स्तरावर याबाबत दाद मागून प्रशासनाने केलेला याबाबतचा ठराव रद्द करून आणू कराड वासीयांवर अन्याय होऊ देणार नाही असा इशारा येथील यशवंत आघाडीचे आणि शिंदे गटाचे नेते राजेंद्रसिह यादव यांनी आज कराड पालिकेचे मुख्याधिकारी डाके याना दिला शहरात 50 टक्के पाणी बिलात कपात झालीच पाहिजे असेही डाके याना त्यांनी खडसावून सांगितले
दरम्यान संध्याकाळच्या सुमारास राजेंद्र यादव पालिकेत आले डायरेक्ट सी ओ यांच्या केबिन मध्ये एन्ट्री करत त्यांनी डाके याना लोकशाही आघाडीच्या 15 टक्क सवलतीच्या मागणीवर  सवाल करत त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्तीच केली आणि याबाबत त्यांना जाबही विचारला

राजेंद्र यादव म्हणाले कराडचे प्रशासन म्हणून काम करणाऱ्या पालिकेचे सी ओ डाके हे खरतर स्वतः याठिकाणी प्रशासक आहेत त्यांनीच हा प्रश्न सोडवायला हवा याठिकाणी राजकीय आखाडा करून सर्व पक्ष समोरासमोर आणून याना काय साध्य करायचे आहे हे त्यांनी स्पष्ट करावे पाण्यासाठी तुम्ही गावं पेटवताय का? असा खडा सवालही यादव यांनी यावेळी केला आमची मागणी 50 टक्याची सवलत कराडकराना मिळाली पाहिजे अशीच आहे परस्पर 15 टक्याचा घेतलेला निर्णय आम्हाला मान्य नाही त्यामुळे त्याबाबत योग्य तो आपण निर्णय घ्याल अशी अशा बाळगतो अन्यथा शासन स्तरावर याबाबतचा प्रशासनाने केलेला ठराव रद्द करून आणू असे ठणकावून सांगत राजेंद्र यादव  मुख्याधिकारी डाके यांच्या केबीन मधून बाहेर पडले 

दरम्यान येत्या 6 फेब्रुवारीला सर्व पक्षीय नेत्यांना एकत्र बोलावून याविषयी योग्य तोडगा काढू अशी भूमिका सी ओ डाके यांनी घेत 15 टक्के सवलतीचा निर्णय स्थगित केल्याचे जाहीर केले

कराडकरांना पाणी बिलात सवलत मिळणार नक्की!..पण... 15 टक्के की...30 टक्के ... याबाबत निर्णय होणार 6 फेब्रुवारीला ...मुख्याधिकारी डाके यांचे स्पष्टीकरण...

वेध माझा ऑनलाईन - कराड शहरात पालिकेने मीटर प्रमाणे पाणी बिल आकारणी सुरू केली. यामध्ये बिलाची रक्कम मोठी आल्याने कराडच्या लोकशाही आघाडीने पाणी बिलात नागरिकांना 20 टक्के सूट द्यावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर काँग्रेसने तसेच बाळासाहेबांची शिवसेनेचे शहर अध्यक्ष माने यांनी सी ओ डाके यांची भेट घेऊन 30 टक्के सवलतीची मागणी केली आहे त्यामुळे सी ओ डाके यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की मी कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही केवळ आश्वासन दिले आहे मात्र 15 टक्के... का 30 टक्के... सवलत कराडकराना मिळणार याचा अंतिम निर्णय 6 फेब्रुवारीला सर्व पक्षीय नेत्यांना बोलावून त्यांच्यासमोरच घेण्यात येईल त्यामुळे 15 टक्के निर्णय स्थगित करण्यात आला आहे असेही डाके म्हणाले

कराड नगरपालिकेकडून 2007 सालापासून ही पाणी योजना अद्याप रखडली गेली आहे गेल्या वर्षभरापासून ही योजना अमंलात आणण्यासाठी दिवसातून दोन वेळा मीटरप्रमाणे बिल आकारणी करण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये अनेक नागरिकांना पाणीबिल दुप्पट, चाैप्पट आली होते. त्यानंतर शहरातील सामाजिक संघटना, काॅंग्रेस, राष्ट्रवादी तसेच बाळासाहेबांची शिवसेना यांनी निवदेन दिली. तसेच आंदोलनासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला होता. यावर आज पालिकेने चर्चेचे निमंत्रण दिले होते. या प्रश्नावर लोकशाही आघाडीने 20 टक्के पाणी बिलात सूट देण्याची मागणी केली. तर काँग्रेस व बाळासाहेबांची शिवसेना यांच्या कडून कराडकराना 30 टक्के सवलत दिलीच पाहिजे अशी आग्रहाची मागणी केली त्यानंतर सी ओ डाके यांनी आपण लोकशाही आघाडीला केवळ 15 टक्क्याचे आश्वासन दिले होते तो जाहीर केलेला निर्णय नव्हता त्यामुळे याबाबतचा निर्णय येत्या 6 फेब्रुवारीला सर्व पक्षीय नेत्यांना बोलावून त्यांच्यासमोरच घेण्यात येईल असे सांगितले त्यामुळे 15 टक्के निर्णय स्थगित करण्यात आला आहे असेही डाके म्हणाले


कराडात पाणी बिलात 15 टक्के सूट देणार ; मुख्याधिकारी डाके यांचे आश्वासन ;

वेध माझा ऑनलाईन - कराड शहरात पालिकेने मीटर प्रमाणे पाणी बिल आकारणी सुरू केली. यामध्ये बिलाची रक्कम मोठी आल्याने कराडच्या लोकशाही आघाडीने पाणी बिलात नागरिकांना 20 टक्के सूट द्यावी, अशी मागणी केली होती. यावर आज पालिका मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्यासोबत चर्चा झाली. यामध्ये 15 टक्के तिमाही पाणी बिलात सूट देणार असल्याचे मुख्याधिकारी डाके म्हणाले

कराड नगरपालिकेकडून 2007 सालापासून ही पाणी योजना अद्याप रखडली गेली आहे गेल्या वर्षभरापासून ही योजना अमंलात आणण्यासाठी दिवसातून दोन वेळा मीटरप्रमाणे बिल आकारणी करण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये अनेक नागरिकांना पाणीबिल दुप्पट, चाैप्पट आली होते. त्यानंतर शहरातील सामाजिक संघटना, काॅंग्रेस, राष्ट्रवादी तसेच बाळासाहेबांची शिवसेना यांनी निवदेन दिली. तसेच आंदोलनासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला होता. यावर आज पालिकेने चर्चेचे निमंत्रण दिले होते. या प्रश्नावर लोकशाही आघाडीने 20 टक्के पाणी बिलात सूट देण्याची मागणी केली. यावर आज मोठी चर्चा पार पडली. त्यानंतर मुख्याधिकारी यांनी 15 टक्के सूट देणार असल्याचे आश्वासन दिले 

या बैठकीला लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत पाटील, माजी नगरसेवक सौरभ पाटील, नंदकुमार बटाणे, पोपटराव साळुंखे, जयंत बेडेकर, शिवाजी पवार, सुहास पवार, प्रवीण पवार, अख्तर आंबेकरी, राकेश शहा, राहुल भोसले, मोहसीन आंबेकरी, नवाज सुतार यांच्याह नागरिक तसेच लोकशाहीच आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी 15 टक्के सूट जाहीर करताच लोकशाही आघाडीने नागरिकांच्यावतीने आभार मानले.


Sunday, January 29, 2023

इनोव्हा कार ला अपघात ; 2 महीलांचा जागीच मृत्यू ; आज पहाटे घडली घटना ; वाचा बातमी

वेध माझा ऑनलाईन - साताऱ्यातील खंबाटकी बोगद्याजवळ गोकर्ण महाबळेश्वरवरून पुण्याच्या दिशेने निघालेल्या इनोव्हा कारवरील चालकाचे नियंत्रण सूटल्याने अपघात झाला. यावेळी कारमधील 2 महिलांचा जागीच मृत्यू झाला तर 6 जण जखमी झाले. रंजना सराफ आणि शांताबाई जाधव अशी मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत

याबाबत अधिक माहिती अशी की, आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास साताऱ्यातील खंबाटकी बोगद्याजवळून गोकर्ण महाबळेश्वरवरून पुण्याच्या दिशेने जाधव कुटूंबीय त्यांच्या इनोव्हा कार क्रमांक एमएच 14 डीएफ 6666 मधून निघाले होते. त्यांची कार खंबाटकी बोगद्याजवळ आली असता. कारमधील चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे भरधाव वेगात असलेली कार रस्त्यालगत असणाऱ्या कठड्याला धडकली दरम्यान अपघातस्थळी मृत पावलेल्या व जखमींना तात्काळ शिरवळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे

मनसे नेते अमित ठाकरेंची कराडात जोरदार एन्ट्री ; मनसैनिकांनी केले जल्लोषात स्वागत ;

वेध माझा ऑनलाईन - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव व मनसे नेते अमित ठाकरे यांचे नुकतेच कराडमध्ये आगमन झाले आहे जिल्हाध्यक्ष ऍड विकास पवार, धैर्यशील पाटील उपाध्यक्ष महेश जगताप तालुकाध्यक्ष दादा शिंगण शहर अध्यक्ष सागर बर्गे मनविसे शहर अध्यक्ष विनायक भोसले यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले  उद्या कराडात विविध नियोजित कार्यक्रमांना ठाकरे उपस्थित राहणार आहेत


अमित ठाकरे आज रात्री कराड येथील विश्रामगृह येथे मुक्कामास असतील उद्या सकाळी मनसैनिकांबरोबर विश्राम गृहापासून स्व. यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी कार्यकर्त्यांसह रॅलीने जाणार आहेत चव्हाण साहेबांच्या समाधीला त्याठिकाणी ते अभिवादन करणार आहेत त्यानंतर 11 वाजता विद्यानगर येथे विद्यार्थी सेनेच्या शाखेचे ते उदघाटन करतील त्यानंतर ते कराडच्या विश्रामगृह येथे 11.30 पासून येथील कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत सुमारे दुपारी 3 च्या सुमारास कराडच्या पत्रकारांशी ते संवाद साधतील असे मनसेचे जिल्हाध्यक्ष विकास पवार शहराध्यक्ष सागर बर्गे व मनविसेचे शहराध्यक्ष विनायक भोसले यांनी सांगितले
(फोटोग्राफी -सतीश चव्हाण)

अमित ठाकरे यांची साताऱ्यातुन पश्चिम महाराष्ट्राच्या संपर्क दौऱ्याला सुरुवात ; उदयनराजेची घेतली भेट ;

वेध माझा ऑनलाईन - मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि नेते अमित ठाकरे यांनी आज साताऱ्यात राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी उदयनराजेंनी अमित ठाकरेंना खास भेट दिली. 

अमित ठाकरे यांनी साताऱ्यात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधी स्थळाची भेट घेवून पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरुवात केली असुन यानंतर त्यांनी शिवतिर्थावर नतमस्तक होवून खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली.
अमित घरी आला तो माझा मुलगा घरी आल्यासारखा वाटला. अमित सारख्या तरुण नेत्यांनी पुढं आलं पाहिजे आणि लोकांची त्यांच्या माध्यमातून सेवा केली पाहिजे ठाकरे घराण्याचा इतिहास मोठा आहे. अगदी प्रबोधकार ठाकरेंपासून बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे या सगळ्यांचा त्यांनी नावलौकीक केला पाहिजे, अमित ठाकरेंचा फॅन फॉलोईंग जोरात आहे अमित ठाकरे यांच्या हातून खूप मोठं काम व्हावं‌ अशा शुभेच्छाही दिल्या.
विशेष म्हणजे, उदयनराजेंनी अमित ठाकरेंना एक खास परफ्युम भेट दिला. हाच परफ्युम का हे सुद्धा सांगितलं. 'Bvlgari men" हा परफ्युम खासदार उदयनराजे यांनी अमित ठाकरे यांना भेट दिला यावेळी 'तू लहान राहिला नाहीस मोठा माणूस झाला आहे आणि आमच्या सगळ्यांची काळजी घेतली पाहिजेस म्हणून हा परफ्युम दिला आहे, असं उदयनराजे भोसले म्हणताच शेजारी अमित ठाकरें चक्क लाजले.
दरम्यान साताऱ्यात आलो आणि राजेंना भेटलो नाही असं होवू शकत नाही. ही भेट राजकीय नव्हती वैयक्तिक होती, असं अमित ठाकरे यांनी सांगितले

मनसे नेते अमित ठाकरे उद्या कराडात ; विविध कार्यक्रमास राहणार उपस्थित ;

वेध माझा ऑनलाईन - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव व मनसे नेते अमित ठाकरे हे उद्या सोमवारी कराड नजीक असणाऱ्या विद्यानगर येथे मनसे विद्यार्थी सेनेच्या नव्याने झालेल्या शाखेचे उदघाटन करण्याकरिता येणार आहेत सकाळच्या सुमारास या शाखेचे उदघाटन संपन्न होणार आहे या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहा असे आवाहन  मनसेच्या वतीने करण्यात आले आहे 

राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे युवकांचे आयडॉल समजले जातात ते  मनसे विदयार्थी सेनेचे अध्यक्ष आहेत त्यांचे पक्ष विस्ताराचे काम संपर्क अभियाना अंतर्गत संपूर्ण राज्यभर चालूच असते सातारा जिल्ह्यात राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे विदयार्थी सेनेचे सामाजिक काम कराड तसेच संपूर्ण जिल्ह्यात सुरू असते कराड नजीक विद्यानगर येथे विद्यार्थी सेनेच्या शाखेचे नूतन शाखेचा उदघाटन सोहळा उद्या सम्पन्न होतोय स्वतः अमित ठाकरे या शाखेच्या उदघाटनासाठी उपस्थित राहणार आहेत

दरम्यान, अमित ठाकरे आज रात्री कराड येथील विश्रामगृह येथे मुक्कामास असतील उद्या सकाळी मनसैनिकांबरोबर विश्राम गृहापासून स्व. यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी कार्यकर्त्यांसह रॅली ने सकाळी 10 वाजता जाणार आहेत चव्हाण साहेबांच्या समाधीला त्याठिकाणी ते अभिवादन करणार आहेत त्यानंतर 11 वाजता विद्यानगर येथे विद्यार्थी सेनेच्या शाखेचे ते उदघाटन करतील त्यानंतर ते कराडच्या विश्रामगृह येथे 1130 पासून येथील कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत सुमारे दुपारी 3 च्या सुमारास कराडच्या पत्रकारांशी ते संवाद साधतील असे मनसेचे जिल्हाध्यक्ष विकास पवार शहराध्यक्ष सागर बर्गे व मनविसेचे शहराध्यक्ष विनायक भोसले यांनी सांगितले

Saturday, January 28, 2023

जय श्रीराम वरून राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींचे वादग्रस्त वक्तव्य ! ; नव्या वादाला तोंड फुटणार !

वेध माझा ऑनलाईन - राम राम हा आदराचा शब्द आहे. मात्र, जय श्रीराम म्हटलं की, धडकी भरतेय असं म्हणत जय श्रीराम म्हणण्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरींनी विरोध करत नव्या वादाला तोंड फोडलंय. तर कालचा भारत चांगला होता. मात्र, आजचा भारत दुषित केल्याची खंत व्यक्त करत देशात रंग,जातीवरुन राजकारण केलं जातं. मात्र, यापलीकडेही देश आहे, याचा विचार व्हायला हवा, असे म्हणत अमोल मिटकरींनी केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधाला.

पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे साहेबराव बुट्टेपाटील स्मुर्ती व्याख्यानमाला कार्यक्रमात "उज्ज्वल भारताचे कालचे आजचे आणि उद्याचे स्वप्न" या विषयावर मिटकरींनी व्याखान दिले. यावेळी मोठ्या संख्येने महाविद्यालयीन तरुण तरुणी उपस्थित होते.

काय म्हणाले अमोल मिटकरी -
राजगुरुनगर येथील साहेबराव बुट्टेपाटील स्मुर्ती व्याख्यानमालेच्या कार्यक्रमात बोलताना अमोल मिटकरींनी जय श्रीराम म्हणल्यावर धडकी भरतेय असं म्हटलं. आंदोलनावेळी जय श्रीराम म्हटलं जातं. मग रामाने दहशत शिकवलीय का? रामाने सावत्र भाऊ असलेल्या भरताला नंदीग्रामची गादी दिली. मग ज्याचं जय श्रीराम वर प्रेम असेल त्यांनी स्वत:च्या सख्ख्या भावाला दोन एकर शेती तरी द्यावी. रामाने भावाचा आदर केला मग जय श्रीराम करणाऱ्यांनी याचा विचार करायला हवा. जसं वंदे मातरम या नावाची दहशत तशीच जय श्रीरामच्या नावाची दहशत माजविण्याचे काम या सरकारमधील लोक करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला

Friday, January 27, 2023

पहाटेच्या शपथविधिबाबत शरद पवारांनी अखेर सांगूनच टाकलं ; काय म्हणाले ?

वेध माझा ऑनलाईन - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते कोल्हापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवार यांची खेळी असू शकते असं वक्तव्य केलं होतं. याबाबत शरद पवार  यांना विचारले असता पहाटेच्या शपथविधीला दोन वर्ष होऊन गेली, आता हा विषय कशाला काढता अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. तसेच  बहुमताचा आकडा सत्ताधारी पक्षासोबत राहाणार नाही असं एकंदरीत चित्र दिसत असल्याचं म्हणत  त्यांनी निवडणूक सर्व्हेवर देखील प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हटलं शरद पवार यांनी? 
पहाटेच्या शपथविधीला दोन वर्ष होऊन गेली आहेत आता हा विषय कशाला काढता अशी प्रतिक्रिया पवार यांनी पहाटेच्या शपथविधीवर दिली आहे मात्र या त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय घ्यायचा अशी आता चर्चा सुरू आहे 
दरम्यान बहुमताचा आकडा सत्ताधारी पक्षासोबत राहाणार नाही असं एकंदरीत चित्र आहे. कर्नाटकात लोक परिवर्तनासाठी इच्छूक आहेत. विरोधकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मीही काहींशी बोललो आहे, महाविकास आघाडीने एकत्र निवडणुकीला सामोरे जावे अशी आमची भूमिका असल्याचंही यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे.

कराड शहराच्या पाणी प्रश्नाबाबाबत योग्य उपाययोजना करा, अन्यथा रस्त्यावर उतरणार ; शहर काँग्रेस अध्यक्ष ऋतुराज मोरे आक्रमक ;

वेध माझा ऑनलाईन - कराड शहराला चोवीस तास पाणीपुरवठा होण्यासाठी 2007 सालापासून रखडलेली योजना अंतिम टप्प्यात आलेली आहे. मात्र, आता पाणी बिलावरून ही योजना चर्चेत आलेली आहे. वर्षभरात 2 हजार येणारे पाणी बिल चक्क 10 ते 12 हजारांच्या घरात गेल्याने शहरातील नागरिक आक्रमक झाले आहेत. कराड पालिकेत प्रशासक असल्याने प्रशासनाने लवकरात लवकर योग्य उपाययोजना कराव्यात अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू. असा इशारा कराड काँग्रेसचे शहराध्यक्ष ऋतूराज मोरे यांनी दिला आहे. ऋतूराज मोरे यांनी येथील एका वृत्त वाहिनीशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते

ते पुढे म्हणाले की, कराड शहरात पालिकेच्यावतीने चोवीस तास पाणी पुरवठ्याची योजनेचि कामे सुरु आहेत. शहरात पाणी बिले पालिकेकडून घेतली जात असून कामे मात्र पूर्ण करण्यात आलेली नाही. त्यामुळे आम्हाला योग्य ती माहिती देऊन कामे तत्काळ पूर्ण करावीत, अन्यथा शहरात काँग्रेसकडून आंदोलने केली जातील अशा इशारा आम्ही दिला आहे. पालिकेकडून आम्हाला येत्या 30 जानेवारी बैठक घेण्याचाही आश्वासन देण्यात आलेले आहे.
पालिकेने पाणी प्रश्नाबाबत नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात. शहरासाठी चोवीस तास पाणी योजना गरजेची आहे. परंतु त्याकरिता नागरिकांच्यावर अन्याय होता कामा नये. यासाठी प्रशासनाने योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आम्ही पालिकेचे मुख्यधिकारी रमाकांत डाके यांच्याकडे केली आहे.गेल्या वर्षभरात ही योजना कार्यान्वित होण्या अगोदर मीटर प्रमाणे बिल आकारणी करण्यास सुरूवात केली गेली. सध्या, सकाळ व संध्याकाळ असे 2 वेळात मीटरप्रमाणे पाणी सोडले जात आहे. वर्षभरात 2 हजार येणारे पाणी बिल चक्क 10 ते 12 हजारांच्या घरात गेल्याने शहरातील नागरिक आक्रमक झाले आहेत. कराड पालिकेत प्रशासक असल्याने राजकीय पक्षांनीही मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना निवेदन दिलेली आहेत.

कोश्यारी यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल कोण ? ; कॅप्टन अमरिंदर सिंग यांचं नाव आघाडीवर ...

वेध माझा ऑनलाईन - महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कायमच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिले आहेत. अनेकदा तर त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली. शेवटी भगतसिंह कोश्यारी यांनीच केंद्र सरकारकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा दिल्यास पुढील राज्यपाल कोण असतील? याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे.  यात पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचं नाव आघाडीवर आहे.  मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये.

सुमित्रा महाजन यांचं नावही चर्चेत  
दरम्यान पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नावासोबत महाराष्ट्राच्या राज्यपालपदासाठी आणखी एक नाव चर्चेत आहे. ते म्हणजे सुमित्रा महाजन यांचं. मात्र जरी या दोन नावाची चर्चा सुरू असली तरी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. भगतसिंह कोश्यारी यांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. या वक्तव्यांमुळे ते चांगलेच अडचणीत सापडले. विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली. शेवटी आता भगतसिंह कोश्यारी यांनीच आपल्या राजीनाम्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यानंतर नवे राज्यपाल म्हणून कॅप्टन अमरिंदर सिंग यांचं नाव चर्चेमध्ये आहे.

कोण आहेत अमरिंदर सिंग?  
कॅप्टन अमरिंदर सिंग हे पंजाबचे माजी मुख्यमंत्री आहेत. ते पंजाब काँग्रेसचे काही काळ प्रदेशाध्यक्षही होते. त्यांचे वडील हे पटियाला राजघराण्याचे शेवटचे राजे होते. 1963 ते 1966 या काळात अमरिंदर सिंग यांनी भारतीय लष्करातही आपलं योगदान दिलं आहे. ते 2014 ला काँग्रेसच्या तिकीटावर अमृतसर मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र त्यानंतर  काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद व पक्षनेतृत्वाशी झालेल्या बेबनावामुळे अमरिंदर सिंग यांनी 18 सप्टेंबर 2021 रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी  पंजाब लोक काँग्रेस 'पीएलसी' नावाच्या पक्षाची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी आपला पक्ष भाजपात विलीन केला

जयंत पाटलांच्या पहाटेच्या शपथविधीच्या गौप्यस्फोटावर अजितदादांनी दिली प्रतिक्रिया ; काय म्हणाले ?

वेध माझा ऑनलाईन - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तीन वर्षांपूर्वी अजित पवार व देवेंद्र फडणवीसांच्या झालेल्या शपथविधीबाबत केलेला गौप्यस्फोट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. अजित पवारांनी भल्या सकाळी देवेंद्र फडणवीसांसह शपथ घेतल्यामुळेच राज्यातील राष्ट्रपती राजवट उठवण्यात आली अशा आशयाचं विधान जयंत पाटलांनी केल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपामधील नेतेमंडळींनीही प्रतिक्रिया दिली असून आता खुद्द अजित पवारांनी त्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. जालन्यामध्ये पत्रकारांनी यासंदर्भात विचारणा केली असता अजित पवारांनी त्यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?
“मला वाटत नाही की अजित पवार काही बोलले असतील. पण त्यावेळी राज्यात (२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर) राष्ट्रपती राजवट होती. राष्ट्रपती राजवट उठविण्याशिवाय काही पर्याय नव्हता. त्या अनुषंगाने केलेली ही एक खेळी असू शकते. त्यामुळे मला वाटत नाही की त्याला यापेक्षा जास्त काही महत्त्व आहे. त्यावेळी अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यांना आज महत्त्व नाही”, असं जयंत पाटील म्हणाले होते. यानंतर या विधानावरून जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.

२०१९ सालच्या राज्यातील विधानसभा निवडणुका झाल्यानंतर राजकीय तिढा निर्माण झाला होता. शिवसेना आणि भाजपामध्ये मुख्यमंत्रीपदावरून फाटल्यामुळे युतीचं सरकार पुन्हा येणार नसल्याचं दिसू लागलं होतं. त्याचवेळी अचानक अजित पवारांनी थेट देवेंद्र फडणवीसांसमवेत शपथविधी उरकल्याचा राजकीय भूकंप झाला. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या अजित पवारांनी त्यानंतर तीन दिवसांत झालेल्या राजकीय घडामोडींनंतर राजीनामा दिला. त्यापाठोपाठ देवेंद्र फडणवीसांनीही राजीनामा दिला आणि महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात कमी कालावधीचं सरकार ठरलेलं फडणवीस सरकार ८० दिवसांत कोसळलं. त्यानंतर अजित पवारांच्या या कृतीचं गूढ अद्यापपर्यंत कायम आहे. दोन्ही बाजूंनी त्यावर कोणतंही सविस्तर कारण देण्यात आलेलं नाही.

अजित पवारांची प्रतिक्रिया
दरम्यान, जयंत पाटलांच्या वक्तव्यानंतर राज्यात पुन्हा एकदा तर्क-वितर्कांना उधाण आलं असून हा सगळा प्रकार शरद पवारांच्या खेळीचा भाग असल्याचे दावे केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर जालन्यामध्ये पत्रकारांनी अजित पवारांना यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी यावर पुन्हा एकदा सविस्तर प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. “त्यावेळी मी स्वत: म्हटलं होतं की तो विषय मी कदापि काढणार नाही”, असं अजित पवार यांनी  सांगत या प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केल्याने जयंत पाटील यांनी केलेल्या गौप्यस्फोटात तथ्य आहे ? अशा चर्चा आता सुरू आहेत. 


Wednesday, January 25, 2023

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचे खळबळजनक विधान ; म्हणाले ...त्या शपथविधीची खेळी पवारांचीच ;

वेध माझा ऑनलाईन - राज्याच्या राजकारणात दि. २३ नोव्हेंबर २०१९ रोजी एक महत्वाची घटना घडली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राजभवनात जात पहाटेच शपथविधी केला होता. त्यानंतर मात्र या प्रकरणाची राज्यात खूप चर्चा झाली. त्यातच त्या प्रसंगावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी एक विधान केले. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी हा शरद पवार यांचीच खेळी असल्याचे विधान जयंत पाटील यांनी केले आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण परत एकदा तापण्याची चिन्हे आहेत.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, ‘मला वाटत नाही की अजित पवार काही बोलले असतील. पण त्यावेळी राज्यात (२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर) राष्ट्रपती राजवट होती. राष्ट्रपती राजवट उठविण्याशिवाय काही पर्याय नव्हता. त्या अनुषंगाने केलेली ही एक खेळी असू शकते. त्यामुळे मला वाटत नाही की त्याला यापेक्षा जास्त काही महत्त्व आहे. त्यावेळी अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यांना आज महत्त्व नाही. त्यानंतर अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. या काळात त्यांनी स्पष्टपणे कारभार केला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला नाही. आता शिवसेनेचे आमदार फुटल्यामुळे सरकार कोसळले. पण राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरेंना शेवटपर्यंत ठामपणे साथ दिली, हे नाकारता येणार नाही.’ असे यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले.
जयंत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात चांगली खळबळ उडाली आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची सत्तास्थापनेसाठी शिवसेनेसोबत चर्चा सुरू असतानाच अचानक अजित पवार यांनी सध्याचे उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राज भवनावर जात शपथ घेतली होती याची कुणालाही खबरबात लागली नव्हती. इतकी गुप्तता या प्रकरणात पाळण्यात आली होती.
मात्र फक्त साडेतीन दिवसचं अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार चालू शकले.
त्यानंतर हे सरकार कोसळले आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला.

राज्यात पुढच्या आठवड्यात थंडी आणखी वाढणार ! ; हवामान खात्याचा अंदाज ;

वेध माझा ऑनलाईन - राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात थंडी जाणवत आहे. त्यातच आता राज्यातील थंडीची परिस्थिती पाहता हवामान खात्याने आणखी एक अंदाज वर्तवला आहे. राज्यात पुढच्या आठवड्यात थंडीची लाट येऊ शकते असे हवामान खात्याने म्हटले आहे.

मुंबईसुद्धा गारठणार -
पुढच्या आठवड्यात मध्य महाराष्ट्रात थंडीच्या लाटेसारखी परिस्थिती असणार आहे. तसेच मुंबईत किमान तापमान सरासरीपेक्षा कमी होऊ शकते, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. तर पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान तापमानात किरकोळ वाढ होईल. मात्र, याबरोबरच दिवसाच्या तापमानात अंशत: घट होण्याची शक्यता आहे आणि 20 जानेवारीनंतर थंडीचा जोर अधिक वाढू शकतो अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्ती केली आहे.

हवामान खात्याने नेमकं काय म्हटलं -
सध्या संपूर्ण राज्यात पुन्हा थंडीचा कडाका जाणवत आहे. त्यात आता 29 जानेवारीनंतर महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढू शकतो, असे अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच 2 फेब्रुवारीपर्यंत थंडीची ही लाट कायम राहिल, अशी शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.

थिएटरमध्ये घुसून चित्रपटाचे पोस्टर फाडले ; पठाण चित्रपटाला जोरदार विरोध

वेध माझा ऑनलाईन - सध्या 'पठाण' चित्रपट जोरात चर्चेत आहे. पण त्या सिनेमाच्या गाण्यांबद्दलचा वाढता वाद काही संपत नाहीये.या चित्रपटाला सातत्याने विरोध होत आहे, अशा परिस्थितीत चित्रपटाभोवती निर्माण झालेल्या वादामुळे शाहरुखच्या फॅन फॉलोइंगवर फार मोठा परिणाम झालेला दिसत नाही. तरीही काही ठिकाणी या चित्रपटाला विरोध केला जात आहे. धुळे शहरातील सिनेमागृहात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी थेअटरमध्ये घुसून पोस्टर फाडले व पठाण सिनेमाविरुद्ध आंदोलन केले. 

शाहरुखच्या 'पठाण' या चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यावरून सुरू असलेला वाद अजूनही संपलेला नाही, धुळे शहरात बजरंग दल आणि हिंदुत्त्ववादी संघटनांकडून जोरदार निदर्शने केली जात आहेत. बजरंग दलाने धुळे शहरातील मल्टिप्लेक्स आणि थिएटरमध्ये पठाण चित्रपट चालू न देण्याची धमकी दिली आहे शहरातील एका चित्रपटगृहात आज बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पठाण चित्रपटाचा निषेध करत पोस्टर फाडले. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. 

आदरणीय पी.डी.पाटील गाैरव प्रतिष्ठानचा यंदाचा 'कराड गाैरव पुरस्कार ' पांडुरंग जयसिंग करपे यांना जाहीर

वेध माझा ऑनलाईन - येथील आदरणीय पी.डी.पाटील गाैरव प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणारा  यंदाचा' कराड गाैरव पुरस्कार कराडचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, प्रसिध्द मंडप काॅन्ट्रक्टर पांडुरंग जयसिंग करपे यांना त्यांच्या उल्लेखनिय समाजकार्या बद्दल जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री व प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आमदार बाळासाहेब पाटील यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीमध्ये पांडुरंग करपे यांच्या नावाची एकमताने निवड करण्यात आली.

यावेळी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डाॅ. अशाेकराव गुजर, विश्वस्त ऍड.मानसिंगराव पाटील, दिलीपभाऊ चव्हाण, साै रेश्मा काेरे, साै शाेभा पाटील व अबुबकर सुतार यांची उपस्थिती हाेती.

पांडुरंग करपे हे सातारा जिल्हा बुरुड समाजाचे उपाध्यक्श असून अनेक संस्थांवर विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी अनेक शिक्षण संस्थांना आर्थिक सहकार्य केले आहे त्यामध्ये जयसिंगराव मल्हारी करपे हायस्कूल शिरढाेण जि.सांगली व वर्ये जि.सातारा, शिक्षण मंडळ कराड तसेच, शालेय विद्यार्थ्यांना शालेय व गणवेश वाटप, मूक बधीर विद्यालय यांना आर्थिक मदत व खाऊ वाटप, मतिमंद मुलांच्या शाळांना आर्थिक मदत, तसेच अनेक गरजूंना मदतीचा हात दिला आहे.
त्याचप्रमाणे २००० साली बुरूड समाजाचे अधिवेशन, कराडमधील वेश्यांना एडसविषयी  मार्गदर्शन व एक वेळचं जेवण, इंडियन लेप्रसी फाऊंडेशन अंधेरी मुंबई या संस्थेस आर्थिक मदत, अनेक ठिकाणी वृक्षाराेपण, व्यसनमुक्तिसाठि प्रयत्न,समाजासाठी वधू-वर सूचक मेळावे, शासकिय रिमांडहाेम मधील विद्यार्थ्यांना खाऊ व कपडे वाटप, दुष्काळामध्ये साेहाेली जि.सांगली येथील जनावरांच्या छावणीत चारा पाेहचविणे, श्री आळंदी ते पंढरपूर पालखी साेहळ्यात तरडगांव मधील सर्वांना अन्नदान,राेटरी क्लब कराड सुंदर अक्षर व वक्तृत्व स्पर्धांचे प्रायाेजक म्हणून काम, कराडमधील वृध्दांना बसणेकरिता १०० ठिकाणी सिमेंट बाकांची व्यवस्था असे समाजकार्य केले आहे व करीत आहेत.

त्यांना अनेक संस्थांनी पुरस्काराने गाैरविले आहे. त्यामध्ये दैनिक तरुण भारतचे संपादक किरण ठाकूर यांचे हस्ते, कृष्णाबाई उत्सव कमेटी, कै बाबासाहेब चाेरेकर स्मृति सामाजिक पुरस्कार, बुरुड समाजाच्यावतीने खासदार चंद्रकांत खैरे यांचे हस्ते सत्कार, यशवंत बॅंक महाेत्सव हभप बाबामहाराज सातारकर यांचे हस्ते ह्रदय सत्कार, महाराष्ट्र शासनाचा दलित मित्त पुरस्कार,  यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दि पुरस्कार, जानाई शिक्षण संस्थेचा शिवकला गाैरव पुरस्कार, राष्ट्रशाही अमर शेख पुरस्कार आदि पुरसकार तसेच, बुरुड समाज मंडळ कराड व केतय्यास्वामी प्रतिष्ठान पुणे यांचेकडून सन्मानपत्र प्रदान करणेत आले आहेत.कराड गाैरव पुरस्कार हा पांडुरंग करपे यांना मार्च २०२३ अखेर समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे

पठाण सिनेमावर बंदी घाला ; हिंदू एकताचे नेते अजय पावसकर यांची मागणी ; तहसीलदारांना दिले निवेदन ;

वेध माझा ऑनलाईन - येथील हिंदू एकता आंदोलनाचे सातारा जिल्हा संघटक अजय पावस्कर यांनी आज कराडच्या तहसीलदाराना  पठाण हा सिनेमा कराडात प्रदर्शित होऊ देऊ नये या मागणीचे निवेदन दिले

निवेदनातून म्हटले आहे की, पठाण सिनेमा कराडमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे समजले  चित्रपटात भगव्या रंगाची बिकिनी घालून बेशर्म रंग हे गाणं अश्लीलपणे दाखवण्यात आले आहे भगवा रंग त्यागाचे प्रतीक मानले जाते लव्ह जिहाद विरोधी राज्यभरात मोर्चे निघत आहेत हा चित्रपट लव्ह जिहाद ला पाठबळ ठरत आहे म्हणून हा चित्रपट आम्ही प्रदर्शित होऊ देणार नाही असेही या निवेदनात म्हटले आहे

Tuesday, January 24, 2023

एकाच कुटुंबातील ७ जणांनी आत्महत्या केली नाही तर, त्यांचा खून झालाय ; चुलत भावनेच खून केल्याची पोलिसांनी दिली माहिती ;

वेध माझा ऑनलाइन - दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदीपात्रात ६ दिवसांमध्ये  एकाच कुटुंबातील ७ जणांचे मृतदेह आढळले होते. या सात जणांनी सामुहिक आत्महत्या केल्याचे म्हटले जात असतानाच आता त्याला वेगळे वळण मिळाले असून त्यांच्या चुलत भावानेच त्यांचा खून करुन मृतदेह नदीत फेकले असल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे अधिक चौकशी करण्यात येत आहे. 

मोहन पवार हे यांचे चुलत भावाने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. मोहन पवार यांचा मुलगाबरोबर असताना तीन ते चार महिन्यांपूर्वी चुलत भावाच्या मुलाला अपघात झाला होता. तो मुलगा हॉस्पिटलमध्ये असतानाही मोहन पवार व त्यांच्या मुलाने ही बाब त्यांना सांगितली नाही. ४ दिवसानंतर मुलाच्या अपघाताची माहिती चुलत भावाला मिळाली. त्यानंतर त्या मुलाचा मृत्यु झाला होता. या घटनेचा राग मनात धरुन चुलत भावाने या सर्वांची हत्या करुन त्यांचे मृतदेह नदीत फेकून दिल्याची माहिती समोर आली आहे. मुलाने मुलगी पळवून नेली या रागात या घरच्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात होते मात्र आज वस्तुस्थिती समोर आली 












 

मुलाने मुलगी पळवून नेली ; घरातल्या 7 जणांनी आत्महत्या केली ; दौंड मधील घटनेने महाराष्ट्र हादरला - वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाईन- प्रेमविवाहास कुटुंबियांचा विरोध असल्यास अनेक तरुण-तरुणी पलायन करुन संसार थाटत असल्याच्या घटना वाढत आहेत. यातील बऱ्याच प्रकरणात कुटुंब त्यांना स्वीकारते तर काहीजण कायमचं संबंध संपवतात. मात्र, दौड येथील घटनेने सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकली आहे. मुलाने मुलगी पळवून नेल्याच्या रागात वडिलांसह कुटुंबातील 7 जणांनी आत्महत्या केली असल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पती, पत्नी, मुलगी आणि जावई यांच्यासह 3 मुलांचे मृतदेह भीमा नदीत सापडले आहेत. पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये ही घडना घडली आहे. ही घटना समोर आल्यानंतर दौंड शहरात खळबळ उडाली आहे.

मयताच्या मुलाने मुलगी पळवून नेली होती. त्याने मुलगी परत न आणल्याने वडिलांसह अन्य 6 जणांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज येथील कुटुंबाने भीमा नदीत आत्महत्या केली. पती-पत्नी, मुलगी आणि जावई यांच्यासह त्यांच्या 3 मुलींचे मृतदेह भीमा नदीत सापडले होते. त्यावेळी घातपात की आत्महत्या असा प्रश्न उपस्थित झाला होता. पोलीस चौकशीनंतर आत्महत्या असल्याचं समोर आलं आहे. 17 जानेवारीच्या रात्री 7 जणांनी भीमा नदीत आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
हे कुटुंब मंगळवारी 17 जानेवारी रोजी रात्री अकरानंतर  वाहनाने निघोज या गावातून निघाले होते. शिरूर - चौफुला रोडवर असलेल्या दौंड तालुक्यातील पारगाव हद्दीत भीमा नदीच्या पात्रात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृतदेह आढळून आले होते. 18 जानेवारी रोजी एका महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर 20, 21 आणि  22 जानेवारी रोजी तीन मृतदेह आढळून आले होते. या घटनेचा पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.

तासवडे टोलनाक्यावर टोल कर्मचार्‍यांची वाहन चालकाला मारहाण ; घटना cctv मध्ये कैद ;

वेध माझा ऑनलाईन - कराड शहराजवळील तासवडे टोलनाक्यावर टोल कर्मचार्‍यांनी वाहन चालकाला मारहाण केल्याची घटना आज घडली या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल होतो आहे. मारहाणीची घटना सीसीटिव्ही कॅमेर्‍यांत कैद झाली असून महामार्ग पोलिस याची चौकशी करत आहेत.

हाती आलेल्या माहितीनुसार, कराड शहरा जवळ तासवडे टोल नाक्यावर टोल कर्मचारी अन वाहन चालक यांच्यात वादावादीची घटना घडली. वादावादीचे रुपांतर मारहाणीत झाल्याने काहीवेळासाठी वातावरण तणावाचे बनले होते. कर्मचाऱ्यांनी यावेळी वाहन चालकाला मारहाण केल्याची घटना CCTV मध्ये कैद झाली आहे.
या घटनेचे व्हिडिओ शूटिंग करणाऱ्या पत्रकारालाही अरेरावी, दमदाटी व शिवीगाळ करण्यात आली आहे 

मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंसोबत जाण्याची अजितदादांची इच्छा ;

वेध माझा ऑनलाईन -  महापालिकेत महाविकास आघाडीतील  घटकपक्षांपैकी शिवसेनेचे वर्चस्व आहे. आणि मुंबईत सेनेची मोठी ताकद असल्याचे देखील मानले जाते. आम्हाला त्यांच्यासोबत जाण्याची इच्छा आहे. अशी इच्छा राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार चालवत असताना सांगितलं होतं की तुम्ही आम्हालाही सोबत घ्या. आपण एकत्र मुंबईत काम करू. आणि त्यावेळी उद्धव ठाकरे  यांनी सकारात्मक संदेश देखील दिला. होता असेही यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले.

राज्यातील राजकीय परिस्थिती गेल्या सहा महिन्यापासून बदलली आहे. वंचित बहुजन आघाडीची युती ही महापालिकेसाठी झाली आहे. असे आम्हाला समजले आहे. त्यांची युती कशा पध्दतीने पुढे जाणार हे पाहता येईल. मी आज या विषयावर उद्धव ठाकरे यांच्यासोबत देखील चर्चा करणार आहे. असेही यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले.
महाविकास आघाडीमध्ये प्रमुख तीन पक्ष आहेत. शिवसेना, काँग्रेस, आणि राष्ट्रवादी काँग्रेस. या तीन्ही पक्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी आमचं ठरलं होतं की, जागा वाटप हे तीन पक्षांमध्ये होईल. त्या जागांमधून मित्रपक्षांसाठी जागा सोडायच्या. म्हणजे प्रत्येकाने आपल्या पक्षातून.असा ठराव झाला होता. मात्र हा ठराव विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी झाला होता. महापालिका निवडणुकांसदर्भात आमची अजून तरी चर्चा झाली नाही. त्यामुळे त्याबाबतचा निर्णय बाकी आहे. असे अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसची मानसिकता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जाण्याची आहे. आज आम्ही त्यांच्याशी चर्चा करू.तसच प्रकाश आंबेडकर यांच्यात आणि उद्धव ठाकरेंमध्ये त्यांचं काय ठरलं आहे? जागावाटपावरून काय ठरलं आहे? यावर आम्ही चर्चा करणार आहोत असंही यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले...

लावणी नृत्यांगना गौतमी पाटील हिच्याविरोधात सातारा पोलिसात तक्रार दाखल ;

वेध माझा ऑनलाईन - महाराष्ट्रात सध्या लावणी फेम म्हटलं की गौतमी पाटील हीच नाव घेतलं जात आहे. अर्थात सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील सर्वात हॉट लावणी करणारी म्हणून तिची ओळख निर्माण झाली आहे. गौतमी तिच्या अश्लील नृत्यामुळे चर्चेत आली आहे. मात्र, आता गौतमी पाटील हिच्याविरोधात सातारा येथील प्रतिमा शेलार यांनी सातारा पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, लावणी सादर करत असताना गौतमीकडून अश्लील हावभाव केला जात असून तिच्या कार्यक्रमांवर बंदीची मागणी केली जात आहे. त्यामुळे सातारा येथील प्रतिमा शेलार यांनी गौतमी तिच्या नृत्यात अश्लील कृत्य करत असल्याचा आरोप करत सातारा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीची दखल घेत सातारा न्यायालयाकडूनही गौतमीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत
गौतमीचे डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. त्यानंतर तिच्या कार्यक्रमांवर बंदीचीही मागणी केली गेली. समाजातील वेगवेगळ्या स्तरातील मंडळींसह लावणी क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी गौतमीवर टीका केली होती. त्यानंतर गौतमीने जाहीर माफी मागितली होती. मात्र, आता सातारा न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

Monday, January 23, 2023

आता फैसला आठवड्यावर ! धनुष्यबाण चिन्हाबाबतचा अंतिम निर्णय 30 जानेवारीला ?

वेध माझा ऑनलाईन - शिवसेनेचं पक्षचिन्ह धनुष्यबाण कुणाचे ? या प्रश्नाभोवती मागील तीन आठवड्यापासून राजकीय उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. अखेर धनुष्यबाण चिन्हाबाबतचा अंतिम निर्णय 30 जानेवारीला येणार आहे. निवडणूक आयोग आपला अंतिम निर्णय 30 तारखेला देणार असल्याची माहिती समोर आली आहे. 30 जानेवारीला दोन्ही गटांचा युक्तिवाद होणार नाही. 30 जानेवारीपर्यंत फक्त शिंदे गट लेखी उत्तर सादर करणार आहे. ठाकरे गट कोणतही लेखी उत्तर निवडणूक आयोगाला सादर करणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे 30 तारखेच्या निर्णयाकडे राज्याचं लक्ष लागले आहे.

दरम्यान, 16 जानेवारीला झालेल्या सुनावणीमध्ये शिवसेनेकडून कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. तर शिंदे गटाकडूनही वकिलांची मोठी फौज युक्तिवादासाठी हजर होती
'शिंदे गटाने दाखल केली कागदपत्र ही जुनी आहे, महेश जेठमलानी यांनी केलेला दावा हा बोगस आहे. शिवसेनेमध्ये जी फूट पडली आहे त्याचा परिणाम पक्षावर होणार नाही त्यामुळे ही फूट ग्राह्य धरू नये. ही फूट काल्पनिक असू शकते. उद्धव ठाकरे यांची शिवसेनाच ही खरी शिवसेना आहे. जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निर्णय येत नाही, तोपर्यंत निर्णय घेऊ नये, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला होता 
तर, शिंदे गटाकडे पुरेसं संख्याबळ आहे. एखादा गट बाहेर पडला तर त्यात गैर काय आहे. आमदार, खासदारांची जास्त संख्या आमच्याकडे आहे. बहुसंख्येकडे नेणारी आकडेवारी महत्त्वाची आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा, असा युक्तिवाद जेठमलानी यांनी केला.


साताऱ्यात कोयता घेऊन दहशत माजवणार्यांना पोलिसांनी धो-धो- धोपटले...

वेध माझा ऑनलाईन- पुणे जिल्ह्यातील काेयता गॅंगचे अनुकरण साता-यातील युवक करीत असल्याचे नुकतेच निदर्शनास आले आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाेवई नाका येथे काेयता घेऊन दहशत पसरविणा-या युवकांना सातारा पाेलिसांनी चांगलाच चोप देत ताब्यात घेतले आहे.

साताऱ्यात कोयते नाचवत भीतीचे वातावरण दहा ते पंधरा युवक तयार करीत हाेते. एका चारचाकीची तोडफोड करून एका नागरिकाच्या गळ्याला कोयता लावून मारण्याची धमकी दिल्याची प्राथमिक माहिती पाेलिसांपर्यंत  पाेहचली. 
पोलिसांनी तातडीने माहितीच्या आधारे पाेवई नाका परिसर गाठला. तेथे पळून जाणा-या युवकांना ताब्यात घेतले. घटनास्थळी युवकांची आणि पाेलिसांची झटापट झाली. त्यावेळी पाेलिसांनी युवकांना चाेप दिला. पाच युवकांना ताब्यात घेतले असून त्यांची चाैकशी सुरु आहे.

आईचा तेरावा झाला... आणि दुसऱ्याच दिवशी केली आत्महत्या ; कराडच्या सोमवार पेठेतील घटना ;

वेध माझा ऑनलाईन - आईच्या निधनानंतर तेराव्या विधी नंतर दुसऱ्या दिवशी मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवार पेठेत शनिवार दि. 21 रोजी ही घटना घडली. अजित प्रभाकर करंदीकर (वय- 34) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी की, कराड मधील एक नामांकित बॅंकेत अजित हा पिग्मी एजंट म्हणून काम करत होता. तो सोमवार पेठेत 2000 प्लाझा येथे आपला मोठा भाऊ व आई समवेत राहत होता. वयोमानामुळे आईचे निधन झाले होते. अजित व त्याचा भावाने सर्व विधी सोपस्कर पार करीत तेरावा ही घातला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवार (दि. 21) जानेवारी दुपारनंतर अजितने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. त्याचा भाऊ घरी आल्यानंतर त्याला या प्रकाराची माहिती मिळाल्या नंतर त्याने याबाबत पोलिसात खबर दिली. अजितने आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही. पुढील तपास कराड शहर पोलिस करीत आहेत.


महाराष्ट्राचे राज्यपाल राजीनामा देणार राजभवनातून प्रसिध्दी पत्रक जारी! ;

वेध माझा ऑनलाईन - महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजीनामा द्यायची इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. राजभवनाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनाचा उर्वरित काळ चिंतन आणि मनन करण्यात घालवायचा आपला मानस आहे, असं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळवल्याची माहिती आहे.

नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन आणि चिंतनात व्यतीत करु इच्छितो, अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली. राजभवनने याबाबतचं प्रसिद्धीपत्रक दिलं आहे.
'महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे, हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे, आणि आशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशिर्वाद मिळत राहील,' असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले असल्याचे राजभवनाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

आज उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाचा शेवटचा दिवस ; आता पुढे काय होणार?

वेध माझा ऑनलाईन - आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी केली जात आहे. पण, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाचं काय होणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची मुदत 23 जानेवारीला संपणार आहे, त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कुणाचा याबाबतची पुढची सुनावणी 30 जानेवारीला होणार आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाची मुदत त्याआधी म्हणजेच 23 जानेवारीला संपत आहे. पक्षांतर्गत प्रक्रियेसाठी संमती द्या किंवा मुदतवाढ द्या असं ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला सांगितलं होतं. मात्र त्यावरही निर्णय झालेला नाही. त्यामुळे 23 जानेवारीला मुदत संपल्यानंतर नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आज उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार हे पाहण्याचे ठरणार आहे.
१७ नोव्हेंबर २०१२ या दिवशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं. त्यानंतर शिवसेनाप्रमुख या पदावर कुठलीही नियुक्ती झाली नाही. शिवसेनाप्रमुख एकच होते बाळासाहेब ठाकरे आणि तेच राहतील अशी भावनिक भूमिका त्यावेळी शिवसेनेनं घेतली. त्यानंतर 2013 मध्ये उद्धव ठाकरे यांची निवड शिवसेना पक्षप्रमुख म्हणून केली गेली. २३ जानेवारी २०१८ या दिवशी पुन्हा एकदा पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंचीच निवड झाली
नेमकं या गोष्टीवर शिंदे गटाने बोट ठेवलं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना पक्षप्रमुख हे पद उद्धव ठाकरेंनी तयार केलं आहे ते घटनाबाह्य आहे असा दावा मागच्या सुनावणीच्या वेळी शिंदे गटाच्या वकिलांनी केला होता. त्यामुळे आता निवडणूक आयोगाची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. आता उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाचं काय होणार? असा सवाल उपस्थितीत झाला आहे

Sunday, January 22, 2023

दीपक केसरकर आदित्य ठाकरेंवर बरसले ; म्हणाले... आदित्य ठाकरे अपरिपक्व ;

वेध माझा ऑनलाईन ; बाळासाहेबांच्या विचारांचा स्वाभिमान एकनाथ शिंदे यांनी जपला आहे, अन्यथा विकली जाणारी लोकही आम्ही पाहिली आहेत. तेव्हा आदित्य ठाकरेंनी वयाप्रमाणेच बोलावे. आदित्य ठाकरे हे वयाने लहान आहेत. अडीच वर्षात आपल्या स्वतःच्या ऑफिसमध्ये एक महिना सुद्धा गेले नाहीत. लोकाची सेवा, राजकारण आणि समाजकारण म्हणजे काय ते कधी समजू शकले नाहीत असा घणाघात शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी कराड येथे केला ते टिळक हायस्कूल व शिक्षण मंडळ कराड यांच्या शताब्दी महोत्सावास आले असता त्यांनी  माध्यमांशी संवाद साधला.

आदित्य ठाकरे अनमॅच्युअर 
आदित्य ठाकरे यांच्या अनमॅच्युअर वक्तव्यामुळेच आमच्यात फूट पडली पदासाठी कोणी लाचारी केली, हे मी महाराष्ट्राच्या जनतेला लवकरच सांगेन 
आमचा ठाम निश्चय हाच आहे की आम्ही बाळासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावरच चालणार. आम्ही एकच मागणी केली होती, हिंदू विचारांशी प्रामाणिक रहा. परंतु काश्मीरमध्ये जावून हे काॅंग्रेस पुढाऱ्यांना मिठी मारत असतील, तर त्याच्यासारखा अपमान बाळासाहेबांच्या विचाराचा असूच शकत नाही. महाराष्ट्रात येवून सावरकरांबद्दल चुकीचे शब्द काढतात, अशीही टीका शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी काँग्रेसवर देखील केली  

 

आज कराडात हिंदू गर्जना मोर्चा ; मोठ्या संख्येने उपस्थित रहा ; सकल हिंदू समाजाच्या वतीने आवाहन ;

वेध माझा ऑनलाइन - आज सोमवार दिनांक 23 रोजी कराड तालुका सकल हिंदू समाजाच्या वतीने लव्ह जिहाद,गोहत्या, धर्मांतरण विरोधी कायदा लागू करण्यात यावा या मागणीसाठी कराड शहरातून हिंदू गर्जना मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे सदर मोर्चास मोठ्या संख्येने उपस्थित रहा असे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने  करण्यात आले आहे या मोर्चात सहभागी होण्यासाठी पंढरीचा मारुती चौकात आज सकाळी 10 वाजता एकत्रित जमावे असे आवाहन करण्यात आले आहे सदर मोर्चा पंढरीचा मारुती, चावडी चौक मार्गे दत्त चौक येथे जाणार आहे
कराडच्या बाजारपेठेतील व्यापारी वर्गाला मोर्चात सामील होण्याबाबतचे निमंत्रण देताना विक्रम पावसकर

याबाबत सकल हिंदु समाजाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की हिंदू मुलींना प्रेम संबंधात फसवून त्यांचे जबरदस्तीने धर्मांतरण केले जात आहे मुलींची हत्याही करण्यात येत आहे महिला वर्गात याविषयी मोठी असुरक्षितता आहे लव्ह जिहाद धर्मांतरण याबरोबरच गोहत्याचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढतच आहे यामुळे हिंदू समाजाची संस्कृती व अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे सरकारने याविषयी कडक कायदा करणे गरजेचे आहे याच मागणीसाठी आज कराडात हिंदू गर्जना मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे या मोर्चास मोठ्या संख्येने उपस्थित रहा असे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे

 व्यापाऱ्यांना मोर्चात सामील होण्याबाबतचे निमंत्रण देताना एकनाथ बांगडी, सुदर्शन पाटस्कर मुकुंद चरेगावकर,यांच्यासह मान्यवर

उध्दव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर आता एकत्र येणार ; मुहूर्त ठरला ;

वेध माझा ऑनलाईन - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीचा मुहूर्त अखेर ठरला आहे. उद्या म्हणजेच 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना-वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा होईल, असं शिवसेना नेते सुभाष देसाई म्हणाले आहेत. दोन मोठे पक्ष एकत्र येत असताना मोठी प्रक्रिया असते, चर्चा करावी लागते. मनातून सगळं ठरलं आहे, असं सुभाष देसाई म्हणाले आहेत.

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
दरम्यान शिवसेना-वंचित यांची युती कधी होणार? याबाबत प्रकाश आंबेडकर यांनाही विचारण्यात आलं. शिवसेना आणि आमच्यात युतीबाबत बोलणी झाली आहेत. उद्धव ठाकरेंनी युतीची घोषणा करावी, अशी आमची भूमिका आहे. आमच्या युतीबाबत ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सध्या चर्चा करत आहे. सर्वंनी एकत्र मिळून युतीची घोषणा करावी असं उद्धव ठाकरे यांना वाटत असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

 

Saturday, January 21, 2023

पंकजा ताईंना जाणीवपूर्वक भाजपचे नेते चुकीची वागणूक देतात ;

वेध माझा ऑनलाईन - पंकजा मुंडे या मागच्या काही दिवसांपासून भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत, त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचक विधान केलं आहे. पंकजा मुंडेंना जाणीवपूर्वक चुकीची वागणूक दिली जात आहे, जाणूनबुजून काही लोक हे काम करत असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. पंकजा मुंडे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, याबद्दल कारवाई करायला भाजप जिल्हाध्यक्षांना सांगितल्याचंही बावनकुळे म्हणाले.

'असा व्हिडिओ एटिड करणे आणि प्रकाशित करणं हे काही योग्य नाही. पंकजा ताईंना जाणीवपूर्वक भाजपचे नेते चुकीची वागणूक देतात. जाणूनबुजून काही लोक काम करत आहेत. कालच्या व्हिडिओवर मी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आमचे पदाधिकारी तिकडे जातील आणि ज्यांनी हे केलं त्याला शोधून काढतील. पोलीस शोधून काढतील', अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली.
'पंकजा ताई आमच्या नेत्या आहेत, पंकजा ताईंनी घेतलेल्या भूमिकेला प्रत्येकवेळी आमचं समर्थन आहे. पंकजा मुंडेंच्या संघटनात्मक कामाला आमचं पाठबळ आहे. राज्यातला कोणीही नेता पंकजा ताईंच्या आडवा येत नाही. देवेंद्रजी असोत मी असेन नितीनजी असतील, आम्ही सगळे पंकजा मुंडेंना मदत करणारे आहोत', असं वक्तव्य बावनकुळे यांनी केलं.
'पंकजा मुंडे आणि मी 16 तास प्रवास केला. काही लोक जाणीवपूर्वक त्यांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ तयार करून त्यांना वादात आणतात. त्या मोठ्या नेत्या आहेत त्यामुळे मी अध्यक्ष असूनही त्यांना काल शेवटी भाषण करायला सांगितलं, त्याचा व्हिडिओही माध्यमांना पाठवण्यात आला. या विकृती आहेत', अशी टीका बावनकुळेंनी केली.
'पंकजाताईंच्या कामात कुणीही हस्तक्षेप केलेला नाही, आणि कोणीही हस्तक्षेप करणार नाही. पंकजा मुंडे आमच्या नेत्या आहेत, त्यांच्या कामात कोणताही अडथळा येणार नाही', असा विश्वास बावनकुळे यांनी दिला.

फेब्रुवारीमध्ये राज्यात पुन्हा सत्तांतर होणार! ; राष्ट्रवादीच्या आमदाराचा खळबळजनक दावा ;

वेध माझा ऑनलाईन; राज्यात महाविकास आघाडी सरकारला खाली खेचून शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल. पण, हे सरकार आता कोसळणार, तेव्हा कोसणार अशी डेडलाईन  वारंवार विरोधकांकडून दिली जात असते. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही तर फेब्रुवारीमध्ये सरकार कोसळणार असं भाकीत वर्तवलं आहे.  पण, आता सरकारने काउंटडाऊन सुरू झाले आहे, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.या ना त्या मुद्यावरून अमोल मिटकरी हे 

शिंदे सरकारवर एकदाही टीकेची संधी सोडत नाही. आता त्यांनी ट्वीट करून आणखी एक खळबळजनक दावा केला आहे.
सरकारचे काउंट डाऊन सुरू. शिवजयंती पूर्वी महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होणार हे नक्की' असं मिटकरी म्हणाले आहे. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये राज्यात पुन्हा सत्तांतर होणार का, अशी चर्चा रंगली आहे.
विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (दि.20) शुक्रवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या शासकीय बंगल्यावर भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांच्या भेटी मागचं कारण अस्पष्ट असून पाऊण तास दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या दोघांच्या झालेल्या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
दरम्यान, दोन्ही नेत्यांमध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाली आहे, याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. मंत्रिमंडळ विस्तार की शिवसेनेतील धनुष्यबाण चिन्हावरून सुरू असलेला वाद यामध्ये काय चर्चा झाली याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहे.

Friday, January 20, 2023

भर रस्त्यात तहसीलदारांना पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न ; कुठे घडली घटना ?

वेध माझा ऑनलाईन - बीड जिल्ह्यांतील केज च्या नायब तहसीलदार आशा वाघ यांना भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सरकारी अधिकाऱ्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्यामुळे केजमध्ये या प्रकरणाची चर्चा होत आहे. कौटुंबिक वादातून आशा वाघ यांच्यावर हल्ला झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वीही कौटुंबिक वादातून त्यांच्या भावानेच त्यांच्यावर हल्ला केला होता. 

केज तहसील कार्यालयातील, संजय गांधी निराधार योजनेच्या नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर भररस्त्यात जीवघेणा हल्ला झाल्याची थरारक घटना घडली आहे. आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आशा वाघ यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यातून त्या थोडक्यात बचावल्या असून सध्या त्यांच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
नायब तहसीलदार आशा वाघ आज दुपारी जेवण करून तहसील कार्यालयाकडे मोपेडवरून येत होत्या. त्याचवेळी एका चारचाकी वाहनाने त्यांचा रस्ता अडवला. त्यातून उतरलेल्या एका महिलेसह इतर 4 जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी बॉटलमधील पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, या हल्ल्यातून त्या थोडक्यात बचावल्या आहेत. केज येथील सरकारी रुग्णालयात आशा वाघ यांच्यावर उपचार सुरु आहेत. पोलीस या घटनेचा तपास घेत आहेत. हल्लेखोर फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

शिवसेना कोणाची ? आजही उत्तर मिळाले नाही ; पडली ; उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची मुदत येत्या 23 जानेवारीला संपणार

वेध माझा ऑनलाईन - केंद्रीय निवडणूक आयोगात झालेल्या सुनावणीत शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरेंना मिळणार की शिंदेंना मिळणार? या महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर आज देखील मिळालं नाही शिवसेना आणि धनुष्यबाणावरील केंद्रीय निवडणूक आयोगात सुरु असलेली सुनावणी पुढे ढकलली आहे. निवडणूक आयोगात आज शिवसेना आणि धनुष्यबाण नेमका कुणाचा? याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. सोमवारी 23 जानेवारी रोजी दोन्ही गटांना लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत. लेखी उत्तरं मिळाल्यानंतर आयोग पुढील कार्यवाही करणार आहे.  

आज ठाकरे गटाच्या वतीनं कपिल सिब्बल, देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला तर शिंदे गटाच्या वतीनं महेश जेठमलानी, मनिंदर सिंह यांनी युक्तीवाद केला. जवळपास चार तास चाललेल्या या सुनावणीनंतरही  शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरेंना मिळणार की शिंदेंना मिळणार? महाराष्ट्राला पडलेल्या या प्रश्नाचं उत्तर आज देखील मिळालं नाही. आजच्या सुनावणीत ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकिलांमध्ये शाब्दिक चकमक झाली. ठाकरे गटाचे देवदत्त कामत आणि शिंदे गटाचे महेश जेठमलानी यांच्यात शाब्दिक चकमक झाल्यानंतर आयोगाला मध्यस्थी करावी लागली.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह तात्पुरतं गोठवलं आणि ठाकरेंना मशाल तर शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह दिलं. त्यानंतर धनुष्यबाण या शिवसेनेच्या मूळ चिन्हावर दोन्ही गटांनी दावा केला. त्यात उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची मुदत येत्या 23 जानेवारीला संपणार आहे. त्यामुळे आजची सुनावणी दोन्ही गटांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ठाकरे गटाच्या वतीनं कपिल सिब्बल यांनी एक तास दहा मिनिटं युक्तिवाद केला. त्यांच्यानंतर ठाकरे गटाकडून देवदत्त कामत यांनी देखील युक्तिवाद केला. 

कपिल सिब्बल यांच्या युक्तीवादातील महत्वाचे मुद्दे 
शिंदे गटाच्या याचिकेतील मुद्दे खोडण्याचा कपिल सिब्बल यांच्याकडून प्रयत्न, जर यांचं बंड झालं होतं तर एक महिना आयोगाकडे येण्यासाठी का लावला? 
राष्ट्रीय कार्यकारिणी आमच्यासोबत आहे, शिंदे गटाची राष्ट्रीय कार्यकारिणी बेकायदेशीर 
ठाकरे गटाची कार्यकारिणी बरखास्त होऊ शकत नाही. ठाकरेंची कार्यकारिणी घटनेप्रमाणे आहे. 
राष्ट्रीय कार्यकारिणीला मुदतवाढ द्या किंवा निवडणूक घ्या
एकनाथ शिंदेंचं प्रतिज्ञापत्र तपासून पाहा. आम्हाला प्रतिनिधी सभा घेण्याची परवानगी द्या. दोन्ही ठिकाणी आमचं संख्याबळ जास्त, सभागृहांमध्येही आमचं स्थान आहे 
पक्षप्रमुख पदाला मुदतवाढ द्या, ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी, घटनेनुसार प्रतिनिधी सभा आमच्याकडे, शिंदे गटाकडे प्रतिनिधी सभा नाही, जी आहे ती घटनाबाह्य 
शिंदे गटाच्या कागदपत्रांमध्ये कमतरता, 61 पैकी 28 जिल्हाप्रमुखांची प्रतिज्ञापत्र नाहीत
 लोकशाहीनुसार म्हणणं मांडायला हवं होतं, गुवाहाटीला का गेले? पक्षाच्या सभेला उपस्थिती न लावता ते गुवाहाटीला गेले, एकनाथ शिंदे आधी शिवसेनेत होते आणि ते कार्यरत होते.
राजकीय पक्ष म्हणून शिंदे गटानं कोणती कागदपत्रं सादर केली आहेत का? शिंदे गट राजकीय पक्ष नाही. 
शिवसेनेच्या सर्व प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसारच, ठाकरे गटच खरी शिवसेना; ठाकरे गटाची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त होऊ शकत नाही, शिवसेनेची घटना सिब्बल यांच्याकडून आयोगासमोर सादर 
हा वाद म्हणजे संसदीय पद्धतीची थट्टा

देवदत्त कामत यांनी केलेला युक्तिवाद
ठाकरे गटाचं काम आयोगाच्या घटनेनुसारच
शिंदे शिवसेनेत होते, मग शिवसेना बोगस असं कसं म्हणू शकतात...
शिवसेनेची घटना बोगस हा शिंदे गटाचा दावा कोणत्या आधारे?
शिंदे गटाची प्रतिनिधी सभाच झाली नाही
सादीक अली केस याठिकाणी लागू होऊ शकत नाही, राजकीय पक्ष म्हणून आमचं संख्याबळ लक्षात घ्या...
मुख्य नेतेपद पक्षाच्या घटनेतच नाही, त्यामुळं ते घटनाबाह्य

महेश जेठमलानी यांनी केलेला युक्तिवाद
उद्धव ठाकरेंनी मविआ कशी बनवली?
युतीचं आश्वासन देऊन मतं मिळवली अन् नंतर मतदारांना सोडून दिलं आमच्या संख्येबाबत कोणताही वाद नाही मुख्य नेतापद हे कायदेशीर आहे पक्षघटनेचं आम्ही पालन केलं आहे. 
शिंदेंच्या बंडानं शिवसेनेत फूटच

दोन्ही गटाकडून प्रतिज्ञापत्रं आयोगासमोर सादर
शिवसेनेच्या ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे आतापर्यंत 160 राष्ट्रीय कार्यकारणी प्रतिनिधी, 2,82,975 संघटनात्मक प्रतिनिधी, 19,21,815 प्राथमिक सदस्य अशा एकूण 22 लाख 24 हजार 950 पक्षसंघटनेच्या पदाधिकाऱ्यांची शपथपत्रे सादर केली आहे. तर शिंदे गटाने 12 खासदार, 40 आमदार, 711 संघटनात्मक प्रतिनिधी, 2046 स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधी आणि 4,48,318 प्राथमिक सदस्य अशा 4,51,127 पदाधिकाऱ्यांची शपथपत्रे आयोगाकडे सादर केली आहेत.

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत थोडक्यात बचावले ; भर समुद्रात त्यांची स्पीड बोट पडली बंद...काय झाले पुढे?

वेध माझा ऑनलाईन - राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत रायगड जिल्ह्यातील मांडवा इथून मुंबईत गेट वे ऑफ इंडिया असा स्पीड बोटीने प्रवास करताना थोडक्यात बचावले. भर समुद्रात त्यांची बोट बंद पडली होती. स्पीड बोटीची सर्व यंत्रणा बंद पडल्यानंतर बोटीच्या कॅप्टनला रेस्क्यूसाठी SOS हा आपत्कालीन संदेशसुद्धा पाठवता येत नव्हता.
समुद्रात अचानक ओढवलेल्या या संकटात प्रसंगावधान राखत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या स्वीय सहायकाने दुसरी स्पीड बोट बोलवली. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत सुखरुप असल्याची माहिती मिळाली आहे. 

भर समुद्रात अशा संकट प्रसंगी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या स्विय सहाय्यकाने मोबाईलची रेंज कमी असतानाही तात्काळ प्रयत्नं करून दुसरी स्पीड बोट मागवली. दुसरी बोट काही वेळातच घटनास्थळी बचाव कार्यासाठी दाखल झाली. त्यामुळे भर समुद्रात भरकटत चालेल्या स्पीड बोटीला दूसऱ्या बोटीने भर समुद्रात बचाव कार्य करत उद्योग मंत्री उदय सामंत यांना सुखरूप परत आणले.राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत अलिबाग ते मुंबई असा प्रवास स्पीड बोटीने करत होते. समुद्रात प्रवासा दरम्यान यांच्या स्पीड बोटीचे इंजिन बंद पडले. समुद्रातील लाटांमुळे स्पीड बोट भरकटली होती. 

पक्षप्रमुख पद कायम राहण्यासाठी ठाकरेंची खेळी ; केल्या दोन मागण्या

वेध माझा ऑनलाईन - उद्धव ठाकरे यांचं शिवसेना पक्षप्रमुखपद कायम राहणार का गोठवलं जाणार? याबाबतची सुनावणी निवडणूक आयोगात सुरू आहे. 23 जानेवारीला उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुखपदाचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे, त्यामुळे यावर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

उद्धव ठाकरे यांचं पक्षप्रमुखपद कायम राहण्यासाठी ठाकरे गटाने निवडणूक आयोगात युक्तीवाद केला. प्रतिनिधी सभा घ्यायला आणि नेता निवडीला परवानगी द्या, असे दोन अर्ज ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगात दाखल करण्यात आले आहेत.
उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा पक्षप्रमुख होण्यासाठी प्रतिनिधी सभा घ्यावी लागणार आहे. या प्रतिनिधी सभेमध्ये पुन्हा एकदा पक्षप्रमुखपदाची निवड करण्यात येईल. याच कारणामुळे ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी प्रतिनिधी सभा घ्यायला आणि नेता निवडीला परवानगी द्यायची मागणी केली आहे. ही मागणी मान्य होत नसेल तर प्रतिनिधी सभा घ्यायला आणि पक्षप्रमुखपदाला मुदतवाढ द्या, असंही कपिल सिब्बल निवडणूक आयोगात म्हणाले.
प्रतिनिधी सभेतल्या 271 जणांपैकी 170 जण आमच्यासोबत आहेत. पक्ष सोडून गेलेले प्रतिनिधी सभेचा भाग होऊ शकत नाही. प्रतिनिधी सभाच पक्ष चालवतो, पक्ष सोडून गेलेले प्रतिनिधी सभेचा भाग होऊ शकत नाही, असा युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगात केला.
शिंदे गटाकडून देण्यात आलेली शपथपत्र खोटी, या सर्वांची ओळख परेड घ्या, अशी मागणीही कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाकडे केली. शिंदेना मुख्यनेतेपद कुणी दिलं? ही नियुक्ती होताना राष्ट्रीय कार्यकारिणी झाली का? राष्ट्रीय कार्यकारिणीसाठीची घटना कुठे? असे प्रश्न कपिल सिब्बल यांनी उपस्थित केले.

Thursday, January 19, 2023

पाणी मीटर रीडिंगची आकारणी गैरवाजवी ; ती त्वरित रद्द करा ; बाळासाहेबांची शिवसेना कराड शहर व कराड तालुका यांच्यावतीने कराड नगरपालिकेला निवेदन ;

वेध माझा ऑनलाईन - कराड नगरपरिषदेने चोवीस तास पाणी योजनेंतर्गत नागरिकांकडून दोन हजार पाचशे रुपयांचे शुल्क घेउन पाण्याची मीटर बसवली आहेत. मात्र चोवीस तास पाणी योजना अद्यापही चालू नाही, तरी ब-याच वर्षापासून सुरु असलेले दिवसातून दोन वेळा येत असलेले पाणी यावरही ( दर मंगळवारी व शनिवारी एक वेळ पाणी येत नाही). कराड
नगरपरिषदेने एप्रिल महिन्यापासून मीटरप्रमाणे पाणीपट्टी आकारली आहे. त्यामुळे आतापर्यंत झालेली मीटर रीडिंगची आकारणी गैरवाजवी आहे. ती त्वरित रद्द करावी अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना मुख्यमंत्री शिंदे गट यांच्याकडून करण्यात आल्याचे कराड शहर अध्यक्ष राजेंद्र माने यांनी निवेदनाद्वारे कळवले आहे कॉन्ट्रॅक्टर व प्रशासनाच्या चुकीचे खापर कराड मधील नागरिकांवर फोडू नये. तसेच हा प्रकल्प अजून चालू नाही याला कोण जबाबदार? प्रकल्पाशी संबंधित कॉन्ट्रॅक्टरला काळया यादीत टाका व कराडकरांना न्याय द्या...असे या निवेदनात म्हटले आहे

अभिनेत्री राखी सावंतला अटक; आपत्तीजनक व्हिडीओ शेअर केल्याचा राखीवर आरोप ; काय आहे बातमी...

वेध माझा ऑनलाइन - बॉलिवूड अभिनेत्री-डान्सर राखी सावंतबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे. राखी सावंतला पोलिसांनी अटक केल्याचं वृत्त आहे. मुंबईतील अंबोली पोलिसांनी राखीला ताब्यात घेतलं आहे. एका महिलेचा आपत्तीजनक व्हिडीओ शेअर केल्याचा राखीवर आरोप आहे. काही वेळेत अभिनेत्रीला अंधेरी कोर्टात हजर केलं जाणार आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार मॉडेल आणि अभिनेत्री शर्लिन चोप्राने राखी विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आता राखीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शर्लिन चोप्राने स्वतः आपल्या ट्विटर अकाउंटवर ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
शर्लिन चोप्राने ट्विट करत अंबोली पोलिसांनी राखीला अटक केल्याचं सांगितलं आहे. सोबतच शर्लिन चोप्राने आपल्या एफआरआयबाबत अतिरिक्त माहितीसुद्धा नमूद केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, राखीने काही काळापूर्वी मॉडेलचा आपत्तीनजक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल केल्याचा आरोप तिच्यावर लावण्यात आला आहे. या आरोपांतर्गत राखीला अंबोली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Wednesday, January 18, 2023

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या मुलगा आणि सुनेवर 420 चा गुन्हा दाखल ; काय आहे प्रकरण?

वेध माझा ऑनलाइन - राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक सद्धा आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीच्या ताब्यात आहे. तर दुसरीकडे, त्यांचा मुलगा फराज मलिक याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. बनावट कागदपत्र तयार केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे.
नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक याच्यावर दुसरी पत्नी हॅमलीनच्या व्हिसासाठी बनावट कागदपत्र दिल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी फरार आणि त्याची पत्नी हॅमलीन विरोधात सुद्धा पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. हॅमलीनही फ्रांसची नागरिक आहे. कलम 420, 465, 468, 471, 34 IPC नुसार गुन्हा दाखल केला आहे.

2 मार्च 2022 ते 23 जून 2022 दरम्यान कुर्ल्यामध्ये हे बनावट दस्तावज तयार केले आहे. त्यांच्यासह अन्य लोकांवरही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, फराजने जी कागदपत्र दिली होती, त्यामुळे मॅरेज सर्टिफिकेट बोगस असल्याचे समोर आले. Bmc चं विवाह नोंदणी प्रमाणपत्र बनावट असल्याचे उघड झालं आहे. एक वर्षांपूर्वीच कुर्ला पोलिसांना पडताळणीसाठी हे Visa डिपार्टमेंट कडून पाठवण्यात आलं होतं. मात्र तब्बल एक वर्षांपासून कुर्ला पोलिसांकडून फाईलवर कोणतीही कारवाई झाली नव्हती. अखेरीस आता गुन्हा दाखल केला आहे.

छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर होते की स्वराज्यरक्षक होते... उदयनराजे काय म्हणतात ;

वेध माझा ऑनलाइन - राज्यात मागील काही दिवसांपासून राजकीय नेत्यांनी महापुरुषांबाबत आक्षेपार्ह विधानं केली आहेत. नुकतेच हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज  धर्मवीर नव्हे तर स्वराज्यरक्षक होते असे विधान केले होते. यावरुन राज्यात वादंग निर्माण झाले होते. त्यांच्या या विधानावर भाजप आणि शिंदे गटाच्या  नेत्यांनी निषेध व्यक्त केला होता. याच दरम्यान आता छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि भाजप खासदार उदयनराजे भोसले  यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक आणि धर्मवीरही होते, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.

खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक आणि धर्मवीरही होते. शिवाय त्या काळात शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी अनेक मशिदी आणि मंदिरं बांधली. साताऱ्यातील शाही मशिदीची देखरेख आमच्या कुटुंबाकडून केली जाते, असंही उदयनराजे भोसले यांनी सांगितले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
उदयनराज म्हणाले,सर्व धर्म समभाव ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराज यांनी मांडली होती.त्यांनी कोणत्याही जाती-धर्मातील लोकांसोबत भेदभाव केला नाही. प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या सोयीने बोलत असतो. मात्र, शिवाजी महाराज अथवा संभाजी महाराजांनी कधीही कोणत्याही धर्माचा अनादर केला नाही.त्यांनी त्याकाळी मंदिर, मशिद बांधल्या. आजही साताऱ्यातील शाही मशिदीची देखरेख आमच्या कुटुंबाकडून केली जाते. त्यामुळे यावरुन कोणताही वाद घालू नये. कारण दोघेही स्वराज्यरक्षक होते आणि धर्मवीरही होते.


कराड पालिकेचे अभियंता रफिक भालदार आदर्श अभियंता पुरस्काराने सन्मानित ;

वेध माझा ऑनलाइन - कराड येथील परिवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने कराड पालिकेचे अभियंता रफिक दस्तगिर भालदार यांना राज्यस्तरीय आदर्श अभियंता पुरस्कार नुकताच देण्यात आला
कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात आले

कराडचे तहसीलदार विजय पवार नायब तहसीलदार विजय माने संजय गांधी बबनराव तडवी डॉक्टर मनोज पाटील अरुण भिसे कादर नाईकवडी बी एम गायकवाड बहुजन शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रवीण लादे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाज भूषण आप्पासाहेब गायकवाड सचिव बुद्धभूषण गायकवाड सल्लागार राजेंद्र माने विद्या मोरे सुजाता वरे शंकरराव वीर प्रमोद काशीद सचिन कांबळे आनंदराव सव्वाखंडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला..

याप्रसंगी परिवर्तन प्रतिष्ठान चे अध्यक्ष आप्पासाहेब गायकवाड म्हणाले,
समाजात पुढील कार्यासाठी प्रेरणा मिळावी हाच उद्देश ठेवून सदरचा पुरस्कार विविध क्षेत्रातील मान्यवरांना देण्यात आला आहे भालदार  यांनी अभियंता म्हणून गेली 35 वर्षांहून अधिक काळ कराड पालिकेच्या सर्व विभागात काम केले आहे स्वच्छ सर्वेक्षण तसेच माझी वसुंधरा स्पर्धेत त्यांनी आपले मोठे योगदान दिले आहे त्यांच्या आतापर्यंतच्या एकूणच कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे

Tuesday, January 17, 2023

वडिलांच्या निधनानंतर आईचा पुनर्विवाह लाऊन दिला ; कोल्हापूरच्या तरुणाने उचलले क्रांतीकारक पाऊल ;

बंध माझा ऑनलाईन - आईवडील हे मुलांचे लग्न लावून देतात. मात्र, कोल्हापुरात एका तरुणाने आपल्या वडिलांच्या निधनानंतर आईचा पुनर्विवाह लाऊन देण्याचे क्रांतिकारक पाऊल उचलले. कोल्हापुरातील युवराज शेले या तरुणाने हा धाडसी निर्णय घेतला.

मागील दोन वर्षात कोरोनाच्या महामारीमध्ये रत्ना शेले यांच्या सख्ख्या बहिणी आणि भावांचा एकूण तब्बल सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर पतीचंही अपघाती निधन झालं. त्यामुळे हतबल झालेल्या रत्ना यांना सावरण्यासाठी मुलाने आईचा दुसरा विवाह करून देण्याचा चंग बांधला होता. तसेच 12 जानेवारीला त्याचा तो निर्णय पूर्ण झाला.

राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी नगरीत हे क्रांतिकारक पाऊल पडले आणि त्याचे कौतुक सर्वत्र होऊ लागले. कष्टकरी तरूणानं, अनिष्ठ रूढींचं ओझं फेकून देत, एक वेगळा विचार कृतीत आणला. त्यातून खर्‍या अर्थानं माणुसकी, स्त्री सन्मान आणि भावनांचा आदर पहायला मिळाला. करवीर तालुक्यातील शिंगणापूर मधील युवराज हा आई आणि वडिलांसोबत राहत होता. त्याचे वडिल नारायण शेले सेंट्रींग काम करत होते. मात्र, 26 जुलै 2022 ला त्यांना एका वाहनानं धडक दिली. यानंतर उपचार घेत असताना दुर्दैवानं त्यांचा मृत्यू झाला.
यानंतर युवराज आणि त्याच्या आईवर जणू आभाळ कोसळलं. त्याची आई तर या अपघातामुळं खचून गेली. एका खासगी रक्तपेढीमध्ये काम करून आणि सायंकाळच्या वेळीस नृत्य कलाकार म्हणून काम करत उदरनिर्वाह करणार्‍या युवराजनं, स्वतःला सावरत आईला धीर दिला. मात्र, या दुःखातून युवराजची आई बाहेर येत नव्हती. कुटुंब प्रमुखावर काळानं घातलेला घाला, आईचं वैधव्य, त्यातून घरात साचलेलं नैराश्य अशा गोष्टी युवराज अनुभवत होता.
काल परवापर्यंत हसत खेळत काम करणारी त्याची आई अगदीच अबोल झाली होती. एकटी पडली होती. कुंकू नसलेलं कपाळ आणि बांगड्याविना सुने सुने दिसणारे आईचे हात युवराजच्या मनाला अगणित वेदना द्यायचे. शेवटी खुप विचार करून, युवराजनं थेट आपल्या आईचा पुनर्विवाह करण्याचा धाडसी निर्णय घेतला. हा निर्णय ऐकल्यावर समाज काय म्हणेल, असं सांगून आईनं पुनर्विवाहाला स्पष्ट नकार दिला. मात्र, युवराज आपल्या निर्णयावर ठाम होता.
युवराज यांच्या लांबच्या नातेवाईकांपैकी, कर्नाटकातील करजगा गावचे मारूती व्हटकर यांचा 2 वर्षापूर्वी घटस्फोट झाल्यानं तेही एकटेच होते. आपल्या आईचा विवाह, मारूती यांच्याशी करण्याचा निर्णय घेवून युवराजनं त्यांच्याशी संपर्क साधला. परिस्थितीची जाणीव करून देवून, युवराजनं मारूती यांना विवाहासाठी तयार केलं आणि दोघांची संमती मिळाल्यावर, गुरूवारी 12 जानेवारीला शिंगणापूरमध्ये आपल्या आईचा पुनर्विवाह युवराजनं लावून दिला.
या विवाहामध्ये त्यांच्या गल्लीतील नागरिकांनीही मोठी मदत केली. 38 वर्षीय आईच्या भावभावना, इच्छा-आकांक्षा आणि वृध्दत्वामध्ये जोडीदाराची लागणारी गरज या गोष्टी पटवून देवून, युवराजनं आपली आई रत्ना यांना पुनर्विवाहासाठी अखेर तयार केलं. कोल्हापूरच्या तरुणाने घेतला हा धाडसी निर्णय ज्यांनी विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला त्या समाज सुधारकांच्या कार्याला मिळालेली चालना देणारा ठरला आहे.

चोरीला गेलेल्या 43 इलेक्ट्रिक मोटारी पोलिसांकडून हस्तगत ; एकुण 2 लाख 36 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत ; कराड तालुक्यातील 7 जण ताब्यात ;

वेध माझा ऑनलाइन - पेरले व कालगाव ता. कराड गावातील सात जणांनी मिळून कराड तालुक्यातील कालगांव, पेरले, भुयाचीवाडी, खराडे वगेरे गांवामध्ये विहिरीवरील इलेक्ट्रीक मोटारी चोरल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या चोरट्यांच्याकडून ताब्यात घेवून चोरीस गेलेल्या 43 इलेक्ट्रीक मोटारी, गुन्हा करताना वापरलेली हत्यारे, गुन्हा करताना वापरलेली मोटार सायकल असा एकुण 2 लाख 36 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शेतकऱ्यांच्या शेतावरील, विहीरीवरील इलेक्ट्रीक मोटारी चोरी जाण्याचे प्रमाण वाढल्याने पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सपोनि रमेश गर्जे, पोउनि अमित पाटील यांच्या अधिपत्याखाली एक विशेष पथकास तयार केले आहे. या विशेष पथकाने संशयितांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे कसोशिने व कौशल्याने विचारपूस केली. या चोरट्यांनी उंब्रज, औंध, बोरगांव, तळबीड या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत केलेले गुन्हे उघडकीस आले आहेत. यामध्ये अभय जनार्दन चव्हाण, आप्पा रघुनाथ सातपुते, गणेश बाळासोा कांबळे , गणेश महेंद्र चव्हाण सर्व रा. पेरले, ता. कराड, जि. सातारा, शुभम कालिदास जेटीथोर, साहिल कालिदास जेटीथोर, कपिल सत्यवान जेटीथोर सर्व रा. कालगांव, ता. कराड जि. सातारा  अशी सात संशयित चोरट्याची नावे आहेत.सदर कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अरुण देवकर, सपोनि संतोष तासगांवकर, रमेश गर्ज, संतोष पवार, रविंद्र भोरे, पोउन अमित पाटील, मदन फाळके, पोलीस अंमलदार उत्तम दबडे, संतोष पवार, अतिष घाडगे, विजय कांबळे, संजय शिर्के, संतोष सपकाळ, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, मुनीर मुल्ला, निलेश काटकर, गणेश कापरे, विशाल पवार, मोहन पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, धीरज महाडीक, वैभव सावंत, पृथ्वीराज जाधव यांनी कारवाईत सहभाग घेतला.

शिंदे गटाचे 7 जिल्हाप्रमुख बोगस? ठाकरे गटाचा आक्षेप;

वेध माझा ऑनलाइन - शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाकडे जाणार याचा निर्णय आजही लागला नाही. केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुरू असलेली ही सुनावणी आता शुक्रवारी, 20 जानेवारीला होणार आहे. दरम्यान, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगामध्ये सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचे पुरावे समोर आले आहे. शिंदे गटाचे महेश जेठमलानी यांनी नुकताच निवडणूक आयोगासमोर आम्ही सादर केलेला कागदपत्रांमध्ये कुठलीही त्रुटी नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्ट यावर काय निर्णय घेतं? हे दोन्ही गटाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे.

ठाकरे गटाचा आक्षेप काय?
शिंदे गटाने सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. निवडणूक आयोगाला देण्यात आलेल्या एफिडेव्हिटमध्ये माजी विरोधी पक्ष नेता म्हणून विजय चौगुले यांचं नाव आहे. मात्र, शिंदे गटाने सादर केलेल्या खऱ्या शिवसेनेचा दावा केलेल्या यादीत ते जिल्हाप्रमुख म्हणून दाखवण्यात आले आहेत. अशी अनेक नावे या यादीत असल्याचा ठाकरे दावा गटाने केला आहे. यावर निवडणूक आयोगात आक्षेप घेण्यात आला आहे.

ठाकरे गटाने 7 जिल्हाप्रमुखांवर आक्षेप घेतले आहेत. राजाभाई केणी, तालुकाप्रमुख पदावर असताना रायगडचे जिल्हाप्रमुख दाखवले. राम चंद्रकांत रघुवंशी, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद यांना नंदुरबारचे जिल्हाप्रमुख दाखवले. किरसिंग वसावे, माजी परिषद सदस्य असताना नंदूरबारच जिल्हाप्रमुख दाखवले. नितीन मते माजी जिल्हाप्रमुख असताना चंद्रपूरचे जिल्हाप्रमुख दाखवले. दत्तात्रय साळुंके, जिल्हा समन्वयक असताना धाराशीवचे जिल्हाप्रमुख दाखवले. तर सुरज साळुंखे, युवा सेना राज्य विस्तारक असताना धाराशीव जिल्हाप्रमुख दाखवले असा ठाकरे गटाचा आक्षेप आहे

 

हॅलो महाराष्ट्राचे सकलेन मुलानी राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित... मान्यवरांच्या हस्ते झाला पुरस्कार वितरण सोहळा

वेध माझा ऑनलाइन - राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून कराड येथील परिवर्तन प्रतिष्ठांच्या वतीने हॅलो महाराष्ट्राचे सकलेन मुलाणी यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले कराडचे तहसीलदार विजय पवार नायब तहसीलदार विजय माने संजय गांधी बबनराव तडवी डॉक्टर मनोज पाटील अरुण भिसे कादर नाईकवडी बी एम गायकवाड बहुजन शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रवीण लादे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाज भूषण आप्पासाहेब गायकवाड सचिव बुद्धभूषण गायकवाड सल्लागार राजेंद्र माने विद्या मोरे सुजाता वरे शंकरराव वीर प्रमोद काशीद सचिन कांबळे आनंदराव सव्वाखंडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.. 

परिवर्तन संस्थेच्या वतीने दिले जाणारे पुरस्कार हे समाजाला प्रेरणा देणारे आहेत असे मत विजय पवार यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या मोरे यांनी केले उपस्थित मान्यवरांचे स्वागत आप्पासाहेब गायकवाड यांनी केले यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले या पुरस्कार वितरण सोहळ्यास कराड शहर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

अभयकुमार देशमुख यांच्या मसनवाटा व वुई हेट बायोलाॅजिकल वाॅर पुस्तकाचे प्रकाशन ;

वेध माझा ऑनलाइन ; वाचक अन् लेखकांची संख्या वाढण्यासाठी युवा लेखक तयार होण्यासाठी प्रयत्नवादी राहिले पाहिजे. प्लेग, कोरोना असे जेव्हा केव्हा पन्नास, शंभर वर्षानी आजार, साथ येईल. तेव्हा अभयकुमार देशमुख यांचे वुई हेट बायोलाॅजित वाॅर हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास माजी सहकारमंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.कराड येथील अभयकुमार देशमुख यांच्या मसनवाटा व वुई हेट बायोलाॅजिकल वाॅर पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दै. सकाळचे सातारा आवृत्तीचे सहयोगी संपादक राजेश सोळस्कर अध्यक्षस्थानी होते. निमसोडचे माजू सरपंच मोहन देशमुख, विठ्ठलराव देशमुख, जेष्ठ पत्रकार शशिकांत पाटील, गोरख तावरे, हेमंत पवार, सचिन शिंदे, अशोक मोहने, संदीप चेणगे, विकास भोसले, पराग शेणोलकर, शरद गाडे, संतोष वायदंडे यांच्यासह पत्रकार, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

आमदार पाटील म्हणाले, ज्या वयामध्ये पत्रकारीता करतो. त्या वयात कांदबरी लिहीणे ही कौतुकास्पद बाब आहे. आज वुई हेट बायोलाॅजीकल वाॅर व मसनवाटा अशा दोन कादंबऱ्या प्रकाशीत करत आहोत. त्या दोन्ही कादंबऱ्यांमध्ये पिढी बदलतानाचा प्रवास लिहीला आहे. अलीकडच्या लेखक व वाचकांची संख्या घटत असलेल्या स्थितीत देशमुख यांनी चोखाळलेली वेगळी वाट कौतुकास्पद आहे. नव्या लेखकांनी तयार व्हावे, नव्या वाटा धुंडाळाव्यात त्याशिवाय इतिहास कळणार नाही. अनेक पत्रकार त्यांच्या व्यवसायात आलेले अनुभव लिहीतीत. मात्र अभयने सामाजिक भान असलेले लिखाण केले. ते कौतुकास्पद आहे. चीनमधून आला हेही खर आहे. काळजी घेतली गेली नाही. हेही समजून घ्यायला हवे. जास्त फकटा बसला. तज्ञ सांगत होते तेही एकल नाही. तीन लाख लोक घरवापसी झाली. मात्र त्या लोकांनी ऐकल नाही. योग्य यंत्रणेने कोरोनाच्या दाहकतेची माहिती दिली नसल्याने मोठे नुकसान झाले. यापुढे आता काळजी घ्यावी लागेल.

संपादक राजेश सोळसकर म्हणाले, कोरोनाचा कालवधी सर्वांसाठी अवघड व कठीण कालवधी होता. या काळात आपण अनेक जवळची माणसे गमावली. ज्या स्वतःसह कुटूबांची जबाबदारी महत्वाची होती. त्या काळात जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्विकारलेल्या आमदार बाळासाहेब पाटील यांनी जिल्ह्याला सावरले. त्याचे नेतृत्व महत्वाचे ठरले. कोरोना काळात जबाबदारी लक्षात ठेवून त्यांनी काम केले. वास्तिवक तज्ञांनाही मान्य आहे, की कोरोना चीनने जाणीवपूर्वक पसरवला. महासत्ता होण्यासाठी चीन कोणत्याही थराला जावू शकतो. त्यासाठी त्यांनी अमेरिकेला लक्ष करत त्यांची अर्थव्यवस्था खिळखिळू करण्याचा डाव आखला होता. मात्र जगभरतत कोरोनाने फार बदल घडवले. कोरोनानंतर व पूर्व अशी जगात ओळख झाली. त्याची फार मोठी किंमत मोजावी लागली. अशा संनेदनशील विषयांना हात घातला तो कौतुकास्पद आहे. अभयकुमार देशमुख यांनी प्रास्ताविक केले. संतोष गिरी व सौ. विभुते यांनी सुत्रसंचलन केले.