दरम्यान मी मुख्यमंत्री असताना तर मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं मग हे सर्वोच्च न्यायालयांमध्ये ते आरक्षण का टिकल नाही याची सर्वांना कल्पना आहे असंही फडणवीस म्हणाले... तसेच या विषयावरून विरोधकांनी वाहत्या गंगेत हात धुवून घेऊ नये असेही फडणवीसांनी विरोधकांना म्हटले आहे
आताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः समिती तयार केलेली आहे ती त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे आणि ज्या वेगवेगळ्या मागण्या आल्या त्यावर सुद्धा काम करत असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले. म्हणून मला सर्वांना आवाहन करायच आहे की मराठा आरक्षण संदर्भात सरकार गंभीर असल्यामुळे कोणीही कायदा आपल्या हाती घेऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले. या संपूर्ण घटनेची चौकशी देखील केली जाणार असून कोणाचीही चूक असेल तर निश्चितपणे त्याच्यावर ही कारवाई केली जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले. सगळ्यांनी शांतता पाळण्याचे आवाहनही फडणवीस यांनी केले. राजकीय पक्षांनीदेखील वाहत्या गंगेत हात धुवून घेऊ नये असेही फडणवीसांनी विरोधकांना म्हटले.
No comments:
Post a Comment