वेध माझा ऑनलाइन। जालन्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे यांच्या उपोषणाला आठ दिवस पूर्ण झाले आहेत, पण हे राज्यभरातील आंदोलन काही थांबण्याचे नाव घेत नाही. असे असताना, कॉँग्रेसचे आमदार आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी, ‘ मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण द्या,’ अशी मागणी केली आहे. तर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी,’मराठा आणि ओबीसीमध्ये भांडणे लावून देऊ नका’, अशी भूमिका घेतलेली असतानाच, राज्याचे मंत्री आणि संत परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनी,’ओबीसी आरक्षण अबादीत ठेऊन मराठ्यांना आरक्षण द्या,’ अशी भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे येत्या काळात आरक्षणावरून मराठा- ओबीसी संघर्ष अधिक टोकदार होणार आहे.
२०१६ पासून सकल मराठा समाज या बॅनरखाली मराठा समाज मूक मोर्चातून आपली मागणी लावून धरत आहे. तेव्हाच्या देवेंद्र फडणवीस सरकारने मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी मागासवर्ग आयोग निर्माण केला. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखालील या आयोगाने आपला अहवाल दिला होता. तो तत्कालीन फडणवीस सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सुपूर्त केला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात याबाबची याचिका प्रलंबित आहे. जेव्हा हे प्रकरण न्यायालयात गेले तेव्हा ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असा मुद्दा आला होता, तेव्हा छगन भुजबळ आणि ओबीसी नेत्यांनी त्यास विरोध केला होता, हा इतिहास आहे.
No comments:
Post a Comment