वेध माझा ऑनलाइन। जालना येथील अंतरवेली सराटीमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या तरुणांवर पोलिसांनी लाठीमार केला. या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आता राज्यात ठिकठिकाणी आंदोलने तसेच बंदची हाक देण्यात येत आहे. कराड तालुका मराठा सकल समाजाच्यावतीने शहरात आज निषेध आंदोलन करण्यात आले
यावेळी प्रशासनाला 15 दिवसाचा अल्टिमेट देण्यात आला आहे या काळात आंदोलकांवर टाकलेल्या केसेस मागे घ्याव्यात तसेच आंदोलकांवर लाठीहल्ला करणाऱ्या संबधित पोलिस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई व्हावी आणि गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा 15 सप्टेंबरनंतर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही सकल मराठा समाजाच्या वतीने आज कराडात देण्यात आला
दरम्यान आज दत्त चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करुन सरकारचा व प्रशासनाचा निषेध नोंदवला तसेच लाठीमार करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली प्रशासकीय इमारत मार्गावर मोर्चाही काढण्यात आला. प्रशासकीय इमारतीसमोर आंदोलकांनी ठिय्या मांडत प्रशासनाला रस्त्यावर बोलवून निवेदन दिले लोकांनी आज बंद ठेवावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
No comments:
Post a Comment