वेध माझा ऑनलाइन। जालना येथील आंदोलन करत असलेल्या मराठा समाज बांधवांच्यावर पोलिसांनी केलेल्या अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी मराठा क्रांती मोर्चाने सातारा जिल्हा बंदची हाक दिली. मराठा क्रांतीच्या हाकेला संपूर्ण जिल्हा धावून गेला. जिल्ह्यात सातारा, कराड, पाटणसह फलटण येथील विविध व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवत पाठींबा दिला.
सातारा जिल्ह्यात सकाळ पासूनच व्यावसायिकांनी दुकाने, खासगी वडाप वाहतूकदार, एसटी प्रशासनाने आपली वाहने जागेवरच ठेवत बंदला पाठिंबा दिला. सातारा शहरातील भाजीमंडई वगळता सातारा शहरात सर्व व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. बंदच्या पार्श्वभुमीवर सातारा येथील पोवई नाक्यावर पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. जिल्हा बंदमुळे सकाळपासूनच बाजारपेठेत शुकशुकाट होता. सातारा एसटी आगारातही शुकशुकाट जाणवत होत्या.या आजच्या बंदमुळे पुन्हा एकदा जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एकजुट पहायला मिळाली.तसेच कराडच्या ग्रामीण भागात जाणारी एसटी सेवा कराड आगारातून बंद ठेवण्यात आली त्यामुळे तातडीच्या कामाला येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी खाजगी वाहनाचा वापर केला. दरम्यान या जिल्हा बदला कराड शहरासह तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला. दुकानदार व व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे दुकाने व्यवसाय बंद ठेवून या बंदला प्रतिसाद दिला. बऱ्यापैकी व्यवहार बंद असलेले पहायला मिळाले
No comments:
Post a Comment