वेध माझा ऑनलाइन। पुसेसावळी घटनेच्या पार्श्वभूमीवर कराडमध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्याचे डी वाय एस पी अमोल ठाकूर यांनी आज आवाहन केले अमोल ठाकूर यांच्या आवाहनाला हिंदू व मुस्लिम समाजाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे
पुसेसावळी येथे झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर कराड येथील हिंदू व मुस्लिम बांधवांची बैठक डी वाय एस पी अमोल ठाकूर यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती यावेळी कराडमध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी हिंदू मुस्लिम बांधवांनी सहकार्य करावे असे आवाहन डी वाय एस पी अमोल ठाकूर यांनी केले यावेळी हिंदुत्ववादी संघटनांनी आम्ही शांतता प्रिय असून कराडच्या शांततेला तडा जाईल असे कोणतेही काम करणार नाही किंवा मोर्चाही काढणार नाही असे आश्वासन दिले तसेच मुस्लिम बांधवांनी मुस्लिम समाज शांतता प्रिय असून कोणत्याही प्रकारे रस्त्यावर उतरून शांतता बिघडणार नाही तसेच मोर्चाही काढणार नाही असे आश्वासन दिले यावेळी हिंदू व मुस्लिम बांधवांकडून सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या बैठकीत करण्यात आली या बैठकीस
विनायक पावस्कर अजय पावसकर रुपेश मुळे
चंद्रकांत जिरंगे राहुल यादव तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते याबरोबरच अल्ताफ शिकलगार ईसाक बागवान रफीक मुलानी फारुख पटवेकर ईसुफ भाई पटेल आदी उपस्थित होते
No comments:
Post a Comment