Tuesday, September 5, 2023

खेळाडूंच्या जर्सीवर इंडिया नाही तर आता भारत म्हणून उल्लेख? सेहवागची बीसीसीआयकडे मागणी ! ...

वेध माझा ऑनलाइन। भारताचा माजी क्रिकेटपटू आणि धडाकेबाज सलामीवीर विरेन्द्र सेहवाग हा त्याच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आला आहे. मंगळवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडल वरुन आगामी क्रिकेट विश्वचषकासाठि भारतीय संघ जाहीर केला. संघात सामील असलेल्या खेळांडूंचा एक विडिओ पोस्ट करत वि आर टीम इंडिया  असा कॅप्शन दिला आहे ह्यावर सेहवागने प्रतिक्रिया देत आपली नाराजी व्यक्त केली आहे.

विरेन्द्र सेहवागने आपल्या ट्विटर पोस्टद्वारे बीसीसीआय आणि जय शाह यांना एक विशेष विनंती केली आहे. “माझा नेहमीच असा विश्वास आहे की आपल्यामध्ये अभिमान जागृत करणारे नाव असावे. आम्ही भारतीय आहोत, इंडिया हे ब्रिटीशांनी दिलेले नाव आहे. आमचे मूळ नाव ‘भारत’ अधिकृतरीत्या परत मिळण्यास बराच काळ लोटला आहे. मी बी सी सी आय आणि जय शाह यांना आग्रह करतोय की या विश्वचषकात आपल्या खेळाडूंच्या छातीवर भारत असा उल्लेख असावा.”
तर दुसऱ्या एक पोस्ट मध्ये सेहवाग म्हणतो, “टीम इंडिया नाही टीम भारत. या विश्वचषकात आपण कोहली, रोहित, बुमराह, जड्डू यांचा जयजयकार करत आहोत, आपल्या हृदयात भारत असू दे आणि खेळाडूंंनी “भारत” नाव असलेली जर्सी घालावि.”

No comments:

Post a Comment