वेध माझा ऑनलाइन। राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण पेटले आहे. मराठा समाजाला सरकसकट कुणबी आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी मोर्चे आंदोलन केले होते. मात्र सरकार आरक्षणाच्या गप्पा करत असल्याचा आरोप मराठा समाजातील बांधवांनी केला आहे. राज्यात ओबीसी प्रवर्गात मराठी समाजाला सामावून घेण्यासाठी मागणी केली जात असताना, दुसरीकडे ओबीसी समाजातील बांधवांनी मोर्चे काढले आहेत. यावरून ओबीसी समाजातील नेते छगन भुजबळांना मतदान न करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाने घेतला आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा आरक्षण हक्क परिषदेने मनोज जरांगे-पाटील यांना मराठा आरक्षणाची धुरा दिली आहे. तर जातनिहाय गणना व्हावी, यामुळे मराठा लोकसंख्या लक्षात येईल. राज्यात सध्या ओबीसी नेते मराठा आरक्षणाविरोधात मोर्चे काढत आहेत. यावर नेमके काय करता येईल यावर या परिषदेत चर्चा करता येईल. यानंतर ठराव पास करण्यात येईल, असे काळकुटे म्हणाले आहेत.
१९९४ साली शदर पवारांनी ओबीसी समाजाला आरक्षण दिले होते. त्यांनी ज्या पद्धतीने आरक्षण दिले होते. त्या पद्धतीने आरक्षण द्यावे. पंतप्रधान नरेद्र मोदी हे त्यांचे मित्र आहेत. त्यांनी त्यांची मदत घेऊन आरक्षण द्यावे.
मराठा आरक्षणावेळी मराठा समाजातील बांधवांवर गुन्हे दाखल केले होते ते मागे घ्यावे. असे काही ठराव मराठा आरक्षण हक्क परिषदेत घेण्यात आले आहेत.
No comments:
Post a Comment