वेध माझा ऑनलाइन। मराठा समाजाचे क्रांतीसुर्य मनोज जरांगे-पाटील यांची जाहीर सभा कराड येथे १७ नोव्हेंबरला छत्रपती शिवाजी स्टेडीयमवर सायंकाळी सात वाजता सभा होणार आहे. त्यासंदर्भात पोलिस प्रशासन आणि मराठा समन्वयक यांची बैठक झाली. त्यानुसार सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात येत असुन सभेची तयारीही पुर्णत्वाकडे आली आहे.
मराठा समाजातील आबावलवृध्दांशी संवाद साधण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे कराडला येत आहेत. त्यांच्या सभेसाठी कराड, पाटण, सातारा, खटाव, कडेगाव, शिराळा, तालुक्यातील मराठा बांधव मोठ्या संख्येने येणार आहेत. त्याचा विचार करुन नुकतीच पोलिस उपाधिक्षक अमोल ठाकुर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी, वाहतुक विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक चेतन मछले यांच्याशी मराठा समन्वयकांची बैठक झाली. त्यात सुरक्षा, पार्किंग व अन्य वाहतुकीच्या विषयासंदर्भात चर्चा झाली. सभेसाठी गावोगावी जनजागृतीसाठी बैठका घेण्यात येत आहेत.
No comments:
Post a Comment