वेध माझा ऑनलाइन। यशवंतनगर (ता. कराड) येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने आज जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फोडली. सर्वात प्रथम दर जाहीर करताना 3100 रुपयाचा पहिला हप्ता जाहीर केला.
गेल्या एक महिन्यापासून गळीत हंगामाला सुरुवात झाली आहे. तरीही कोणीही दर जाहीर केला नव्हता. या पार्श्वभूमीवर आज जिल्ह्यातील सर्व सहकारी, खाजगी साखर कारखाने, शेतकरी संघटना व जिल्हा प्रशासन यांची बैठक आज सातारा येथे पार पडली. या बैठकीत सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी कारखान्याचा पहिला हप्ता 3100 रुपये सर्वात प्रथम जाहीर केला.
सह्याद्री कारखान्याने सन 2023- 24 च्या गळीत हंगामात येणाऱ्या उसाला पहिला हप्ता 3100 रुपये जाहीर केल्याने ऊस उत्पादक शेतकरी वर्गातून आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वात प्रथम उसदर जाहीर करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या सह्याद्रीने दिलासा दिला आहे दरम्यान इतर कारखान्यांनीही ३१०० रुपयांच्या आसपास आपलेही दर जाहीर केले
No comments:
Post a Comment