वेध माझा ऑनलाइन। कराड येथील त्रिंबके हॉस्पिटलमध्ये जन्मजात बालकाचा आज मृत्यू झाला डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे.
नातेवाईकांनी सांगितलं की........
डॉक्टरांनी सर्व काही व्यवस्थित असल्याचे सांगून सिझेरियन करावे लागेल असे सांगितले नातेवाईक त्यासाठी तयार झाले दरम्यान डिलेव्हरी झाल्यानंतर बाळाची कंडीशन डाऊन असल्याचे डॉक्टरांनी सांगितले तसेच दवाखान्यात कुठल्याही प्रकारची सुरक्षितता नाही ॲम्बुलन्स सुविधा नाही तुम्हीच अब्युलन्स आणा अस डॉक्टरांनी पेशंट च्या नातेवाईकांना सांगितले पेशंटला तात्काळ दुसरीकडे हलवायची सुविधा या हॉस्पिटलकडे नाही अशा असुविधांमुळे आणि डॉक्टरांच्या चुकीच्या ट्रीटमेंटमुळे आणि हलगर्जीपणामुळे बाळाचा हाकनाक मृत्यू झाला आहे असा आरोप नातेवाईकांनी केला आहे संबंधित डॉक्टरला शिक्षा व्हावी तसेच हे हॉस्पिटल बंद करावे अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.
No comments:
Post a Comment