Friday, November 3, 2023

कराडच्या मुजावर कॉलनीतील झालेल्या स्फोटाचा दुसरा बळी ; शरीफ मुल्ला यांचा मृत्यू , ... दोन दिवसांपूर्वी उपचारादरम्यान त्यांच्या पत्नीचे झाले होते निधन ;

वेध माझा ऑनलाइन। 
कराडच्या मुजावर कॉलनीतील अचानक झालेल्या स्फोटामुळे जखमी झालेल्या शरीफ मुल्ला यांचाही आज उपचार सुरू असताना मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नी सुलताना मुल्ला यांचाही उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. हा स्फोट नेमका कशाने झाला हे अद्याप प्रशासनाने सांगितले नसल्यामुळे ते आजही गूढ लोकांच्या मनात कायम आहे दरम्यान  गॅस गळती हे प्राथमीक कारण पोलिसांनी सांगितले आहे

काही दिवसांपूर्वी कराडच्या मुजावर कॉलनीत अचानक स्पोट झाला. या स्फोटामुळे परिसरातील काही घरांचे नुकसानही झाले. त्यात मुल्ला कुटुंबीयही होते  यामध्ये त्या परिसरातील एकूण सात जण जखमी झाल्याची माहिती होती. यात शरीफ मुल्ला व त्यांच्या पत्नी यांच्यावर कराडच्या कृष्णा हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते दोन दिवसांपूर्वी शरीफ मुल्ला यांच्या पत्नी सुलताना मुल्ला यांचे उपचारा दरम्यान निधन झाले होते आज शरीफ मुल्ला यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे नेमका हा स्फोट झाला कशामुळे? हा प्रश्न लोकांच्या मनात अद्यापही आहे तरी गॅस गळती हे प्राथमिक कारण प्रशासनाने याबाबत सांगितलेले आहे


No comments:

Post a Comment