Sunday, November 19, 2023

कराडच्या सोमवार पेठेत भारत- ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप अंतिम क्रिकेट सामन्याचा लाईव्ह थरार पाहण्यासाठी तौबा गर्दी ; युवा नेते दीपक पाटील व बाल गणेश मंडळाच्या वतीने live प्रक्षेपण पाहण्याची सोय ;


वेध माझा ऑनलाइन । आज भारत विरुद्ध आस्ट्रेलिया हा वर्ल्डकप क्रिकेटचा अंतिम सामना सुरू आहे या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहण्याची सोय कराडच्या सोमवार पेठ पाण्याची टाकी येथे स्क्रीन लावुन केली आहे सोमवार पेठेतील श्री बाल गणेश मंडळ व युवा नेते दीपक पाटील मित्र परिवाराच्या वतीने याठिकाणी स्क्रीन लावुन क्रिकेट शौकीनांसाठी केलेल्या या खास सोईबाबत दीपक पाटील व बाल गणेश मंडळाचे सर्वत्र कौतुक होतं आहे

युवा नेते दीपक पाटील हे नवनवीन सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी परिचित आहेत त्यांनी आतापर्यंत रक्तदान शिबिर सर्वरोग निदान शिबीर तसेच विविध इतर उपक्रम राबविण्यात याठिकाणी पुढाकार घेतला आहे कोविड काळात त्यांनी मास्क सॅनिटायझर चे वाटप भाजीपाला तसेच किराणा माल वाटप केल्याचे सर्वजण जाणतात भाजपचे ते सक्रिय कार्यकर्ते आहेत त्यांचा वाढदिवस याच गणेश मंडळातर्फे  नुकताच साजरा करण्यात आला त्यावेळी आवर्जुन भाजप नेते डॉ अतुल भोसले यांनी त्याठिकाणी हजेरी लावून त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या

सोमवार पेठेतील जनतेच्या मदतीसाठी नेहमी अग्रेसर असणाऱ्या दीपक पाटील यांनी बाल गणेश मंडळाच्या साह्याने आज सध्या सुरू असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप क्रिकेट सामना पाहण्याचा आनंद युवक महिला व सर्वच  नागरिकांना घेता यावा या भावनेने त्याठिकाणच्या पाण्याची टाकी येथे स्क्रीन लावून हा सामना पाहण्याची विषेश सोय केली आहे त्यांनी राबवलेल्या या उपक्रमाचेही भरभरून कौतुक होत आहे सोमवार पेठेतील नागरिकांसह शहरातील क्रिकेट प्रेमींनी याठिकाणी मोठी गर्दी केली आहे हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सोमवार पेठेतील सामाजिक कार्यकर्ते अजय उंडाळकर, तुषार देशपांडे विराज पाटील मंदार पाटील व चिक्या मोहिते यांच्यासह मंडळाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले

No comments:

Post a Comment