Wednesday, November 22, 2023

शरद पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी ; अजित पवार गटाला घेरण्यासाठी शरद पवार गटाकडून प्रयत्न सुरू !;

वेध माझा ऑनलाइन। शरद पवार गट अजित पवार गटाच्या विरोधात आक्रमक झाला आहे. प्रफुल पटेल यांच्याविरोधात शरद पवार गट आक्रमक झाल्याची माहिती मिळत आहे. अजित पवार  गटाचे राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेलांचं राज्यसभेचं सदस्यत्व रद्द करावं या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळानं उपराष्ट्रपतींची भेट घेतली आहे. दरम्यान, शरद पवार गटाच्या शिष्टमंडळात सुप्रिया सुळे शरद पवार गटाच्या राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण यांचा समावेश आहे. 

प्रफुल पटेल यांचं राज्यसभेच सदस्यत्व रद्द करण्यात यावं, या मागणीसाठी शरद पवार गटाच्या शिष्टमंडळानं थेट राज्यसभेचे सभापती जगदिप धनकड यांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे. 4 महिन्यांपूर्वी दहाव्या अनुसूचीनुसार, पक्षविरोधी कृती केल्यामुळे कारवाई करण्यासाठी मागणी करून देखील कारवाई न झाल्यानं शरद पवार गटाच्या शिष्टमंडळानं भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याआधी वंदना चव्हाण यांच्याकडून राज्यसभेचे सभापती जयदीप धनकड यांना पत्राच्या माध्यमातून आठवण देखील करून देण्यात आली होती.

No comments:

Post a Comment