वेध माझा ऑनलाइन। स्व. नगराध्यक्ष कै. जयवंतराव ज्ञानदेव जाधव यांच्या ५८ व्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबीर नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डॉ. आशुतोष जयवंतराव जाधव यांनी दिली.
गुरुवार दि. ९ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी १० ते सायं. ४ वाजेपर्यंत लिंगायत मठ (नेहरू चौक), कराड येथे शिबीर होणार आहे. समाजातील सर्व घटकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. असे आवाहन डॉ. आशुतोष जयवंतराव जाधव यांनी केले आहे.
स्वर्गीय जयवंतराव जाधव यांनी कराडमधील अनेक गोरगरीब जनतेची सेवा केलेली आहे. त्याचबरोबर अनेकांना मदत करून अर्थसहाय्य केले होते. समाजातील विविध घटकातील गोरगरीब, पिढीत, दुर्लक्षित, उपेक्षित समाजातील व्यक्तींना, युवकांना मदत करणे हा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्या पश्चात आम्ही यांनी सुरू ठेवलेला समाजसेवेचा वसा आणि वारसा कायम सुरू ठेवण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही डॉ. आशुतोष जाधव यांनी सांगितले
No comments:
Post a Comment