वेध माझा ऑनलाइन। : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कुणाचा याबाबत आज निवडणूक आयोगात सुनावणी पार पडेल. निवडणूक आयोगात आपली बाजू मांडण्यासाठी शरद पवार गटाचा आजचा शेवटचा दिवस असेल. यानंतर गुरुवारपासून अजित पवार गट आपली भूमिका मांडणार आहे. यापूर्वी शरद पवार गटाच्या वतीने अजित पवार गटाने खोटी कागदपत्र सादर केलीय, राष्ट्रीय कार्यकारणी सहभागी सदस्यांची खोटी माहिती दिली, असे आरोप करत कायदेशीर कारवाई करत तत्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी केली होती. त्यामुळे आजची सुनावणी महत्वाची असणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची यासंदर्भात महत्त्वाची सुनावणी आज निवडणूक आयोगात होणार आहे. दुपारी 4 वाजता निवडणूक आयोगात ही सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे. यामध्ये राष्ट्रवादी नेमकी कोणाची याबाबत निवडणूक आयोग दोन्ही गटांचे म्हणणे ऐकून घेईल. त्यामुळे या सुनावणीकडे संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे.
यापूर्वी शिवसेना कोणाची याबाबत निवडणूक आयोगात बऱ्याच दिवस सुनावणी चालली होती. आता त्याचप्रमाणे राष्ट्रवादी कोणाची याबाबतचा लढा निवडणूक आयोगात जाऊन पोहचला आहे. त्यामुळे यावर सुनावणी घेण्यात येत आहे. यावेळी अजित पवार गट आणि शरद पवार गट दोन्हीकडून मोठ्या प्रमाणात पुरावे सादर करण्यात आले आहे. मात्र, अजित पवार गटाकडून सुमारे 20 हजार बोगस शपथपत्रकं दाखल करण्यात आल्याचा आरोप गेल्या सुनावणीवेळी शरद पवार गटाने केला होता. त्यामुळे यावर आजच्या सुनावणीत काही निर्णय येतो का? हे पाहणं महत्वाचे असणार आहे. सोबतच शरद पवार यांना राष्ट्रवादी पक्ष मिळणार की अजित पवार यांना याकडे संपूर्ण महाराष्ट्रसह देशाचे लक्ष लागलं आहे.
No comments:
Post a Comment