Thursday, November 16, 2023

आज ओबीसी समाजाची होणार एल्गार महासभा ; जरांगे - पाटील यांनी घेतलेल्या ठिकाणीच होणार सभा ; मोठ्या संख्येने उपस्थित रहा : छगन भुजबळ यांचे ट्विटद्वारे आवाहन ;


वेध माझा ऑनलाइन। 
राज्यात अनेक दिवसांपासून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात सामावून घेण्यासाठी सरकरकडे मागणी केली आहे. मात्र सरकार यावर कोणतेही पाऊल उचलत नसल्याचे मराठा समाजाचे म्हणणे आहे. या आरक्षणावरून मराठा  समाजातील अनेक तरूणांनी आत्महत्या केल्या आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचे वारंवार सांगत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे पण ते इतर कोणत्याही समाजातील आरक्षणाला धक्का न लागता दिले जाणार असल्याचा दावा सरकारने केला आहे. ओबीसी समाजाने याविरोधात प्रतिसभा आयोजित केली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी पहिली सभा ही अंबड तालुक्यात घेतली. तर आता ओबीसी समाजही अंबड तालुक्यात सभा घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

ओबीसी नेते छगन भुजबळ आणि मनोज जरांगे-पाटील यांच्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून अनेकदा वाद झाले. यावर छगन भुजबळ यांनी ७०० कोटी रूपये आले कुठून असा सवाल देखील केला होता. एकरच्या एकर सपाट करत सभा घेत असल्याचे वक्तव्य भुजबळांनी केले होते. दरम्यान, काही दिवसांआधी मराठा आरक्षण हक्क ठराव परिषदेची बैठक झाली. या बैठकीत मराठा समाजाने छगन भुजबळ यांना मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणाविरोधात छगन भुजबळ काम करत असल्याचा मराठा समाजाचा दावा आहे. मराठा समाज हा ओबीसी समाजात घुसखोरी करत असल्याचे ओबीसी बांधवांनी आरोह केला आहे. या विरोधात ओबीसी समाजाने अंबड तालुक्यात ओबीसी एल्गार महासभेची घोषणा केली आहे, ही सभा आज (१७ नोव्हेंबर) दिवशी सकाळी ११ वाजता असणार आहे. याबाबत ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.

काय आहे ट्वीट...
एक दिवस भविष्यासाठी, ओबीसींच्या पुढील पिढ्यांचे भविष्य वाचविण्यासाठी एकजुटीने उभे राहूया, जगाला आपली ताकद दाखवून देऊया! ओबीसी एल्गार महासभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहा! असे आवाहन छगन भुजबळांनी केले आहे. त्यांनी एक पोस्टर शेअर करत ओबीसी समाजातील नेत्यांवर झालेल्या हल्ल्याबाबत आणि समाजाला होणारा त्रास पोस्टरवर नमूद करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment