Thursday, November 16, 2023

जरांगे - पाटील यांच्यामागून कोणीतरी बोलतंय’? राज ठाकरेंना शंका ;

वेध माझा ऑनलाइन। राज्यात निवडणुका सुरू होण्यापूर्वीच निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. कोणी सत्ताधारी पक्षावर टीका करत आहेत तर सत्ताधारी विरोधकांवर टीका करत आहेत. राज्यात सध्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी मराठा बांधव रस्त्यावर उतरले आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित मुद्द्यावर सरकार आरक्षण द्यायला तयार नाही. यासाठी सकल मराठा समाजाने आंदोलन, उपोषण केले. निवडणुकांच्या तोंडावर आरक्षणाचा मुद्दा लावून धरला जातो. यामुळे आता मनोज जरांगे कोणाच्या सांगण्यावरून उपोषण करतात. असे अनेकदा चर्चेचा विषय ठरतो. राज ठाकरेंनी मुंबईतील पत्रकार परिषदेत याबाबत वक्तव्य केलं मी जरांगेंना सांगितले होते असं आरक्षण मिळणार नाही. यामागे कोणी तरी आहे, हे लवकरच समोर येईल. असे वक्तव्य राज ठाकरेंनी केले असून त्यांनी शरद पवारांनादेखील धारेवर धरलं आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून काही दिवसांआधी शरद पवारांच्या जातीच्या दाखल्याची चर्चा होती. यावेळी शरद पवारांनी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या जातीच्या दाखल्यावर तो दाखला खोटा असल्याचा दावा केला. मला माझ्या जातीचा अभिमान आहे, सर्वांना माहित आहे की, माझी जात कोणती आहे. यावर आता राज ठाकरेंनी शरद पवारांवरही निशाणा साधला आहे. स्वत:च्या जातीबद्दल प्रेम असणे हे महाराष्ट्राला योग्य. पण जातीत द्वेश निर्माण करणे हे महाराष्ट्रात राष्ट्रवादी पक्षानंतर सुरू झाले. यांच्या स्वार्थापायी आपण महाराष्ट्र खड्यात घालतोय. मी जात मानत नाही, मी माणसाला महत्व देतो. असे म्हणत राज ठाकरेंनी शरद पवारांवर टीकेचे बाण सोडले आहेत

No comments:

Post a Comment