Sunday, November 19, 2023

शरद पवार यांनी आपण मराठा की ओबीसी आहोत हे जाहीर करावं ; प्रतापराव जाधव यांचे आव्हान ;

वेध माझा ऑनलाइन। शरद पवार यांनी आपण मराठा की ओबीसी जाहीर कराव असं जाहीर आव्हान बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी दिलं आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नामदेव जाधव यांना काळं फासलं, त्याचाही प्रतापराव जाधव यांनी निषेध केला. 

नामदेव जाधव यांनी शरद पवारांवरील केलेल्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळं फासलं. त्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव म्हणाले की, नामदेव जाधव यांना काळं फासण्याच्या घटनेचा आम्ही निषेध करतो. खरं तर नामदेव जाधव यांनी एका वेबसाईट वरून शरद पवार ओबीसी असल्याच प्रमाणपत्र काढलं होत. त्या वेबसाईटवर कारवाई करण्याचं सोडून जाधव यांना काळ फासण्यात आल. शरद पवार किंवा रोहित पवार यांनी मीडिया समोर येऊन शरद पवार मराठा की ओबीसी, खरं काय ते सांगावं. 

नामदेव जाधवांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं
राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे ओबीसी जातीचं असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते नामदेव जाधव यांनी केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या तोंडाला काळं फासलं होतं. या सगळ्या प्रकरणानंतर नामदेव जाधव यांनी प्रतिक्रिया दिली होती. मी यासंदर्भात गुन्हा दाखल करणार असून यामध्ये पहिलं नावं हे शरद पवार आणि रोहित पवार यांचं असेल. तसेच त्या दोघांची आमदारकी, खासदारकी रद्द करण्याची मागणी देखील करणार असल्याचं नामदेव जाधव यांनी यावेळी म्हटलं होतं. 

माफी मागितली नाही म्हणून सांगून काळं फासलं
नामदेव जाधव हे हेतूपूर्वक राज्यात ओबीसी विरूद्ध मराठा असा असा संघर्ष उभा करत आहे. 1983 साली  शरद पवार मुख्यमंत्री असताना ओबीसी आरक्षण लागू झालं अशी बतावणी हे नामदेव जाधव करत आहेत. वास्तविक पाहता 1983 साली पवार  विरोधी पक्षनेते होते तर ओबीसी आरक्षण हे 1990 च्या दशकात देण्यात आले आहे. म्हणूनच नामदेव जाधव करत असलेले आरोप खरे असतील तर त्यांनी पुरावे उघड करावेत अन्यथा पवार जाहीर माफी मागावी असा इशारा आम्ही नामदेव जाधव यांना दिला होता. अन्यथा त्याच्या तोंडाला काळे फासण्यात येईल अशी पूर्वसूचनाही दिली होती. असं असतानाही नामदेव जाधव यांनी पुरावे सादर केले नाहीत, पवारांची माफीही मागितली नाही, असा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला.

No comments:

Post a Comment