वेध माझा ऑनलाइन। राज्यात मराठा आरक्षणाला वेगळं वळण लागलं आहे. काही दिवसांपासून मराठा समाज आरक्षणासाठी सरकारवर आक्रमक होत आहे. या स्थितीत काही नेते राजकारण करत असल्याच्या टीका करत आहेत. आज सत्तेत असलेले नेते मराठा समाजाला आरक्षण देण्यापासून चार हात लांब आहेत. तर काही वर्षांआधीचे सत्ताधारी आमची सत्ता असती तर आरक्षण दिलं असल्याचं बोलत आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी २०१४ साली राष्ट्रवादीमुळे आम्ही विजयी न झाल्याचं वक्तव्य केलं आहे. यावर आता शिंदे गटाचे नेते संजय शिरसाटांनी प्रत्युत्तर देत पृथ्वीराज चव्हाणांना चांगलेच सुनावले आहे.
संजय शिरसाट काय म्हणाले?
पृथ्वीराज चव्हाणांनी आमची सत्ता असती तर आम्ही आरक्षण दिले असते, असे वक्तव्य केलं आहे. यावर पलटवार करत शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाटांनी तुम्ही इतक्या वर्षे झोपलेलात का? गोट्या खेळत होता का? तुम्ही मख्यमंत्री होता ना, गेली चाळीस वर्षे मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे, शिंदे सरकारच्या धास्तीमुळे आता हे पोपट बोलायला लागले आहेत, अशी बोचरी टीका संजय शिरसाटांनी केली आहे.
काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण
२०१४ ला आमचे सरकार राष्ट्रवादीमुळे पडले आहे. आमचे सरकार असते तर मराठा समाजाला आम्हीच आरक्षण दिले असते. माझी खात्री आहे की आमचं सरकार जर पडलं नसतं तर एकत्रित निवडणुकीला सामोरे गेलो असतो. आणि आता भाजपऐवजी आमचे सरकार असते, असे पृथ्वीराज चव्हाणांनी वक्तव्य केलं आहे.
No comments:
Post a Comment