वेध माझा ऑनलाइन। राज्यात शिवसेनाप्रमाणे शरद पवार गट आणि अजित पवार गट राष्ट्रवादीत असे दोन गट पडले आहेत. अजित पवारांनी आपल्यासह ९ आमदारांना सोबत घेत भाजप आणि शिंदे गटाशी युती करत सत्ता स्थापन केली. यामुळे आता दोन्ही गटांमध्ये मतभेद दिसून येत आहेत. पक्ष आणि चिन्ह याबाबतही न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यावरही निलेश लंकेंना विचारण्यात आले यावर लंकेंनी प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. यानंतर त्यांना शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याबाबत प्रश्न केला असता, ते या प्रश्नावर उत्तरले आहेत. अहमदनगर पारनेर विधानसभेतील एका दर्ग्याला मुस्लिम नागरिकांनी भेटायला बोलावले असताना लंकेंना माध्यमांशी संवाद साधताना आपले मत मांडले आहे.
अहमदनगर पारनेरमधील विधानसभा मतदारसंघातील हजरत कमरअली दुर्गेस दर्ग्याचे दर्शन घेण्यासाठी ८ हजार मुस्लिम समाजातील बांधवांची भेट घेतली. यावेळी त्यांना अजित पवार आणि शरद पवारांनी एकत्र यावे का? असा सवाल विचारण्यात आला तेव्हा त्यावर त्यांनी आपले मत सांगितले आहे. त्यानंतर त्यांना महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला की, यंदाच्या निवडणुकीत आपण खासदार पदासाठी निवडणूक लढवणार का? यावर त्यांनी सुचक वक्तव्य केले आहे.
शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का?
खासदारकी लढवणार का? या प्रश्नापूर्वी याआधी शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का? या प्रश्नावर लंकेंनी आपले मत मांडले आहे. लंके म्हणाले की, ‘आख्ख्या महाराष्ट्राला वाटतं पवार फॅमिलीनं एकत्र यावे’, त्यानंतर त्यांना पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत विचारलं असता, लंकेंनी यावर न बोललेलं बरं असं वक्तव्य केलं. यानंतर लंकेंना अगदी महत्त्वाचा खासदारकी लडवणार का? असा प्रश्न विचारण्यात आला असून या प्रश्नावर लंके उत्तरले आहेत.
लंके खासदारकी लढवणार?
अहमदनगर पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंकेंना खासदारकी लढवण्याचा प्रश्न विचारण्यात आला होता, यावर लंके म्हणाले की, राजकाऱण आणि माझ्या सोशल अॅक्टीव्हिटीचा फार काही संबंध नसतो. मी इच्छेसाठी कोणतीही गोष्ट करत नाही. राजकारण हे कधीही ठरवून नसतं, वेळ आली की निर्णय घ्यावा लागतो, असं सुचक वक्तव्य निलेश लंके यांनी केलं
No comments:
Post a Comment