Wednesday, November 22, 2023

शेतकऱ्यांना दिलेल्या मोफत स्टॉलचा गैरवापर होऊ नये ; शरद गाडे

वेध माझा ऑनलाइन। कराड येथे दि. 24 ते 28 नोव्हेंबर रोजी स्व. यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन होत आहे. यामध्ये शेतकऱ्यांना 100 मोफत स्टॉल देण्यात येणार आहेत. या स्टॉलचा गैरवापर होऊ नये याबाबत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव शरद जगन्नाथ गाडे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयकुमार कदम यांना निवेदन दिले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, प्रतिवर्षाप्रमाणे 24 ते 28 नोव्हेंबर 2023 पर्यंत कराड येथे होणारे स्व. यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनात शेतकऱ्यांसाठी देण्यात येणाऱ्या 100 मोफत स्टॉल बाबत गैरवापर होऊ देऊ नये. ज्या शेतकऱ्यांच्या नावे स्टॉल देण्यात येणार आहे त्यांचे निकष आपण कसे ठरवले आहेत तसेच स्टॉलधारक शेतकऱ्यांचा व्यवसाय/ उत्पादन काय आहे याबाबत तपशील नोंद करण्यात यावा. ज्या शेतकऱ्यांच्या नावाने स्टॉल बुकिंग झालेले आहे तो शेतकरी किंवा त्याच्या कुटुंबातील व्यक्तीच त्या स्टॉलमध्ये उपस्थित असणे बंधनकारक असावे, तसेच संबंधित मोफत शेतकरी स्टॉल एकत्र असावेत त्यांच्या स्टॉलवर शेतकऱ्यांचे नाव व मोफत स्टॉल असा उल्लेख केलेला बोर्ड लावण्यात यावा त्याचप्रमाणे आयोजकांनी मोफत शेतकरी स्टॉल धारकांची नावे लिहिलेला व स्टॉल नंबर नमूद केलेल्या प्रदर्शनाचे दर्शनी भागात मोठा फ्लेक्स बोर्ड लावावा, तसेच मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी मोफत स्टॉल वितरणात प्राधान्याने विचार करावा व हे कृषी प्रदर्शन आहे त्यामुळे शेतकरी स्टॉल मोफत कृषी प्रदर्शन प्रवेश दाराच्या जवळ असावेत यापूर्वी झालेल्या प्रदर्शनात या बाबी गांभीर्याने विचारात न घेतल्याने स्टॉलचा गरजू शेतकऱ्यांना फायदा न होता त्यामध्ये गैरवापर/ गैरव्यवहार झाल्याचे आढळून आले आहे असे निवेदनात म्हंटले आहे.

No comments:

Post a Comment