Saturday, November 18, 2023

भुजबळांना मंत्रीमंडळातून हाकला ; आ शिवेंद्रराजेंचा छत्रपती संभाजीराजेंच्या भूमिकेला पाठिंबा ;

वेध माझा ऑनलाइन। आम्ही काेणाचे तरी काढून आम्हा मराठ्यांना आरक्षण द्या असे आजपर्यंत म्हटलेले नाही. आमच्या हक्काचं‌ आम्हांला मिळावं ही भूमिका आमची आहे. ज्येष्ठ मंडळींनी समाजात तेढ निर्माण हाेईल अशी भूमिका घेऊ नये असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी केले.दरम्यान आरक्षणावरुन समाजा समजा विराेधात काेण तेढ निर्माण करत असेल तर संभाजीराजे छत्रपती यांच्या भूमिकेला आमचे समर्थन असेल असेही राजेंनी नमूद केले.
दरम्यान संभाजीराजे छत्रपती यांनी छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी केली आहे या भूमिकेचे शिवेंद्रराजेंनी समर्थन केले आहे

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी तिसऱ्या टप्प्यातील दौऱ्याला सुरुवात केली आहे. आज (शनिवार) सातारा येथील गांधी मैदानावर जरांगे पाटील यांची आशीर्वाद सभा झाली. या सभेनंतर जरांगे पाटील यांनी जलमंदिर पॅलेस येथे श्री भवानी मातेची दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी खासदार उदयनराजे भाेसले  यांची तसेच सुरुची बंगला येथे आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले भेट घेतली.
सुरुची बंगला येथे आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी जरांगे पाटील यांचे स्वागत केले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शिवेंद्रराजे म्हणाले आम्ही सर्वजण कुटूंबांसह मराठा मोर्चात सहभागी होतो. आजची साता-यातील सभेस देखील जिल्ह्यातील समाज बांधवांनी माेठा प्रतिसाद दिला.
आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत कायम राहु. संपुर्ण राज्य त्यांनी हादरवलं. कुंभकरणाच्या झोपेतुन जागं करण्याचं काम मनोज जरांगे यांनी केले आहे. आमच्या हक्काचं‌ मिळावं ही आमची मागणी असल्याचे शिवेंद्रराजेंनी नमूद केले.
मनोज जरांगे पाटील हे लोकशाहीतील योद्धे असल्याचे काैतुक शिवेंद्रराजेंनी जरांगे पाटील यांचे केले. दरम्यान समाजाच्या विरोधात कोण भूमिका घेत असेल तर संभाजीराजेंनी (मंत्री छगन भुजबळ यांच्या विषयी) केलेल्या मागणीला आमचा पाठींबा राहील असेही राजेंनी म्हटलं

No comments:

Post a Comment