Saturday, November 18, 2023

छगन भुजबळानी फर्नांडिस कुटुंबाचं घर लाटलं ; सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा गंभीर आरोप ; ...भुजबळ कुठल्या कष्टाचे खातात ? -दमानियांचा सवाल ...

वेध माझा ऑनलाइन। छगन भुजबळानी सांताक्रूझ इथलं फर्नांडिस कुटुंबाचं घर लाटल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिय यांनी केला, त्याला आता छगन भुजबळांनीही उत्तर दिलं आहे. दमानिया या मीडिया स्टंट करत असून या प्रकरणी राजकारण करून आपली पोळी भाजून घेत असल्याचा आरोप भुजबळांनी केला आहे.दरम्यान भुजबळ मी कष्टाचे खातो असे म्हणतात... ते कुठल्या कष्टाचे खातात...? असा सवालही दमानिया यांनी केला आहे

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळांनी यासंबंधी एक प्रसिद्धी पत्रक जारी केलं असून त्यामध्ये म्हटलंय की, याबाबत सध्या राज्यात ओबीसींची मोठी लढाई राज्याचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि आम्ही लढत आहोत काल झालेली सभा पाहता यात राजकारण करण्यासाठी अंजली दमानिया यांनी मीडिया स्टंट केला. आमचे देणे लागत नसतानाही माणुसकीच्या नात्यातून आम्ही मोबदला देण्याची तयारी दर्शविली मात्र तरी देखील दमानिया यात राजकारण आणून आपली पोळी भाजून घेत आहेत.

अंजली दमानियांचे भुजबळांवर गंभीर आरोप

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंत्री छगन भुजबळांवर गंभीर आरोप केले आहेत. फर्नांडिस कुटुंबाचं मुंबईतलं घर भुजबळांनी लाटल्याचा गंभीर आरोप दमानियांनी केला. येत्या 48 तासात भुजबळांनी पैसे न दिल्यास भुजबळांच्याच घराबाहेर बसणार असल्याचा इशाराही दमानिया यांनी दिला. शनिवारी दमानियांनी भुजबळांच्या घराबाहेर पत्रकार परिषद घेण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना रोखलं. अखेर दमानियांनी स्वत:च्या घरी पत्रकार परिषद घेत भुजबळांवर गंभीर आरोप केले. 

भुजबळांचे प्रक्षोभक भाषण एकून तळपायाची आग मस्तकात गेली. कष्टाचे खातो असे ते म्हणाले. ते कुठल्या कष्टाचे खातात ते दाखवण्यासाठी माध्यमांना घेऊन गेले होते. या कुटुंबीयांचा बंगला हडपला. रहेजामध्ये या कुटुंबीयांना पाच फ्लॅट मिळणार होते. आता या परिवाराला एक रुपयाही मोबदला मिळालेला नाही 

सांताक्रुझ येथील छगन भुजबळ यांचे घर त्यांनी फर्नांडीस नावाच्या कुटुंबाकडून लाटलेले घर आहे. हे घर रिडेव्हलपमेंटसाठी गेले होते. समीर भुजबळ यांच्या कंपनीनं  फर्नांडीस यांचे घर लाटले 
सांताक्रुझ वेस्टची टोलेजंग इमारत ही इतरांची घरे लुटून उभी राहिली. येत्या 48 तासांत फर्नांडीस कुटुंबाला भुजबळांनी पैसे द्यावेत, अन्यथा भुजबळांच्या घराबाहेर आम्ही बसू.

No comments:

Post a Comment