वेध माझा ऑनलाइन। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न-नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज थेट सरकारच्या कृतीवर टीका केलीय. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या अंतरली सराटी गावात गेलं होतं. यामध्ये निवृत्त न्यायाधीशांची समितीदेखील गेली होती. भुजबळांनी सरकारच्या या कृतीवरच टीका केली आहे. ‘निवृत्त न्यायाधीशच हात जोडतात, मग ओबीसींना कसा न्याय मिळणार?’ असा सवाल छगन भुजबळ यांनी केलाय. यावेळी त्यांनी सरकारच्या मराठ्यांना कुणबी प्रणाणपत्र देण्याच्या निर्णयावरुनही टीका केलीय.
मनोज जरांगे यांनी उपोषण सोडावं, वातावरण शांत व्हावं यासाठी आमचे नेते त्यांच्याकडे जातात ते ठीक आहे. मंत्री जातात, न्यायमूर्ती जातात, तेही त्यांना हात जोडून सांगतात. मला सांगा, आमचे मंत्री वगैरे ठीक आहे, पण न्यायमूर्ती, ज्यांच्या हातून ओबीसी कोण याचा निकाल लावण्यासाठी काम करत आहेत, त्यांच्या नेतृत्वात आयोग नेमले जातात, तेच तिकडे गेले तर ओबीसींनी काय न्याय मिळणार आहे? अशा लोकांकडून आम्हाला काय न्याय मिळणार जे तिकडे जावून हात जोडतात?”, असा सवाल छगन भुजबळांनी केला.
No comments:
Post a Comment