Saturday, November 25, 2023

भुजबळ नवा पक्ष काढणार ? ; एका मुलाखतीत दिले संकेत ; मंत्रिपदाचा राजीनामा देणार ?

वेध माझा ऑनलाइन। सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. मंत्री छगन भुजबळ ओबीसींसाठी नवीन पक्ष स्थापन करणार आहेत. भुजबळांनी दिलेल्या एका मुलाखतीत तसे संकेत दिले आहेत. याबाबतचे वृत्त एका न्यूज पोर्टल ने प्रसिद्ध केले आहे

स्थानिक अधिकाऱ्यांवर दबाव टाकून कुणबी प्रमाणपत्र दिले जात आहेत, असा आरोपही भुजबळांनी यावेळी केला. मराठा आरक्षणावर आपली नेमकी भूमिका काय आहे आणि तोडगा काय अशा अनेक प्रश्नांवर भुजबळांनी स्पष्ट मते व्यक्त केली आहेत. एका मुलाखती दरम्यान ही माहिती भुजबळांनी दिली आहे. माझा मराठा आरक्षणाला विरोध नाही. पण मराठा समाजाला मागच्या दाराने ओबीसी कॅटेगरीत आरक्षण देण्याचा घाट घातला जातोय. स्थानिक अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या जाताहेत. मूळ कागदपत्रांमध्ये बदल केले जात आहेत. सरसकट प्रमाणपत्र देण्यासाठी अधिकाऱ्यांना फोन केले जात आहेत. राज्यात एक समांतर सरकार चालवले जात आहे, असा आरोप भुजबळांनी केला आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना राज्यात काय चालले आहे याची पूर्ण कल्पना आहे, असेही ते म्हणाले. ओबीसी समाजासाठी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी भुजबळांनी दाखवली आहे. तसेच आगामी काळात ओबीसींसाठी वेगळा पक्ष काढण्याचे संकेतही भुजबळांनी दिले आहेत. आपण मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही, पण आपण झुंडशाहीच्या विरोधात आहोत असे भुजबळ यांनी सांगितले आहे.

No comments:

Post a Comment