वेध माझा ऑनलाईन। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांची आज (शुक्रवारी) सायंकाळी सात वाजता कराडच्या छत्रपती शिवाजी स्टेडीयम येथे सभा होत आहे. त्याची तयारी पुर्ण झाली असुन पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. सभेला कराड-पाटण तालुक्यासह जवळच्या कडेगाव, शिराळा, सातारा, खटाव तालुक्यातील एक लाख मराठा बांधव-भगिनी येतील, असा अंदाज गृहीत धरून संयोजकांनी नियोजन केले आहे. सभेच्या पार्श्वभुमीवर गावोगावी बैठका घेण्यात आल्या आहेत. सभेसाठी पोलिस उपाधिक्षक अमोल ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा बदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मनोज जरांगे - पाटील यांच्या सभेसाठी असणारी पार्किंग व्यवस्था
सुरक्षेच्या दृष्टीने साई मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम दक्षिण गेट रस्ता
तसेच विजय दिवस चौक ते बदियानी बंगला हा भाग नो पार्किंग राहील
मसूर, ओगलेवाडी भागातून येणाऱ्या बांधवांसाठी असणारी पार्किंग व्यवस्था क्रमांक 1 ते 10 राहील
1) श्री नलवडे घर ते राम मंदिर टू व्हीलर पार्किंग
2)श्री गुजर घर ते राम मंदिर तसेच कॉटेज हॉस्पिटल भिंत टू व्हीलर पार्किंग
3) श्री एल सी शहा पारस बंगला ते कॉटेज हॉस्पिटल भिंत फोर व्हीलर पार्किंग
4) विरुंगळा बंगला ते एल आय सी ऑफिस दोन्ही बाजूस फोर व्हिलर पार्किंग
5) विरंगुळा बंगला ते श्री दिलीप जाधव बंगला दोन्ही बाजूस फोर व्हिलर पार्किंग
6) शिवाजी हायस्कूल फोर व्हिलर पार्किंग
7) विठामाता हायस्कूल टू व्हीलर पार्किंग
8) आंबेडकर ग्राउंड बुधवार पेठ फोर व्हिलर पार्किंग
9) श्री हॉस्पिटल समोर फोर व्हिलर पार्किंग (मोठ्या गाड्या ट्रक ट्रॅक्टर इत्यादी)
10) वाखान भागातील अंतर्गत रस्ते फोर व्हिलर पार्किंग
वडगाव , कार्वे वाठार रेठरे भागातून येणाऱ्या भागातील बांधवांसाठी पार्किंग व्यवस्था क्रमांक 11 ते 13
11)उर्दू शाळा मैदान फोर व्हीलर पार्किंग
12) बैल बाजार मार्केट ग्राउंड फोर व्हिलर पार्किंग
13) कल्याणी मैदान मार्केट फोर व्हिलर पार्किंग
उंडाळे, ओंड, विंग भागातून येणाऱ्या बांधवांसाठी असणारी पार्किंग व्यवस्था
14 ते 15
14) श्री पी. डी .पाटील साहेब उद्यान परिसर मार्केट यार्ड फोर व्हीलर पार्किंग
15) वॉटर सप्लाय परिसर पंकज लॉन शेजारी फोर व्हीलर पार्किंग
उंब्रज वारुंजी भागातून येणाऱ्या बांधवांसाठी असणारी पार्किंग व्यवस्था
16 ते 18
16) लाहोटी मैदान पंकज लॉन शेजारी
17)दैत्य निवारणी मंदिर परिसर फोर व्हीलर पार्किंग
18) साई मंदिर शिवतीर्थ दत्त चौक फोर व्हीलर पार्किंग
विशेषतः कराड शहरातील मराठा बांधवांचा स्तुत्य उपक्रम क्रांतीसूर्य मनोज जरांगे - पाटील यांचे सभेसाठी येताना सर्व बंधू भगिनी पायी चालत येणार आहेत.आणि आपल्या परगावाहून येणाऱ्या बांधवांच्या वाहनांना पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून देणार आहेत.
No comments:
Post a Comment