Thursday, November 9, 2023

राष्ट्रवादी आमचीच म्हणणाऱ्या अजित पवार गटाच्या २० हजार प्रतिज्ञापत्रांत त्रुटी ! ; वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन। राष्ट्रवादी काँग्रेसमधील ९ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची, असा गहन प्रश्न उपस्थित झाला. हे प्रकरण आता केंद्रीय निवडणूक आयोगात असून यावरून शरद पवार आणि अजित पवार आमने-सामने आले आहेत. या संदर्भात शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांची मोठा गौप्यस्फोट केला. एवढेच नाही तर अजित पवार गटावर कारवाई करण्याचीही मागणी त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली, अशी माहिती सिंघवी यांनी सुनावणीनंतर दिली. आता या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे पुढील सुनावणी २० नोव्हेंबर रोजी होणार आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेबद्दल निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारीपर्यंतची मुदत विधानसभा अध्यक्षांना दिली आहे.

नुकतीच राजधानी दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची, यावर सुनावणी झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबतचा हा वाद आहे. यावेळी शरद पवार सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादीतील बहुतांश नेते उपस्थित होते. शरद पवार गटाकडून ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनी बाजू मांडली. यावेळी शरद पवार गटाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निवडणूक आयोगाने २० नोव्हेंबर रोजी सुनावणी पुढील सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केले.

 २० हजार प्रतिज्ञापत्रात त्रुटी?
केंद्रीय निवडणूक आयोगाकडुन दीड तास सुनावणी झाली. यावेळी शरद पवार गटाकडून अभिषेक मनु सिंघवी यांनी काही अजित पवार गटाकडून सादर केलेले काही खूप चमत्कारीत तथ्य निवडणूक आयोगासमोर ठेवले. त्यापैकी २० हजार प्रतिज्ञापत्रात त्रुटी आढळल्या आहेत. तर, ८ हजार ९०० प्रतिज्ञापत्रांची चार्ट बनवून निवडणूक आयोगात सादर केले आहेत.  या सर्व प्रकरणात भ्रष्ट आणि विकृत पद्धतीने दस्तावेज बनवले असून प्रतिज्ञापत्रात त्रुटी आढळल्या असल्याचा दावा सिंघवी यांनी केला. यात काही मृत व्यक्तींचेही प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहेत. अल्पवयीन मुलांचेही प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेत नसलेली पदेही यात दाखवण्यात आली आहेत. समोरच्या पार्टीने चुकीच्या पद्धतीने प्रतिज्ञापत्र बनवले असल्याचा आरोप शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे.

या संदर्भात अजित पवार गटाला उत्तरही देता आले नाही, असा दावाही अभिषेक मनु संघवी यांनी माध्यमांशी बोलताना केला. एवढेच नाही तर बनावट प्रतिज्ञापत्र सादर केल्याप्रकरणी अजित पवार गटावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केल्याचे सिंघवी यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment