वेध माझा ऑनलाइन। दरोडा टाकण्याच्या तयारीत असणार्या चार संशयितांना पोलीसांनी जेरबंद केले आहे. मात्र त्यापैकी एका संशयिताने पोबारा केला आहे देशी बनावटीचे दोन पिस्टल, एक गावठी कट्टा, पाच राऊंड हत्यारे पोलिसांनी या लोकांकडून जप्त केली आहेत.
दोन दिवसांपूर्वी कराडच्या स्टेडियमनजीक उत्तरालक्ष्मी देवी मंदिरासमोरील मार्गालगत असलेल्या झाडाझुडपाच्या आडोशास अंधारामध्ये काही संशयित असल्याची माहिती कराड शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाली होती. पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूूर व पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या सूचनेनुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिस कर्मचार्यांनी घटनास्थळी जाऊन संशयितांना ताब्यात घेतले त्यावेळी एकजण पळून जाण्यात यशस्वी ठरला
दरम्यान संशयितांकडुन दोन देशी बनावटीचे पिस्तूल , 5 जिवंत राऊंड, एक गावठी कट्टा व गावठी कट्टयामध्ये वापरणेत येणारा राऊंड, एक लोखंडी टॉमी, मिरची पूड, दोन राखाडी व एक चॉकलेटी रंगाची माकड टोपी, एक काळे रंगाचा कापडी मास्क तसेच दोन निळे रंगाचे हॅन्ड ग्लोज मिळून आले आहेत.
परशुराम उर्फ परशा रमेश करवले (वय 23), निशीकांत निवास शिंदे (वय 21), तुषार उर्फ बारक्या सुभाष थोरवडे (वय 23), आकाश उदय गाडे (वय 19) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत
No comments:
Post a Comment