वेध माझा ऑनलाइन। बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला पुन्हा एकदा लॉरेन्स बिष्णोई गँगकडून धमकी मिळाली आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने पुन्हा धमकी दिल्याने भाईजानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी सलमानला Y+ सुरक्षा दिली आहे.
फेसबुक पोस्ट शेअर करत सलमानला धमकी
रविवारी बिश्नोईने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून गिप्पी ग्रेवालच्या कॅनडातील निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी घेतली होती. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, फेसबुक पोस्ट करणारा हा भारताबाहेरील आहे. पोस्ट शेअर करत त्याने लिहिलं होतं की,"तुम्ही सलमान खानला तुमचा भाऊ मानता, पण आता वेळ आली आहे की तुमचा ‘भाऊ’ येऊन तुम्हाला वाचवेल. हा संदेश सलमान खानसाठीही आहे - दाऊद तुम्हाला वाचवेल अशा भ्रमात राहू नका.. तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही".
पोस्टमध्ये पुढे लिहिलं आहे,"सिद्धू मूसवालाच्या मृत्यूबद्दलच्या तुझ्या नाट्यमय पोस्टने कोणाचं लक्ष वेधून घेतलेलं नाही. तो कसा होता आणि त्याचे गुन्हेगारी संबंध होते हे आम्हा सर्वांना माहीत आहे. तुम्ही आता आमच्या रडारवर आहात. हा ट्रेलर आहे, लवकरच सिनेमा प्रदर्शित होईल. . तुम्हाला पाहिजे असलेल्या कोणत्याही देशात पळून जा, पण लक्षात ठेवा, मृत्यूला निमंत्रण देण्याची गरज नसते".
गॅंगस्टार लॉरेन्स बिश्नोईने भाईजानला दिलेली जीवे मारण्याची धमकी
सलमानला गेल्या काही दिवसांपूर्वी गॅंगस्टार लॉरेन्स बिश्नोईने जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्याला एक धमकीचा ई-मेल पाठवण्यात आला होता. यात लिहिलेलं होतं की, प्रकरण मिटवा, समोरासमोर बोलायचं असेल तर सांगा. वेळीच कळवलं आहे. पुढच्या वेळी झटका बसेल".
गिप्पी ग्रेवाल म्हणाला,"माझी आणि सलमानची मैत्री नाही. कोणाचा राग कोणावर काढला जात आहे. मौजानाच्या ट्रेलर लॉंचदरम्यान सलमान खान भेटला होता. या सिनेमाच्या निर्मात्याने मला ट्रेलर लॉंचला आमंत्रित केलं होतं. त्याआधी बिग बॉसच्या सेटवर तो भेटला होता. माझे कोणाशीही वैर नाही त्यामुळे या प्रकरणात कोणाचा हात असू शकतो याची कल्पनाही करू शकत नाही".
No comments:
Post a Comment