वेध माझा ऑनलाइन। राज्यात काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडवता सरकारला नाकी नऊ आले आहेत. अशातच आता अवकाळी पावसाने राज्यातील काही भागात धुमशान मचावल्याने शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावेळी नुकसान भरपाईसाठी मुख्यमंत्र्यांनी आदेश द्यावेत अशी मागणी उद्धव ठाकरेंनी सरकारकडे केली. एकनाथ शिंदे तेलंगणाच्या प्रचारासाठी गेले असता, यावर उद्धव ठाकरेंनी राज्याचा कारभार करण्यासाठी असा माणूस नालायक असल्याचे वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यावरून राजकीय नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. यावर आता शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाईंनी निषेध व्यक्त केला आहे.
एकनाथ शिंदेंवर उद्धव ठाकरेंनी नालायक अशी टीका केली आहे. यावर आता शंभूराज देसाईंनी निषेध व्यक्त केला आहे. नालायक हा शब्द संबोधनं योग्य नाही. यावर काय कारवाई करता येईल हा निर्णय आता पथक घेईल, असे असंसदीय शब्द वापरणाऱ्या उद्धव ठाकरेंची हतबलता यातून समजून येते. त्यांच्या भाषेत उत्तर द्यावे लागले तर उत्तर देऊ, असा इशारा आता शंभूराज देसाईंनी दिला आहे. या एका शब्दामुळे आता राजकीय नेत्यांमध्ये कलगीतुरा पाहायला मिळत आहे
एकनाथ शिंदें, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले असता, उद्धव ठाकरेंनी सत्ताधारी नेत्यांचे कान उपटले आहेत. मातोश्री येथे मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी सत्ताधारी पक्षांना चांगलच झापलं आहे. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंवर नालायक अशी टीका केली. या टीकेवरून आता असंसदीय शब्द वापरल्याचं वक्तव्य शंभूराज देसाईंनी केलं असून यावर आता नालायक शब्दाचा अर्थ राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी सांगितला आहे.
नालायक अर्थ
आव्हाडांनी नालायक म्हणजे useless युजलेस असा अर्थ असल्याची माहिती ट्विट करत दिली आहे. नालायक हा शब्द असंसदीय आहे का? पोलीसांनी सिध्द करावे ….. सध्याच्या परिस्थितीत जनता सगळ्यांना नालायक म्हणते मग …. किती जणांना आत घालणार…इंग्रजी मध्ये नालायक म्हणजे “useless”, असे ट्विट करत आव्हाडांनी नाव न घेता शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.
No comments:
Post a Comment