वेध माझा ऑनलाइन। मराठा समाजाला आम्ही आरक्षण दिलं असतं, असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात केल होतं. या वक्तव्याचा समाचार घेताना नामदार राधाकृष्ण विखे- पाटील यांनी आ पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रात काँग्रेसची वाताहत होण्याला पृथ्वीराजबाबाच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.राज्यातले सरकार देखील त्यांच्यामुळेच गेलं असेही ते म्हणाले.
आज कराड येथे आले असता त्यांचे मोठे स्वागत करण्यात आले. यावेळी मराठा आरक्षणाबाबत बोलताना मंत्री विखे- पाटील म्हणाले, आमचं सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी गंभीर आहे.
याविषयी स्वतः मुख्यमंत्री यांनी 2 जानेवारीपूर्वी आरक्षण देण्यासाठी मुदत मागितली आहे. हिवाळी अधिवेशन सुरू होत असून याविषयी कोणाच्याही मनात कोणतीही शंका असण्याचे आता कारण नाही असे ते म्हणाले
No comments:
Post a Comment