Wednesday, November 8, 2023

बॉम्ब निर्मितीचा राणेंना संशय ! कराडच्या मुजावर कॉलनीतील स्फोटाची एटीएस तर्फे तपास करण्याची राणेंची मागणी ; लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली काम करणाऱ्या पोलिसांचा कार्यक्रम लावणार ; राणेंचा पोलिसांना इशारा ;

वेध माझा ऑनलाइन। 
कऱ्हाडच्या मुजावर कॉलनीत झालेल्या स्फोटाचा तपास एटीएसकडूनच करावा, अशी मागणी भाजपचे नेते आमदार नितेश राणे यांनी आज कराडात केली. येथे बाॅम्ब तयार हाेत असतील अशी शंका देखील त्यांनी व्यक्त केली व या प्रकरणाला गॅस सिलेंडरच्या नावाखाली दाबून टाकण्याचा प्रयत्न करणार असाल तर ते खपवून घेणार नाही, असेही ते म्हणाले...दरम्यान देंवेंद्र फडणवीस यांच्याशी याविषयी सविस्तर चर्चा करून त्यांना माहिती देणार आहे. त्यामुळे त्याचा तपास एटीएसतर्फेच करावा, असा आमचा आग्रह आहे असा पुनरुच्चार त्यांनी केला,कराडातील कोणत्या लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली येथील पोलीस काम करत आहेत. याची माहिती आम्हाला आहे असेही ते म्हणाले...

कराडच्या मुजावर कॉलनी येथे झालेल्या स्फ़ोटामुळे झालेल्या नुकसानीची राणे यांनी पाहणी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते

ते म्हणाले, हा स्फोट नक्कीच गॅस चा नाही या स्फोटामुळे बिल्डिंग ची अक्षरशः निव्ह हालल्याचे दिसत आहे स्फोटामुळे समोरच्या बिल्डिंग पडतात म्हणजे हा बॉम्ब तयार करत असताना झालेला अपघात असावा अशी शंका त्यांनी व्यक्त केली ज्या ठिकाणी हा स्फोट झाला तेथे बॉम्ब सदृश्य केमीकल आढळळे होते. त्याचा तपासात कोठे उल्लेख आला आहे का, असा सवालही त्यांनी यावेळी केला 

ते म्हणाले...काही पोलिसांमुळे गृहखाते बदनाम होणार असेल तर ते खपवून घेणार नाही,  जिल्ह्यात चांगले पोलीस अधिकारी आहेत. मात्र काही अधिकारी अजूनही गैरसमजात आहेत. त्यांना योग्य ती जागा दाखवणार आहे या प्रकरणी जे पोलीस अधिकारी इथल्या काही लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली काम करत असताना जर सापडले तर त्या सर्वांचा करेक्ट कार्यक्रम लावणार असेही ते यावेळी म्हणाले सातारा जिल्ह्यात पीएफआयच्या हालचाली सुरू आहेत अशी आम्हाला माहिती असल्याचेही ते म्हणाले...याप्रश्नी आगामी काळातील अधिवेशनात आवाज उठविणार , असेही त्यांनी सांगितले ... 

No comments:

Post a Comment