Thursday, November 9, 2023

जरांगे पाटलांचा मराठा आरक्षणसाठी पुन्हा राज्यभर दौरा ; कसा असणार दौरा ? वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन। मनोज जरांगे पाटील हे आता राज्यभर दौरा करणार आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आता 15 नोव्हेंबरपासून राज्यभर दौरा करणार आहेत. 15 नोव्हेंबरपासून या दौऱ्याची सुरुवात होणार असून 23 नोव्हेंबरला हा दौरा संपणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाशी पुन्हा एकदा संवाद साधण्याची गरज असून त्यामुळेच हा महाराष्ट्र दौरा करत असल्याचे सांगितले. हा दौरा 15 नोव्हेंबरपासून 23 नोव्हेंबर पर्यंत सहा टप्यांमध्ये होणार आहे. जरांगे पाटील यांच्या या दौऱ्यामुळे मराठा समाजाचे आरक्षणाविषयी प्रबोधन करण्यात येणार असून मराठा आरक्षण आंदोलनाला आणखी धार प्राप्त होणार आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे केलेल्या पहिल्या उपोषणानंतर त्यांनी राज्यभर दौरे घ्यायला सुरुवात केली होती. आता दुसऱ्या उपोषणानंतर ते पुन्हा एकदा राज्यभर दौरे काढणार आहेत. हा त्यांच्या दौऱ्यांचा तिसरा टप्पा असून 15 नोव्हेंबरपासून वाशी येथून ह्या दौऱ्याची सुरुवात होईल. तसेच या दौऱ्याचा शेवट 23 नोव्हेंबर रोजी शेवगाव येथे होणार आहे.


असा असेल महाराष्ट्र दौरा..

15 नोव्हेंबर – वाशी, परांडा करमाळा
16 नोव्हेंबर – दौंड, मायनी
17 नोव्हेंबर – सांगली, कोल्हापूर, इस्लामपूर आणि कराड
18 नोव्हेंबर – सातारा, वाई, रायगड
19 नोव्हेंबर – रायगड, पाचाड, महाड, मुळशी आळंदी
20 नोव्हेंबर – तुळापूर, पुणे, खराडी, चंदननगर, खालापूर, कल्याणा
21 नोव्हेंबर – ठाणे, पालघर, त्र्यंबकेश्वर
22 नोव्हेंबर – विश्रांतगड, संगमनेर, श्रीरामपूर
23 नोव्हेंबर – नेवासा, शेवगाव, बोधगाव
मनोज जरांगे पाटील यानंतर अजून दौरे करणार असून यांची माहिती त्यांनी दिली. आपल्या पुढच्या टप्प्यातील दौऱ्यात विदर्भ, उर्वरित मराठवाडा, कोकण भाग असेल.

No comments:

Post a Comment