वेध माझा ऑनलाइन। भारताचे माजी उपपंतप्रधान, नवं महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री आदरणीय स्व.यशवंतरावजी चव्हाणसाहेब यांच्या ३९ व्या पुण्यस्मरणदिनानिमित्त त्यांच्या कराड येथील प्रीतीसंगम या समाधीस्थळी माननीय खासदार सुप्रियाताई सुळे, राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार बाळासाहेब पाटील व खासदार श्रीनिवास पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी सातारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष सुनील माने, देवराजदादा पाटील, मानसिंगराव जगदाळे, सारंग पाटील, सौ.संगीता साळुंखे(माई), नंदकुमार बटाणे, पोपटराव साळुंखे, गंगाधर जाधव, पांडुरंग चव्हाण तसेच सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे आजी-माजी संचालक, कराड नगर परिषदेचे आजी-माजी नगरसेवक व इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment