Saturday, November 25, 2023

कराडात स्व यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समधीस्थळी अभिवादन ;

वेध माझा ऑनलाईन। विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात एकोपा निर्माण करून समाजकारण आणि राजकारण कसे करायचे याची आदर्श मुहूर्तमेढ व शिकवण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिली. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी त्या काळात घेतलेले निर्णय आजही महत्त्वपूर्ण ठरतात. त्यांचे विचार, साहित्य आजही मार्गदर्शक आहेत, असं मत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी व्यक्त केलं.

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या कराडमधील समाधी स्थळावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी आमदार दीपक चव्हाण, माजी आमदार आनंदराव पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment