याबाबत घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी, ओम बामणे हा भाजी मंडई परिसरात राहणारा युवक दत्तचौकात आला असताना त्याला त्याच गल्लीतील युवकाने (नाव समजू शकले नाही) धारदार कोयत्याने डोक्यात व हातावर वार केले त्यात बामणे हा युवक गंभीर जखमी झाला त्यांनतर त्याला कॉटेज हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते मात्र पुढिल उपचारासाठी त्याला कृष्णा हॉस्पिटल येथे हलवण्यात आले अशी माहिती मिळत आहे
दरम्यान या युवकावर वार झाल्यानंतर त्याला त्याठिकाणी ड्युटीवर हजर असलेल्या रॅपिड ऍकशन फोर्सच्या जवानांनी पुढील हल्ला होण्यापासून वाचवल्याचे समजते
दरम्यान याप्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे हल्ला करायला आणखी कितिजण होते याबाबत नक्की माहिती मिळू शकली नाही दरम्यान कराड शहरात दिवाळीची लगबग सुरू असतानाच या झालेल्या हल्ल्यामुळे कराडात एकच खळबळ उडाल्याचे दिसून आले याबाबत उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला नव्हता, त्यामुळे अधिक माहिती मिळू शकली नाही.
No comments:
Post a Comment