Friday, August 2, 2024

कोयनेत... 24 तासात किती टी एम सी वाढले पाणी;

वेध माझा ऑनलाइन।
भारतीय हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासाठी उद्या शनिवारी व रविवारी अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. या दरम्यान धरणामध्ये येणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा विचार करता धरणामधील विसर्ग वाढविणे आवश्यक होते. त्यामुळे कोयना धरणातील पाण्याच्या विसर्गात वाढ करुन तो आज शुक्रवारी सकाळी नऊ वाजता 50 हजार क्युसेक करण्यात आला आहे.
आज कोयना धरणात 86.63 टीएमसी पाणीसाठा जमा झाला असून धरण 82.31 टक्के भरले आहे. तर कोयना धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणामध्ये 24 तासांत 2 टीएमसी पाणी वाढले आहे.

दरम्यान, आज शुक्रवारी सकाळी आठ वाजता कोयनानगरला ९६, नवजाला १३१ व महाबळेश्वर येथे १३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. धरण पायथा विद्युत गृहामधील २१०० क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग ५२ हजार १०० क्युसेक्स इतका झाला आहे. 

No comments:

Post a Comment