मलकापूर (ता. कराड) येथील सनसिटी बिल्डींगवरुन युवतीला धक्का मारून ढकलून देऊन ठार मारल्याप्रकरणी एकावर कराड शहर पोलिसात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
आरूषी सिंग (वय- 21, मुजफ्फरनगर बिहार) असे खून झालेल्या युवतीचे नाव आहे.
ध्रुव छिक्कारा (वय- 21, हरियाणा) असे गुन्हा नोंद झालेल्या संशयित युवकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,
मंगळवारी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी ध्रुव याने आरूषी हिस मलकापूर येथील सनसिटी बिल्डींगमधील त्याच्या रूमवर बोलावून तुझे दुसऱ्या मुलाबरोबर अफेअर असल्याच्या संशयावरून वाद घातला होता. त्याचवेळी ध्रुव याने आरूषी ही एकटीच असल्याचा फायदा घेऊन तिला सनसिटी बिल्डींगवरून धक्का मारून ढकलून देऊन ठार मारले. यामध्ये संशयित आरोपी ध्रुव हा सुद्धा जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत
No comments:
Post a Comment