Wednesday, August 31, 2022

आजचे सातारा जिल्हा कोरोना रिपोर्ट्स

वेध माझा ऑनलाइन - सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 12 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 0 जणांचा मृत्यू झाला आहे तर 0 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 2 कराड 2 खंडाळा 0 खटाव 3 कोरेगांव 1 माण 1 महाबळेश्वर 0 पाटण 0 फलटण 2 सातारा 0 वाई 0  व इतर 1
आणि नंतरचे वाढीव 0 असे  आज अखेर एकूण 12 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 0 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

Tuesday, August 30, 2022

बिहारमध्ये लवकरच होणार मध्यावती निवडणुका ?

वेध माझा ऑनलाइन - बिहारमध्ये सत्ताबदलाबरोबरच राजकीय हालचाली अधिक वेगवान झाल्या आहेत. मुख्यमंत्री नितीशकुमार व उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव लवकरच विधानसभा बरखास्त करून निवडणुका घेऊ इच्छित आहेत, तर भाजप हा प्रयत्न हाणून पाडण्याचा प्रयत्न करीत आहे.
दोन्ही पक्षांना वाटते की, मागासांना प्राधान्य देऊन निवडणुकांना सामोरे गेल्यावर भाजपवर चांगली मात करता येईल व स्थिर सरकार देता येईल; परंतु हा निर्णय घेण्याआधी ते सरकारी नोकऱ्यांमध्ये भरतीची अधिसूचना जारी करू इच्छित आहेत. महागठबंधन सरकार स्थापन होताच १० लाख युवकांना नोकऱ्या देण्याची घोषणा तेजस्वी यादव यांनी केली होती, तर नितीशकुमार यांनी स्वातंत्र्य दिन सोहळ्यातील भाषणात २० लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. 
यापूर्वी २०१५ मध्ये या दोन्ही पक्षांनी एकत्रित निवडणुका लढल्या होत्या व काँग्रेससह १७८ जागा जिंकून ४८ टक्के मते मिळवली होती. तेव्हा भाजपला २४ टक्के मते घेऊन ५३ जागा जिंकता आल्या होत्या. भाजप नेते सातत्याने कायदा व्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करीत आहेत. परंतु तेजस्वी यादव यांचे म्हणणे आहे की, मागील २० पैकी १७ वर्षांच्या कालावधीत जदयूचे सरकार भाजपबरोबर सत्तेत होते. त्यामुळे हा दावा पोकळ आहे.

दरम्यान...
विधानसभा बरखास्त होण्याची भीती दाखवून जदयू व राजदच्या आमदारांना फोडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. भाजपचे एक माजी केंद्रीय मंत्री व संघटन मंत्र्याने तीन दिवसांपूर्वी रात्री उशिरा तेजस्वी यादव यांची भेट घेऊन अनेक पर्यायांवर चर्चा केली.  तेजस्वी यादव हे काही काळासाठी अस्थिर सरकार चालविण्याऐवजी स्थिर सरकारसाठी बहुमत स्थापन करण्याच्या विचाराचे आहेत. 

बिहारच्या विधानसभेत सदस्य : २४२ 
७९ राजद 
४३ जदयू 
१९ काॅंग्रेस 
१६ डावे 
भाजपकडे ७५ आमदार आहेत.

आजचे कोरोना रिपोर्ट्स

वेध माझा ऑनलाइन - सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 10 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 0 जणांचा मृत्यू झाला आहे तर 18 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 0 खंडाळा 0 खटाव 1 कोरेगांव 0 माण 0 महाबळेश्वर 1 पाटण 0 फलटण 1 सातारा 5 वाई 0  व इतर 1
आणि नंतरचे वाढीव 1 असे  आज अखेर एकूण 10 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 18 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

केंद्रीय मंत्री सोम प्रकाश यांच्या प्रमुख उपस्थितीत कराड शहरातून भव्य बाईक रॅली ; बाईक रॅलीच्या निमित्ताने भाजपाचे कराडमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन...

वेध माझा ऑनलाइन - 
सन २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी भारतीय जनता पार्टीने आत्तापासूनच सुरु केली आहे. याचाच एक भाग म्हणून सातारा लोकसभा मतदारसंघाच्या विशेष दौऱ्यावर आलेले केंद्रीय वाणिज्य तथा उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश यांच्या प्रमुख उपस्थितीत कराड शहरातून भव्य बाईक रॅली काढण्यात आली. या बाईक रॅलीच्या निमित्ताने भाजपाने कराडमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन केले. 


ढेबेवाडी फाट्यापासून बाईक रॅलीचा प्रारंभ करण्यात आला. रॅलीच्या अग्रस्थानी असलेल्या वाहनात केंद्रीय राज्यमंत्री सोम प्रकाश, भाजपा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे, प्रदेश सचिव विक्रम पावसकर, धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ आदी मान्यवर उभे होते. 

भारत माता की जय अशा घोषणात देत निघालेली ही बाईक रॅली कोल्हापूर नाका, दत्त चौक, चावडी चौक मार्गे प्रीतिसंगम घाटावर पोहचली. त्याठिकाणी ना. सोम प्रकाश यांनी लोकनेते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाला पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. तसेच रॅली दरम्यान महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालाही पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच विजय दिवस चौकातील विजयस्तंभालाही अभिवादन करण्यात आले. 

यावेळी भाजपाचे कराड दक्षिण तालुकाध्यक्ष पैलवान धनंजय पाटील, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, सुदर्शन पाटसकर, सूरज शेवाळे, संतोष हिंगसे, मोहनराव जाधव, महादेव पवार, मुकुंद चरेगावकर, राजू मुल्ला, आबा गावडे, वसीम मुल्ला, संजय पवार यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


Sunday, August 28, 2022

आज जिल्ह्यात मोठी कोरोनामुक्ती

वेध माझा ऑनलाइन - सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 3 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 0 जणांचा मृत्यू झाला आहे तर 4 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 1 खंडाळा 0 खटाव 0 कोरेगांव 0 माण 1 महाबळेश्वर 0 पाटण 1 फलटण 0 सातारा 0वाई 0  व इतर 0
आणि नंतरचे वाढीव 0 असे  आज अखेर एकूण 3 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 4 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.


काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर ; 17 ऑक्टोबरला होणार काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक...

वेध माझा ऑनलाईन - गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये अध्यक्षपद बदलाच्या चर्चा सुरु आहेत. यासाठीची निवडणूक कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार,17 ऑक्टोबरला काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.

काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीची आज बैठक पार पडली. या बैठकीत अध्यक्षपदाच्या निवडीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यानुसार निवडणुकीसाठीची अधिसूचना 22 सप्टेंबरला जारी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया 24 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे तर अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर असेल. 17 ऑक्टोबरला मतदान होईल आणि 19 ऑक्टोबरला मतमोजणी केली जाईल आणि नव्या अध्यक्षाची घोषणा केली जाईल.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीत सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी परदेशातुन सहभागी झाले होते. या व्यतिरिक्त हरीश रावत, सलमान खुर्शीद, मुकुल वासनिक, मल्लिकार्जुन खर्गे, कुमारी सेलजा, मधुसूदन मिस्त्री, केसी वेणुगोपाल, जयराम रमेश, अजय माकन, अभिषेक मनु सिंघवी यांच्यासह अनेक नेते या बैठकीत काँग्रेस कार्यालयात उपस्थित होते.

दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सोनिया गांधी या काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष राहिल्या आहेत. राहुल गांधी पुन्हा काँग्रेस अध्यक्ष पदासाठी उत्सुक नाहीत अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर दिसत आहे.

काँग्रेस अध्यक्षपदासाठीचा निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे –
22 सप्टेंबर – अधिसूचना
24 सप्टेंबर – नामांकन अर्ज दाखल करण्याची तारीख 30 सप्टेंबर – नामांकन अर्ज मागे घेण्याची तारीख 17 ऑक्टोबर – मतदान
19 ऑक्टोबर – मजमोजणी

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरही शिंदे गटाचा हक्क! ; शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच मोठं विधान...

वेध माझा ऑनलाईन - गेल्या काही दिवसांपासून राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे ती दसरा मेळाव्याची. दरवर्षी ही चर्चा ‘शिवसेनेचा दसरा मेळावा’ अशी सुरू असते. यंदा मात्र ती चर्चा ‘नेमका कुणाचा दसरा मेळावा?’ अशा सुरू आहे. त्याला कारण ठरली ती एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी आणि १२ खासदारांनी केलेली बंडखोरी. सध्या राज्याचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे सरकार पडलं आणि भाजपाच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, यानंतर शिंदे गटानं जसा मूळ शिवसेना आमचीच आणि शिवसेनेचं निवडणूक चिन्ह असलेला धनुष्यबाण आमचाच अशी भूमिका मांडली, तसा आता दसरा मेळाव्यावरही शिंदे गटानं हक्क सांगितला असून त्यासंदर्भात शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी मोठं विधान केलं आहे.

शिवसेनेचे दोन तृतियांशहून जास्त लोकप्रतिनिधी शिंदे गटात असल्यामुळे शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे परिणामी शिवसेनेचं निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावर देखील शिंदे गटाचा हक्क असल्याचं सांगितलं जात आहे. पण आता मात्र शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह यासोबतच शिवसेनेच्या स्थापनेपासून काही अपवाद वगळता दरवर्षी होणाऱ्या दसरा मेळाव्यावरच शिंदे गटानं हक्क सांगितला आहे. एवढंच नाही, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यासंदर्भात निर्णय घेणार असल्याचा दावाच शिंदे गटाकडून केला जात आहे.

आदित्य ठाकरेंनी केली होती टीका
दोनच दिवसांपूर्वी शिवसेनेचे आमदार आणि उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी “दसरा मेळावा शिवसेनेचाच होता आणि शिवसेनेचाच राहील” अशी ठाम भूमिका मांडली होती. मात्र, अद्याप प्रशासनाने दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली नसून हे गद्दार राजकारण करत असल्याची टीका त्यांनी सरकारवर केली होती. मात्र, त्यानंतर आता शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांनी एक मोठं विधान केलं आहे.

त्यांना दसरा मेळावा करण्याचा काय अधिकार?”
“जे कुणी या दसरा मेळाव्यावर अधिकार सांगत आहेत, त्यांनी हिंदुत्ववादी विचारसरणीचे विचार सोडले आहेत. त्यामुळे त्यांना आता कोणता अधिकार आहे तो मेळावा करण्याचा?” असा सवाल नरेश म्हस्केंनी शिवसेनेला विचारला आहे

राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लवकरच मराठी पत्रकार परिषदे समवेत बैठक...

वेध माझा ऑनलाइन -  राज्यातील पत्रकारांचे प्रलंबित प्रश्न सोडवले जातील.त्या साठी राज्यातील पत्रकारांची प्रबळ संघटना असलेल्या मराठी पत्रकार परिषदे समवेत लवकरच बैठक आयोजित करू,अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री व सातारा जिल्ह्याचे सुपुत्र ना.एकनाथ शिंदे यांनी दिली.

मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे हे महाबळेश्वर येथे मुक्कामी आहेत.राजभवन येथे प्रथमच त्यांनी अधिकृत पत्रकार परिषद घेतली.मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम.देशमुख यांच्या सूचनेनुसार या पत्रकार परिषदे दरम्यान मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने सातारा जिल्हा पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले.राज्यातील पत्रकारांचे प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित आहेत.अनेक सरकारे आली आणि गेली पण पत्रकारांच्या प्रश्नांना न्याय मिळत नाही .मराठी पत्रकार परिषद ही एस. एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लढणारी संघटना आहे.३६ जिल्हे व ३५० तालुक्यात मराठी पत्रकार परिषदेच्या शाखा आहेत.पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी एस. एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मराठी पत्रकार परिषदेच्या आमच्या राज्यस्तरीय शिष्ट मंडळाला मुंबईत वेळ मिळावी अशी आग्रही मागणी यावेळी सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे यांनी मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे यांच्या कडे केली.मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी ही पत्रकारांनी मला ही खूप मदत केली आहे.त्यांचे प्रश्न नक्की सोडवू असे सांगत लवकरच मराठी पत्रकार परिषदेसंमवेत बैठक लावण्याच्या सूचना अधिकाऱ्याना दिल्या.राज्य व सातारा जिल्ह्याचे प्रश्न सोडवताना तुम्ही ही सूचना करत चला ,त्याचा नक्की विचार करू असेही मुख्यमंत्री म्हणाले .

निवेदन देताना मराठी पत्रकार परिषदेचे सातारा जिल्हा प्रसिध्दी प्रमुख दीपक शिंदे, महाबळेश्वर पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास काळे,सातारा शहर पत्रकार संघाचे खजिनदार राहुल तपासे,सोशल मीडिया सेलचे चंद्रसेन जाधव, वाई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विश्वास पवार,सातारा जिल्हा इले.मिडियाचे माजी अध्यक्ष सचिन जाधव, सोशल मीडिया सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत जगताप, इम्तियाज मुजावर,नीलेश शिंदे,दिनकर थोरात, प्रेषित गांधी,अभय हवालदार ,अजित जाधव, केळगणे,संजय दस्तुरे यांच्या सह प्रिंट , इले्ट्रॉनिक्स, सोशियल मीडिया चे पत्रकार उपस्थित होते .

Saturday, August 27, 2022

मंत्री शंभूराज देसाई कराडच्या सर्किट हाऊस येथे आल्यावर अचानक संतापले ; अधिकाऱ्याला म्हणाले...नवीन आहेस तर घरी जा...

वेध माझा ऑनलाइन - आज येथील सर्किट हाऊस येथे राज्याचे मंत्री शंभूराज देसाई हे पत्रकार परिषद घेण्यासाठी आले असता, त्याठिकाणी अचानक लाईट गेली...  मंत्री देसाई यांच्या लक्षात ही बाब आली तेव्हा त्यांनी तेथील एका संबंधित अधिकाऱ्यांला बोलावून घेऊन आत्ताच लाईट कशी गेली ?  अशी विचारणा केली... त्यावेळी, साहेब मला माहित नाही...मी नवीन आहे...असे त्या अधिकाऱ्याने मंत्री देसाई याना नम्रपणे सांगितले...  संतापलेल्या मंत्री देसाई यांनी त्या अधिकाऱ्याला त्यावेळी...नवीन आहेस तर घरी जा...अशा भाषेत सुनावले... खरतर अचानक लाईट गेली त्याला कोणीच काही करू शकत नाही... जवळपास कोठेतरी लाईटचे काम सुरू असेल त्यामुळे असे होऊ शकते... याबाबत व्यवस्थित शब्दात विचारणा करून माहिती घेता आली असती...मात्र हा झालेला प्रकार तेथील उपस्थित पत्रकारांसहित अनेकांना त्यांची ही भाषा ऐकताना रुचला नाही...याबाबत त्याठिकाणी लगेचच उलटसुलट चर्चाही सुरू झाली...दरम्यान, पत्रकार परिषदेत केवळ आपलयाला काय म्हणायचे आहे एवढेच बोलून व पत्रकारांच्या प्रश्नांना गुळगुळीत उत्तरे देत... मला गडबड आहे... जायचय... असे सांगून केवळ 20 मिनिटात ते तेथून निघून गेले...

दरम्यान पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री देसाई म्हणाले... राज्यात अद्याप पालकमंत्री नेमणुका झाल्या नसल्या तरी राज्यातील कोणतेही काम अथवा निर्णय थांबलेले नाहीत लवकरच याही नेमणुका होतील मात्र... त्या नेमणुका अद्याप का झाल्या नाहीत ? याचे उत्तरं देणे त्यांनी टाळले
आम्ही यापूर्वीच्या महाआघाडी सरकार मध्ये असताना काही निंर्णय इच्छा नसताना घेतले ते निर्णय या सरकारमध्ये आल्यावर आम्ही बदलले आहेत असे सांगताना सध्याचे मुख्यमंत्री हे जमिनीवर चालणारे आहेत असे सांगून त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर टीका करत पत्रकार परिषद संपवली
दरम्यान त्यांनी नुकत्याच झालेल्या राज्याच्या  अधिवेशनात आपण मांडलेल्या विषयासंबंधीत कामाचा आढावा पत्रकारांना सविस्तरपणे सांगितला तसेच पाटण, कोयनानगर याठिकाणच्या काही "अपकमिंग' कामांच्या केलेल्या तरतुदींचीही माहिती त्यांनी यावेळी दिली

गुलाम नबी आझाद स्वतःचा पक्ष येत्या 14 दिवसात सुरू करण्याच्या तयारीत...

वेध माझा ऑनलाइन - काँग्रेसला नुकताच रामराम केलेले गुलाम नबी आझाद स्वतःचा पक्ष सुरू करण्याच्या तयारीत आहेत. त्याचे पहिले युनिट 14 दिवसांत जम्मू-काश्मीरमध्ये सुरू होईल. त्यांचे निकटवर्तीय जीएम सरोरी यांनी याबाबत माहिती दिली आहे.  गुलाम नबी आझाद यांनी शुक्रवारी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून काँग्रेसचा राजीनामा दिला होता. राजीनामा देताना त्यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावरही टीका केली होती. 

माजी मंत्री जीएम सरोरी हे देखील जम्मू आणि काश्मीर काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. ज्यांनी आदल्या दिवशी गुलाम नबी आझाद यांच्या समर्थनार्थ काँग्रेसचा राजीनामा दिला होता. त्यांचे नेते वैचारिकदृष्ट्या धर्मनिरपेक्ष राहिले असून भाजपच्या इशाऱ्यावर काम करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे ते म्हणाले. माजी मुख्यमंत्री आझाद यांनी काँग्रेस सोडल्यानंतर शेकडो ज्येष्ठ काँग्रेस नेते, पंचायती राज संस्थांचे सदस्य आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी राजीनामा दिल्याचा दावाही त्यांनी केला. 

काँग्रेसच्या जम्मू आणि काश्मीर युनिटचे माजी उपाध्यक्ष सरोरी यांनी पीटीआयला सांगितले की, "आझाद आमच्या नवीन पक्षाच्या सुरूवातील त्यांच्या हितचिंतकांशी चर्चा करण्यासाठी 4 सप्टेंबर रोजी जम्मूला येत आहेत. शुक्रवारी राजीनामा दिल्यानंतर काही तासांनंतर, गुलाम नबी आझाद म्हणाले होते की ते लवकरच एक नवीन पक्ष सुरू करतील आणि त्याचे पहिले युनिट जम्मू-काश्मीरमध्ये स्थापन केले जाईल. 

आझाद म्हणाले होते की, "मला आत्ता राष्ट्रीय पक्ष सुरू करण्याची घाई नाही, पण जम्मू-काश्मीरमधील निवडणुकांची शक्यता लक्षात घेऊन मी तेथे लवकरच एक युनिट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे." जीएम सरोरी यांच्यासह अनेक माजी आमदारांनी शुक्रवारी नवी दिल्लीत गुलाम नबी आझाद यांची भेट घेतली आणि त्यांना पाठिंबा दिला. 

जीएम सरोरी म्हणाले, "आम्हाला आनंद होत आहे की ते जम्मू आणि काश्मीरमध्ये परत येत आहेत, जिथे त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केले. लोक त्यांच्या राजवटीला सुवर्णकाळ म्हणून पाहतात. गुलाम नबी आझाद यांच्या जाण्याने जम्मू-काश्मीरमधील काँग्रेस जवळजवळ संपुष्टात आली आहे.

 नवीन पक्ष विकास, समाजातील सर्व घटकांमध्ये एकता यावर लक्ष केंद्रित करेल आणि 5 ऑगस्ट 2019 पूर्वीची परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी लढा देईल, असे सरोरी म्हणाले. 5 ऑगस्ट 2019 रोजी केंद्र सरकारने राज्यघटनेच्या कलम 370 अंतर्गत जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केला आणि राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केले.

बच्चू कडुंची जीभ घसरली ; आम्ही बायकोला नाचवणाऱ्यांपैकी नाही ; आमदार रवि राणांना लगावला टोला...

वेध माझा ऑनलाइन - राज्याच्या पावसाळी अधिवेशनात बुधवारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राडा झाला. शिंदे गटातील आमदार आणि राष्ट्रवादीचे आमदार एकमेकांच्या अंगावर धावून गेले होते. त्यानंतर, गुरुवारीही सत्ताधारी पक्षातील आमदार सकाळीच विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमा झाले आणि विरोधकांच्या निषेधार्थ घोषणाबाजीला सुरुवात केली. बंडखोर आमदारांना पैसे घेतल्याच्या आरोपावरुन टार्गेट करण्यात येत आहे. त्यावरुन, माजी मंत्री बच्चू कडू यांनी अपक्ष आमदार रवि राणा यांच्यावर जबरी टिका केली आहे. आम्ही बायकोला नाचवणाऱ्यांपैकी नाही, असा टोलाच कडू यांनी आमदार रवि राणांना लगावला आहे

विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या ५० खोक्यांच्या टीकेला प्रत्त्युत्तर देताना शिंदे गटातील आमदारांकडून “सचिन वाझेचे खोके, मातोश्री ओके” असे पोस्टर झळकवण्यात आले. त्यानंतर शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी या टीकेला प्रत्त्युत्तर दिलं. आता, शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक शैलीत या टिकेचा समाचार घेतला. तसेच, विधानसभेच्या पायरीवर काय घडलं हेही त्यांनी सांगितलं. बच्चू कडूंनी अशी नामर्दासारखी काय घोषणाबाजी करत म्हणत विरोधकांना टोला लगावला. मात्र, आता भाजपच्या मित्रपक्ष असलेल्या आमदार रवि राणा यांचा खरपूस समाचार त्यांनी घेतला आहे. आमदार रवि राणा यांनी गुवाहटी म्हणत बच्चू कडूंना डिवचलं होतं. त्यावर, कडू आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. 

मी गुवाहाटीला जाणारा आमदार नाही. ना बाप बडा ना भैया, पैसा सबका रुपया,' असे म्हणत रवी राणा यांनी बच्चू कडूंवर निशाणा साधला होता. राणा यांच्या टिकेला प्रत्युत्तर देताना बच्चू कडूंची जीभ चांगलीच घसरली. 'अबे हरामखोराची औलाद...आम्ही जर गुवाहटीला गेलो नसतो तर तू मंत्रिपदाच्या शर्यतीत नसता. तू आता मंत्रिपदाच्या शर्यतीत रांग लावून आहे,' असं आमदार कडू यांनी म्हटलं. तसेच, आम्ही बायकोला नाचवणाऱ्यांपैकी नाहीत, असा टोलाही कडू यांनी आमदार रवि राणांना लगावला.
'मला तर वाटतं की काही लोक सभागृहात काहीच बोलत नाहीत आणि पायरीवर येऊन जोरजोरात बोंबलतात. पायऱ्यांवर कुणी बोललं आणि बॅनर छापले की त्याची ब्रेकिंग होते', असे म्हणत नाव न घेता आमदार अमोल मिटकरीवर निशाणा साधला. तसेच, '५० खोके, एकदम ओके वगैरे घोषणा त्यांनी केल्या. तुम्हाला जर ५० खोके दिले असं वाटत असेल, तर कारवाई करा. असं नामर्दांसारखं वक्तव्य का करत आहात? मर्दानगी असेल, तर समोर या आणि पुरावे द्या', असं आव्हानच आमदार कडूं यांनी विरोधकांना दिलं आहे. 
 



शरद पवारांचे नातू ईडी च्या रडारवर ; रोहित पवारांची ईडी चौकशी होणार ; ग्रीन एकर कम्पनीची चौकशी सुरू...

वेध माझा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांच्या अडचणी वाढवणारी बातमी समोर आली आहे. रोहित पवार हे राज्यात सत्तांतर झाल्यापासून वारंवार राज्य सरकार, भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधत आहेत. ते सध्याच्या राजकीय घडामोडींवर आपलं रोखठोक मत मांडताना दिसत आहेत. पण या सगळ्या घडामोडींदरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. रोहित पवार यांच्या पाठीमागे आता ईडीचा ससेमिराला लागण्याची शक्यता आहे. कारण रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीचे प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश ईडीने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

रोहित पवार कधीकाळी संचालक असलेल्या ग्रीन एकर कंपनीची ईडीकडून चौकशी करण्यास सुरुवात झाली आहे.

ईडीकडून रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीची प्राथमिक चौकशी ईडीकडून करण्यात येत आहे. रोहित पवार यांच्यासह राकेश वाधवान हे देखील कंपनीच्या संचालकपदी होते. ते सध्या एका बँकेतील घोटाळ्या प्रकरणी आरोपी आहेत.

काही दिवसांपूर्वी ईडीला तक्रार मिळाली होती. त्यामध्ये रोहित पवार यांचे राकेश वाधवान यांच्याशी जवळचे संबंध असून त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. २००६ ते २०१२ या कालावधीत रोहित पवार यांनी ग्रीन एकर रिसॉर्ट आणि रिअल टच प्रा. लिमिटेडचे संचालक होते. त्यात त्यांनी गुंतवणूक केली होती. त्यात रोहित पवार यांच्यासह चार लोकांची नावं होती. लखविंदर दयालसिंग, धोंडूराम जैदर, अरविंद परशूराम पटेल हे आहेत. यापैकी लखविंदर दयालसिंग हे राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांचे अत्यंत जवळचे आहेत. लखविंदर हे एचडीआयएल, हार्मनी मॉल्ससह ११ ते १२ कंपनीमध्ये राकेश वाधवान यांच्यासोबत पार्टनर होते.

आज 8 बाधित, 7 डिस्चार्ज

वेध माझा ऑनलाइन - सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 8 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 0 जणांचा मृत्यू झाला आहे तर 7 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 3 खंडाळा 0 खटाव 1 कोरेगांव 1  माण 0 महाबळेश्वर 0 पाटण 0 फलटण 0 सातारा 3 वाई 0  व इतर 0
आणि नंतरचे वाढीव 0 असे  आज अखेर एकूण 8 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 7 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.
वेध माझा ऑनलाइन - मुंबई-पुणे महामार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबई-पुणे महामार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आज प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. वाहतूक कोडींच्या या समस्येमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई-पुणे महामार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्पुरती टोलमाफीची घोषणा केली आहे. वाहतूक कोडींची समस्या सुटावी म्हणून मुख्यमंत्र्यांनी टोलमाफीची घोषणा केली आहे. या आदेशानुसार ही टोलमाफी आजच्या दिवसासाठी असणार आहे.

राज्यात सर्वत्र सध्या गणेशोत्सवाचा उत्साह आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शेकडो नागरिक आपल्या गावी जात आहेत. अनेक प्रवासी आज पुण्याच्या दिशेला जात आहेत. याशिवाय आज शनिवार आहे. शनिवार हा शक्यतो सुट्टीचा वार असतो. त्यामुळे अनेक नागरिक पर्यटनासाठी घराबाहेर पडतात. काहीजण आपल्या गावी जाण्यासाठी बाहेर पडतात. याशिवाय कोकणात गणेशोत्सवास जाणाऱ्या प्रवाशांसाठी मुख्यमंत्र्यांनी टोलमाफीची घोषणा केली आहे. पण कोकणात जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गाची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे कोकणात जाणारे अनेक प्रवासी हे पुणे-कोल्हापूर मार्गाने कोकणात जात आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई-पुणे महामार्गावर काही ठिकाणी काम सुरु आहे. विशेष म्हणजे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी काल या रसत्यावर दोन तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात आला होता. त्यानंतर आज हा रस्ता पूर्ववत सुरु आहे. पण एकंदरीत रस्त्यावर वाढलेली वाहनांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत. यात टोल नाक्यावर गाड्यांच्या लांबच लांब रागा लागणे म्हणजे दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती निर्माण होवू शकते. काही टोल नाक्यावर फास्टटॅग चालत नाही. तर काही ठिकाणी पैसे देण्यात वेळ जाणे त्यामुळे वाहतूक कोंडी वाढू शकते. या सर्व गोष्टींचा विचार करुन आजच्या दिवस मुंबई-पुणे महामार्गावर टोलमाफी करण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्री सोम प्रकाश यांच्या स्वागतासाठी कराड दक्षिण भाजपा सज्ज ; महिला व नवमतदार संवाद मेळाव्यासह बाईक रॅलीचे आयोजन

वेध माझा ऑनलाइन -  आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने देशातील १४४ मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले असून, यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात संघटनात्मक बांधणीसाठी केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश हे रविवार (ता. २८) पासून सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रमुख उपस्थितीत कराड दक्षिण मतदारसंघात सोमवारी (ता. २९) व मंगळवारी (ता. ३०) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती, भाजपाचे कराड दक्षिण तालुकाध्यक्ष धनंजय पाटील यांनी दिली आहे. 

भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले, प्रदेश सचिव विक्रम पावसकर व जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने सातारा लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असलेल्या केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश यांच्या स्वागतासाठी कराड दक्षिण भाजपा सज्ज झाली आहे. 

भाजपा कराड दक्षिणच्यावतीने सोमवारी (ता. २९) सायंकाळी ५ वाजता आटके टप्पा येथील विराज मल्टिपर्पज हॉलमध्ये भव्य महिला संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, या मेळाव्याला केंद्रीय मंत्री सोम प्रकाश संबोधित करतील. 

त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी (ता. ३०) सकाळी ९ वाजता ढेबेवाडी फाटा ते स्व. यशवंतराव चव्हाण निवासस्थान विरंगुळा बंगल्यापर्यंत बाईक रॅली काढण्यात येणार आहे. १० वाजता वेणुताई चव्हाण सभागृहात नवमतदार संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ११ वाजता कराड येथील शासकीय विश्रामगृहात ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.


Friday, August 26, 2022

आझाद यांच्या राजीनाम्यावरून माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचा काँग्रेसला घरचा आहेर ; काय म्हणाले, ..? वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय स्तरातून प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. आझाद यांनी पक्ष सोडणं दुर्दैवी आहे. पक्षाने आत्मपरीक्षण करावं, असं म्हणत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. तसेच पृथ्वीराज चव्हाण यांनी अध्यक्ष पदावरुन काँग्रेस अध्यक्षांवर निशाणा साधला पक्षाचा अध्यक्ष कळसूत्री बाहुली नसावा. या पदावरील व्यक्ती सर्वसामान्य असावी अशी अपेक्षा व्यक्त करताना पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस अध्यक्षांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक नेत्यांनी आझाद यांच्या राजीनाम्यावरुन काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

 दरम्यान, राजीनाम्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये स्वत:चा राजकीय पक्ष काढणार असल्याचं आझाद यांनी जाहीर केलं आहे. याबाबतचं वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. 16 ऑगस्ट आझाद यांनी जम्मू काश्मीर काँग्रेस प्रचार समितीच्या प्रमुखपदाचा राजीनामा देत आपल्या नाराजीचे संकेत दिले होते. त्यानंतर त्यांनी प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देत आझाद यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पत्र लिहून आझाद यांनी नाराजी व्यक्ती केली आहे.
या पत्रात खासदार राहुल गांधीवर आझाद यांनी गंभीर आरोप केले आहेत.
राहुल गांधींमध्ये अपरिपक्वता असून त्यांनी पक्षातील सल्लागार यंत्रणा उद्धवस्त केल्याचा आरोप आझाद यांनी केला आहे.
राहुल गांधींनी प्रसारमाध्यमांसमोर सरकारी अध्यादेश फाडला हे त्यांच्या
अपरिपक्वतेचं उदाहरण असल्याचा हल्लाबोल आझाद यांनी या पत्रात केला आहे.

 


आदित्य ठाकरेंनी 1 हजार कोटींचा घोटाळा केला ? काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन - विधिमंडळ अधिवेशनाचं सूप वाजल्यानंतर भाजपाच्या नेतेमंडळींनी मुंबईत शिवसेनेविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज मढमधील स्टुडिओला भेट देऊन पाहणी केली. यानंतर माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्यांनी शिवसेना आमदार आदित्य ठाकरे आणि काँग्रेस आमदार अस्लम शेख यांच्यावर तब्बल एक हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. नियमात बसत नसताना देखील आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांनी मुंबईचे पालकमंत्री असताना या स्टुडिओच्या बांधकामाला परवानगी दिली आणि त्यातून स्टुडिओचं व्हॅल्युएशन असलेल्या एक हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा किरीट सोमय्यांनी केला आहे.

“आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांच्या १ हजार कोटींच्या घोटाळ्याचं प्रात्याक्षिक आपण बघत आहोत. कोणत्याही पर्यावरण कायद्यात, सीआरझेड कायद्यात सीआरझेड एक, दोन विकास क्षेत्रात अशा बांधकामाची परवानगी देता येत नाही. जुलै २०२१ मध्ये आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांनी या जागेला भेट दिली होती. इथल्या २८ स्टुडिओंच्या बांधकामाचं मूल्यांकन एक हजार कोटी इतकं आहे. त्यावेळी परवानगी संपली होती. पण आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख या दोघा मुंबईच्या पालकमंत्र्यांनी दादागिरी केली. भ्रष्टाचारी पद्धतीने जुलै २०२१मध्ये तात्पुरती परवानगी संपल्यानंतर देखील हे बांधकाम तोडलं नाही”, असं किरीट सोमय्या यावेळी म्हणाले.
“आम्ही तेव्हा केंद्र सरकार आणि तत्कालीन महाराष्ट्र सरकारला सांगितलं की सीआरझेडमध्ये कोणतंही तात्पुरतं बांधकाम, चित्रीकरण सेट असं काहीच करता येत नाही. पण २२ फेब्रुवारी २०२१ ला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या आदेशामुळे त्यावेळच्या सचिव मनीषा म्हैसकर यांनी बेकायदेशीररीत्या सहा महिन्यांसाठी तात्पुरती परवानगी दिली होती. भाजपाच्या आमदारांनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केला. आता याची चौकशी होणार”, असं किरीट सोमय्या म्हणाले.

नोटीस देऊनही कारवाई नाही”
“या बांधकामाला बेकायदेशीर असल्याची नोटीस देऊन एक महिना झाला. पण अजूनही जिल्हाधिकारी निधी चौधरी, महापालिकेचे अधिकारी करतायत काय? इथे बांधकाम तोडलं नाही तर दुसरा मजलाही बांधला. त्यामुळे मी महापालिका अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना आणि पर्यावरण सचिवांना इशारा देतोय. महाविकास आघाडीच्या कामात त्यावेळी तुम्ही भ्रष्टाचार केला असेल. पण आता ते दिवस संपले आहेत. ताबडतोब या स्टुडिओच्या मालकांवर गुन्हा नोंदवा आणि कारवाई करा”, असं सोमय्या म्हणाले.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची जेलमध्ये तब्बेत बिघडली ; रूग्णालयात दाखल

वेध माझा ऑनलाइन -  शंभर कोटी वसूली प्रकरणात अटकेत असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविषयी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अनिल देशमुख हे गेल्या काही दिवसांपासून जेलमध्ये आहेत. या दरम्यान त्यांची आज जेलमध्ये प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. अनिल देशमुख जेलमध्ये चक्कर येवून पडले आहेत. त्यांना छातीत दुखू लागल्याने मुंबईतील जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अनिल देशमुख हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ते गेल्या काही दिवसांपासून आर्थर रोड कारागृहत आहेत. पण चक्कर येवून पडल्यामुळे त्यांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. देशमुख यांना याआधी देखील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना खांद्याचं दुखणं वाढलं होतं. तसेच त्यांना वेगवेगळ्या व्याधी देखील आहेत. त्यामुळे त्यांच्यावर काही दिवसांपूर्वी जे जे रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या खांद्याची शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान आजच्या घटनेबाबत रुग्णालय प्रशासनाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण जेलमधून याबाबतची माहिती समोर आली आहे.

काँग्रेसला रामराम करून गुलाम नबी आझाद कोणत्या पक्षात जाणार ; आझाद यांची मोठी घोषणा...

वेध माझा ऑनलाइन -  काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला रामराम करत मोठा झटका दिला आहे. आझाद यांनी सोनिया गांधी यांना पत्र पाठवत आपली नाराजी जाहीर केली आणि काँग्रेस सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला. यानंतर आझाद भाजप मध्ये जाणार की नवा पक्ष काढणार याबाबत चर्चा रंगल्या होत्या. अखेर आझाद यांनीच याबाबत काय घोषणा केली आहे ? ते पाहणे आता गरजेचे आहे

काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर गुलाम नबी आझाद यांनी मी जम्मू-काश्मीरला जाणार असल्याचं म्हटलं आहे. मी स्वतःचा पक्ष बनवणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये माझे अनेक मित्र आहेत. मी भाजपमध्ये जाणार असे विरोधक आधीच सांगत आहेत पण तसे काही नाही. मी भाजपमध्ये जाणार नाही, मी माझा नवा पक्ष काढणार आहे. अशी घोषणा गुलाम नबी आझाद यांनी केली. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

गणेशोत्सव काळात मिळणार टोलमाफी ; सरकारचे आदेशही निघाले ...

वेध माझा ऑनलाइन - राज्यातील सत्तासंघर्षानंतर पंढरीच्या वारकऱ्यांना मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी टोलमाफी घोषित केली होती. त्यावेळीच त्यांनी गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी टोलमाफीची घोषणा केली होती. आज त्याचे आदेश काढण्यात आले आहेत. गणेश चतुर्थी आठवड्याच्या मध्येच येत असल्याने आज, शुक्रवारपासूनच गणेशभक्त गावी जाण्यासाठी निघणार होते. परंतू, टोलमाफीचे पास मिळत नसल्याने त्यांची अडचण झाली होती. अखेर हे आदेश निघाले आहेत. 

गणपती कालावधीत कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना गणेशोत्सवानिमित्त पथकर माफी व इतर सोई सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत या विषयाच्या अनुषंगाने शिंदेंच्या अध्यक्षतेखाली २१ जुलै, २०२२ रोजी बैठक झाली होती. यानुसार २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत  मुंबई-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग व इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील टोल नाक्यांवरून जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमधून सवलत देण्यात येणार आहे. मात्र, यासाठी पास लागणार आहेत. 

कशी घ्यावी टोल माफी...
“गणेशोत्सव २०२२, कोकण दर्शन" असे पास वाहनांवर लावण्यात यावेत. त्यावर गाडीचा क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर नमूद करून दिला जाणार आहे. याचा नमुना देखील राज्यातील पोलीस ठाणे, आरटीओ, वाहतुक विभागांना देण्यात आला आहे. परिवहन विभाग, वाहतूक - पोलीस/पोलीस, संबंधीत प्रादेशिक परिवहन विभाग (आर.टी.ओ.) यांनी समन्वय साधून पोलीस स्टेशन, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ. ऑफिसेसमध्ये हे पास दिले जाणार आहेत. परतीच्या प्रवासाकरीता हेच पास ग्राह्य धरण्यात येणार असल्याने ते जपून ठेवावे लागणार आहेत. 

कुठे कुठे मिळतील... 
ग्रामीण वा शहरी पोलीस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्याकडे हे पास मिळणार आहेत.

आज 7 तालुके कोरोनामुक्त ;कोणते चार तालुके आहेत बाधीत?

वेध माझा ऑनलाइन - सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 4 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 0 जणांचा मृत्यू झाला आहे तर 17 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 0 खंडाळा 0 खटाव 1 कोरेगांव 0  माण 1महाबळेश्वर 0 पाटण 1 फलटण 1 सातारा 0 वाई 0  व इतर 0
आणि नंतरचे वाढीव 0 असे  आज अखेर एकूण 4 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 17 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

गुलाब नबी आझाद यांचे राहुल गांधींवर गंभीर आरोप ;

वेध माझा ऑनलाइन - काँग्रेसचे जेष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देताना पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रामध्ये गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस आणि विशेषतः राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप आणि टीकाही केली आहे.

आझाद यांनी या पत्रामध्ये म्हटलं की 'दुर्दैवाने राहुल गांधींनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर आणि विशेषत: जानेवारी 2013 मध्ये त्यांची काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आधी अस्तित्वात असलेली संपूर्ण सल्लागार यंत्रणा त्यांनी उद्ध्वस्त केली. तसंच सर्व ज्येष्ठ आणि अनुभवी लोकांना बाजूला केलं. सध्या राहुल गांधी हे अनुभन नसलेल्या लोकांच्या कोंडाळ्यात घेरले गेले आहेत यासोबतच पुढे त्यांनी लिहिलं 'राहुल गांधी यांनी पंतप्रधानांनी जारी केलेला अध्यादेश फाडून टाकणे हे त्यांची अपरिपक्वता दर्शवतं. यामुळे 2014 मध्ये पराभव पत्करावा लागला.' काँग्रेसने भारत जोडो यात्रा सुरू केल्याबाबत आझाद यांनी लिहिलं आहे की, 'भारत जोडो यात्रा' सुरू करण्यापूर्वी पक्ष नेतृत्वाने 'काँग्रेस जोडो यात्रा' करायला हवी होती.

काँग्रेसमध्ये सोनिया गांधी केवळ नाममात्र आहेत. सर्व महत्त्वपूर्ण निर्णय राहुल गांधींकडूनच घेतले जात होते. यापेक्षा वाईट शब्दांत सांगायचं झालं तर त्यांचे सुरक्षा कर्मचारी आणि खासगी सचिव निर्णय घेत होते, असा गंभीर आरोपही गुलाम नबी आझाद यांनी आपल्या पत्रातून केला आहे.

मोठी घडामोड ; संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेची युती!! ; संयुक्त पत्रकार परिषदेत घोषणा...

वेध माझा ऑनलाइन - एकीकडे शिवसेनेतील मोठा गट फोडून एकनाथ शिंदेंनी भाजपासोबत सरकार स्थापन केलं असताना दुसरीकडे राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड समोर आली आहे. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेनं हातमिळवणी केली असून इथून पुढे हे दोन्ही पक्ष एकत्र काम करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. दोन्ही पक्षांनी संयुक्तपणे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांसोबतच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. दोन्ही पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी एक समन्वय समिती देखील नेमण्यात येणार असल्याची माहिती यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी दिली.


काँग्रेसला मोठा धक्का ; गुलाम नबी आझाद नाराज ; सर्व पक्षीय पदांचा दिला राजीनामा...

वेध माझा ऑनलाइन - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आज काँग्रेस पक्षातील आपल्या सर्व पक्षीय पदांचा राजीनामा दिला आहे. त्यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. ते दीर्घकाळापासून पक्षावर नाराज असल्याची चर्चा होती. काँग्रेसने त्यांना राज्यसभेवर पाठवले नसल्याने त्यांची नाराजी अधिकच वाढल्याचे सांगितले जात होते. काही दिवसांपूर्वी आझाद यांनी काश्मीरमधील पक्षाच्या प्रचार समितीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सोनिया गांधींना उद्देशून लिहिलेल्या आपल्या पत्रात आझाद यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला

गुलाम नबी आझाद हे पक्षावर बराच काळ नाराज होते. काँग्रेसच्या G-23 बंडखोर गटाचे महत्त्वाचे सदस्य आझाद यांनी काँग्रेसमधील बदलांबाबत सोनिया गांधींना पत्रही लिहिले होते. या पत्रानंतर बराच गदारोळ झाला होता. आझाद यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा उल्लेख केला आहे. त्यांनी लिहिले की, त्यांच्या विद्यार्थी जीवनात त्यांच्यावर महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, सुभाष चंद्र बोस आणि इतर स्वातंत्र्यसैनिकांचा प्रभाव होता. १९७५-७६ मध्ये संजय गांधींच्या विनंतीवरून त्यांनी जम्मू-काश्मीर युवक काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारले आणि कुठलाही स्वार्थ न ठेवता अनेक दशके पक्षाची सेवा केली.

Thursday, August 25, 2022

देशातील सर्व टोलनाके बंद करण्याची सरकारची योजना...

वेध माझा ऑनलाइन - येणाऱ्या काही वर्षांमध्ये देशातील सर्व टोलनाके बंद करण्याची सरकारची योजना आहे. सरकार कॅमेऱ्यांच्या माध्यमातून स्वयंचलित पद्धतीने टोल वसुली करणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रायोगिक तत्त्वावर याची सुरुवात केली असून, यासंबंधातील कायद्यांमध्येही बदल करण्याचे काम सरकारकडून सुरू आहे. टोल वसुलीच्या या बदलामुळे टोल नाक्यांवरील वाहतूक कोंडी फुटणार आहे.

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, कॅमेऱ्यांच्या माध्यमातून टोलवसुली केल्याने टोल वसुलीचे काम अतिशय गतीने पूर्ण होईल आणि त्यामुळे वाहनांची कोंडीतून सुटका होणार आहे. त्याचवेळी टोलबाबत पारदर्शकताही राहणार आहे. सरकारच्या एका अहवालानुसार, फास्टैगमुळे टोलनाका परिसरातील वाहतूक कोंडी कमी झाली आहे, मात्र टोल गेटवरील वाहतूक कोंडी अद्याप काय आहे. ती कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.

देशात रस्त्यांची लांबी १.८ लाख किमीपर्यंत पोहोचणार
देशातील राष्ट्रीय महामार्गांची लांबी २०२५ पर्यंत १.८ लाख किलोमीटरपर्यंत पोहोचणार आहे, तर याच दरम्यान रेल्वे मार्गही १.२ लाख किलोमीटरपर्यंत जाईल, असे बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीज इंडियाच्या अहवालात म्हटले आहे. २०२५ पर्यंत इतके राष्ट्रीय महामार्ग व रेल्वे लाईन तयार होतील की १९५० ते २०१५ या दरम्यान जितके काम झाले त्यापेक्षा अधिक असेल. २०१५ राष्ट्रीय महामार्गांची लांबी ७७ हजार किमीपर्यंत पोहोचली. २०२५ महामार्गाची लांबी १.८ लाख किमीपेक्षा अधिक होणार आहे. १० वर्षांमध्ये महामार्गांची लांबी दुप्पटपेक्षा अधिक होण्याचा अंदाज आहे.

काय आहे सरकारी योजना?
वर्ष २०१९ मध्ये सरकारने कंपनीकडून फिट होणाऱ्या नंबर प्लेटबाबत नियम जाहीर केले होते. या कारणामुळे गेल्या ४ वर्षांमध्ये जितकी वाहने रस्त्यांवर आली आहेत, त्यामध्ये कंपनीकडून फिट केलेली नंबर प्लेट लावण्यात आली आहे. आता सरकार टोल नाका काढून टाकत त्याजागी असे कॅमेरे लावणार आहे, ज्यामुळे या नंबर प्लेटची माहिती घेत वाहनाला जोडले गेलेल्या बँक खात्यातून टोल वसुली करेल. 
गडकरी म्हणाले की, या योजनेला लागू करण्यास एक समस्या आहे. कॅमेयाच्या माध्यामातून टोल वसुली करताना जर एखाद्याने टोल दिला नाही तर त्याला दंड किती लागेल याबाबत कायद्यात काहीही तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही योजना सुरू करण्यापूर्वी दंडाची तरतूद असणारा कायदा तयार करावा लागणार आहे.
ज्या गाडीवर अशी खास नंबर प्लेट नसेल २ त्यांनी वेळेत लावून घ्यावी, यासाठी बदल करण्यात येईल. या निर्णयानंतर कॅमेऱ्यााच्या माध्यमातून टोल वसुलीची योजना सुरु करण्यात येणार आहे
महामार्गाच्या उभारणीसाठी केंद्र सरकार शेअर बाजारातून पैसे उभारण्याच्या तयारीत आहे. या अंतर्गत, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी हायवे इनव्हिट (इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट) सुरु करण्याची सरकारची योजना आहे. नितीन गडकरी म्हणाले की, याअंतर्गत महामार्ग प्रकल्पांमध्ये किरकोळ गुंतवणूक आमंत्रित करण्यात येणार आहे. या अंतर्गत गुंतवणूकदारांसाठी कमाल गुंतवणुकीची मर्यादा १० लाख रुपये असेल. यासाठी खात्रीशीर ७ ते ८% रिटर्न मिळणार आहेत.


आता रस्ता झाला ओके...सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पवार यांचे जनतेकडून आभार व्यक्त...

वेध माझा ऑनलाइन - ज्याला समाजासाठी काही ठोस काम करायचंय तो काहीही झालं तरी ते काम करतोच...याच उक्तीप्रमाणे... शहरातील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पवार यांनी लोकांच्या अडचणी समजून घेऊन कोणताही विलंब न लावता तसेच कोणतेही कारण न सांगता स्वखर्चाने रस्ता दुरुस्त करून घेऊन आपल्या वेगळेपणाची ओळख शहरात निर्माण केली आहे... यातून शहर प्रशासनाला तर चपराक बसलीच आहे... याशिवाय लोकसेवेच्या नुसत्याच गप्पा मारणाऱ्याना देखील पवार यांनी आपला आदर्श दाखवून दिला आहे... सूर्यवंशी मळा व परिसरातील रहिवाशांनी त्याठिकाणचे रस्त्याचे काम स्वखर्चाने करून लोकांची झालेली गैरसोय दूर केल्याबद्दल प्रवीण पवार यांचे आभार मानले आहेत

सूर्यवंशी मळा व त्या परिसरातील याच कामाबद्दल वारंवार तक्रार करूनही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे तेथील लोक सांगत होते... त्याच वार्डातील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पवार यांनी हा रस्ता स्वखर्चाने दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला... त्याकरिता त्यांनी कोणताही विलंब न लावता हे काम करणे आपले कर्तव्यच आहे या भावनेतून त्या रस्ताची दुरुस्ती सुरूही केली...त्यामुळे येथील प्रशासन अक्षरशः लाजले..तर काहीजण सामाजिक कार्य म्हणजे काय असते...?  हे बघायला त्या ठिकाणी भेट देऊ लागले...या विषयाची शहरात जोरदार चर्चा सुरू झाली... लोक सामाजिक कार्यबद्दल व्याख्या सांगताना आता प्रवीण पवारांच्या याच कार्याचे उदाहरण देवू लागले आहेत... पवारांच्या उत्तुंग कामाची ही पावतीच असल्याचे यानिमित्ताने म्हणावे  लागेल...दरम्यान त्या रस्त्याचे काम आता पूर्णत्वाकडेही गेले आहे  तेथील सर्व रहिवासी लोकांनी प्रवीण पवार यांचे त्याबद्दल कौतुक करत आभारही मानले आहेत... या एकूणच घटनाक्रमामुळे एक गोष्ट मात्र झाली...आणि...ती म्हणजे... प्रवीण पवार यांच्या माध्यमातून इथून पुढे सर्व नागरी सुविधा त्या परिसरात मिळतील अशी आता तेथील लोकांची खात्री झाली आहे, एवढे मात्र नक्की...!

आजचे सातारा जिल्हा कोरोना रिपोर्ट्स

वेध माझा ऑनलाइन - सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 5 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 0 जणांचा मृत्यू झाला आहे तर 9 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 0 खंडाळा 0 खटाव 1 कोरेगांव 0  माण 2 महाबळेश्वर 0 पाटण 1 फलटण 0 सातारा 1 वाई 0  व इतर 0
आणि नंतरचे वाढीव 0 असे  आज अखेर एकूण 5 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 9 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचे ठराव आज विधानसभेत एकमुखाने संमत

वेध माझा ऑनलाइन - औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचे ठराव आज विधानसभेत एकमुखाने संमत करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा ठराव विधानसभेत मांडला. त्यानुसार औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि नवी मुंबईतील विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्यात आले आहे. त्यानुसार आता या शहरांच्या नामकरणाचा प्रस्ताव दोन्ही सभागृहाकडून केंद्र सरकारच्या गृहखात्याला पाठवला जाईल असेही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं

खरं तर राज्यातील ठाकरे सरकारने औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई येथील विमानतळाच्या नामकरणाचा निर्णय घेतला होता. त्यानंतर राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे- फडणवीस सरकारने हा निर्णय कायम ठेवला होता. त्यानुसार आज विधानसभेत एकमुखाने या नामांतराला संमती मिळाली.
यानंतर औरंगाबाद शहराच्या नामांतरानंतर औरंगाबाद येथील विमानतळाला सुद्धा छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे आणि राज्य सरकारने केंद्राकडे त्यासाठी पाठपुरावा करावा, कारण ते सुद्धा आपण २ वर्षांपूर्वी विधानसभेत मंजूर करून घेतलं आहे अशी मागणी शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. त्यावर उत्तर देत त्याचा तात्काळ पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले

Wednesday, August 24, 2022

अशोक गहलोत होणार काँग्रेसचे नवे अध्यक्ष ...!!

वेध माझा ऑनलाईन - अध्यक्ष सोनिया गांधी यांनी विदेशात जाण्यापूर्वी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याशी दिल्लीत चर्चा केली
असे समजते सोनिया गांधी यांनी अशोक गहलोत यांना निर्देश दिलेत की, पक्षाला आपली गरज आहे. आम्ही सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला आहे की, आपण काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारावे. राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी कोण असावे, याचा निर्णय सोनिया गांधी घेणार आहेत असेही समजते. 

यावेळी अशोक गहलोत यांनी सांगितले की, माझ्यासह काँग्रेस पक्षाच्या तमाम कार्यकर्त्यांना असे वाटते की, राहुल गांधी यांना काँग्रेस अध्यक्ष केले जावे. त्यावर सोनिया गांधी यांनी अशोक गहलोत यांना स्पष्ट सांगितले की, गांधी कुटुंबीयातील कोणीही सदस्य अध्यक्ष बनणार नाही आणि राहुल गांधी यांचाही हाच निर्णय आहे असेही समजते. 
२०१९ मधील लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनीही आपल्या राजीनाम्यात हीच बाब मांडली होती. सोनिया गांधी यांच्या निर्देशानंतर अशोक गहलोत हे बुधवारी राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा करू इच्छित होते. पण, रात्री १२ वाजता ज्येष्ठ जयराम रमेश यांनी ट्वीट केले की, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधीसाेबत उपचारासाठी राहुल, प्रियांका गांधी विदेशात जाणार आहेत.

राहुल गांधींशी चर्चा होऊ शकली नाही
सूत्रांनी सांगितले की, गांधी कुटुंबीय विदेशात जाणार असल्याची माहिती यावेळी कोणालाही नव्हती आणि त्यामुळेच राहुल गांधी आणि अशोक गहलोत यांची चर्चा होऊ शकली नाही. 
अशोक गहलोत हे गांधी कुटुंबीयांचे विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जातात. 
त्यामुळे त्यांच्याकडे सोनिया गांधी यांचा प्रस्ताव स्वीकारण्याशिवाय कोणताही पर्याय नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घराशेजारी डान्स बार सुरू ; अजितदादांनी सुनावले...

वेध माझा ऑनलाइन - मी ठाण्यातील डान्सबार स्वत: फोडले. त्यामुळे मला गुंडांनी टार्गेट केलं होतं. पण आनंद दिघे यांनी मला वाचवलं. बार डान्स फोडणारा मी पहिला नेता आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं. शिंदे यांच्या या विधानाचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी समाचार घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी बहुमत सिद्ध केल्यानंतर सोळा डान्स बार फोडणारा मी आहे असे छातीठोक सांगितले. मात्र आता तुमच्या घराच्या शेजारी मोठ्या प्रमाणावर डान्स बार सुरू आहेत. अनेक प्रसारमाध्यमांनी याची चित्रफीतही दाखवलेली आहे. आमच्या काळात डान्स बार बंद केले होते. मात्र आता सर्रासपणे डान्सबार सुरू आहेत, असा टोला अजित पवार यांनी लगावला. तुम्ही दोघं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणजे एकाच नाण्याची दोन बाजू झालेले आहात. कळतच नाही कुठलं नाणं आहे, असा चिमटाही अजित पवार यांनी काढला.दरम्यान सत्तारूढ आमदार जाहीरपणे चिथावणी देतात कशाची मस्ती आलीय एवढी? असा सवाल देखील अजितदादांनी यावेळी केला 

तुमच्या मंत्रिमंडळामध्ये तुम्ही एवढ्या लोकांना संधी दिली. 20 लोकांना संधी दिली. पण महिलांना स्थान दिले नाही. ही राज्यासाठी लाजिरवाणी बाब आहे. अशा पद्धतीने महिलांचा अपमान व्हायला नको. आधी तुम्ही बोललात सरकारमध्ये सहभागी होणार नाही. आणि नंतर तुम्हाला सांगण्यात आलं उपमुख्यमंत्री व्हावे लागेल. जर तुम्ही दिल्लीला सांगितलं असतं की मी उपमुख्यमंत्री होतो, पण माझ्याबरोबर दोन महिलांना मंत्रिमंडळात संधी द्या तर दिल्लीवाल्यांनी दोन महिलांना मंत्री केलं असतं. एवढंच निश्चितच ऐकलं असतं, असा टोला अजित पवार यांनी लगावला.

कुणीही ताम्रपट घालून आला नाही
मागच्या दीड दोन महिन्यांपूर्वी आम्ही सत्तेत होतो. तुम्ही म्हणाल अडीच वर्षे सत्तेत होता तेव्हा तुम्ही काय केलं? सरकार कुणाचेही असो कायदा सुव्यवस्था चांगली राहिली पाहिजे. राज्यातल्या जनेतच्या सुरक्षेचा विषय असेल, महागाईचा विषय असेल, विद्यार्थ्यांचा विषय असेल, आरोग्याचा विषय असेल यासाठी राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे, असं ते म्हणाले. सत्ता आल्यानंतर आनंद होणे स्वाभाविक आहे. त्यात दुमत नाही. देवेंद्र फडणवीस तेव्हा म्हणाले मी पुन्हा येईन नंतर उद्धव ठाकरे आले. सत्तेचा ताम्रपट कुणीही घेऊन आलेले नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
सत्तारूढ आमदार जाहीरपणे चिथावणी देतात. कशाची मस्ती आलीय एवढी? दुसऱ्या एका आमदाराने अधिकाऱ्यांच्या कानाखाली मारली. कायदा सामना आहे हे मला सांगण्यापेक्षा मागेही सांगावं लागत. आमदारांचं हे वागणं चुकीचं आहे. त्यामुळे सर्वच आमदार असे वागतात की काय असा मेसेज जातो, असं ते म्हणाले.

आजचे कोरोना रिपोर्ट्स

वेध माझा ऑनलाईन - सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 11 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 0 जणांचा मृत्यू झाला आहे तर 17 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 3 खंडाळा 0 खटाव 1 कोरेगांव 1  माण 1 महाबळेश्वर 0 पाटण 1 फलटण 0 सातारा 3 वाई 1  व इतर 0
आणि नंतरचे वाढीव 0 असे  आज अखेर एकूण 11 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 17 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

Tuesday, August 23, 2022

भाजपकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवारांनी व्यक्त केला संताप ; अनिल देशमुख, नवाब मलिक ,संजय राऊतांवर ईडीने केलेल्या कारवाईवर व्यक्त केली नाराजी ; नवाब मलिक यांची काय चूक होती ; पवारांचा सवाल...

वेध माझा ऑनलाइन - सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली सुनावणी, सध्या सुरू असलेले विधिमंडळाचे अधिवेशन, त्यात विरोधकांकडून सरकारला कोंडीत पकडण्याचे होत असलेले प्रयत्न अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. जिथे सत्ता नव्हती तिथे आणली. भाजपकडून सत्तेचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप करत अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर आता संजय राऊतांवर ईडीने केलेल्या कारवाईवर संताप व्यक्त करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

देशातील अनेक राज्यात भाजपची सत्ता नाही. जिथे नव्हती तिथं आणली गेली. महाराष्ट्रातही भाजपची हुकुमत नव्हती, पण शिवसेनेचे आमदार गेल्याने भाजपची हुकुमत आल्याची खोचक टीका पवार यांनी केली आहे. शरद पवार दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक झाली. ते विरोधात लिहित होते, म्हणून त्यांच्यावर कारवाई केली. अशा पद्धतीने देशात कारवाया केल्या जात आहेत. देशात सत्तेचा गैरवापर केला जात असल्याचा आरोपही शरद पवार यांनी केला. 

नवाब मलिक यांची काय चूक होती? 
आज हुकुमत त्यांच्या हातात आहे. जो राजकीय पक्ष किंवा नेता त्यांच्याविरोधात बोलतो त्याच्या विरोधात चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जाते. अनिल देशमुख गृहमंत्री होते, त्यांना अटक केली. त्यांच्याविरोधात चार्जशीट दाखल केली. त्यांच्यावर १०० कोटींचा आरोप करण्यात आला. नवाब मलिक यांची काय चूक होती? २० वर्षांपूर्वी काही व्यवहार झाला होता. दिल्लीतील उपमुख्यमंत्र्यांवर कारवाई होत आहे. चुकीचे काम केले तर आमचे समर्थन नाही. केंद्र सरकारकडून ईडी, सीबीआयचा वापर होतोय. ईडी, सीबीआयला सोबत घेऊन सध्या काम केले जात आहे, असा दावाही शरद पवार यांनीही केला. 
दरम्यान, देशातील लोकांमध्ये संभ्रम आहे. भाजप आणि त्यांच्या नेत्यांजवळ आज बहुमत आहे. पण हे उचित बहुमत नाही. देशातील अनेक राज्यात भाजपची सत्ता नाही, असेही शरद पवार म्हणाले.

आज कराडची रुग्णसंख्या पुन्हा वाढली ; जिल्ह्यात कोरोना पेशंटच्या संख्येत चढ-उतार...

वेध माझा ऑनलाइन - सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 14 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 0 जणांचा मृत्यू झाला आहे तर 19 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 4 खंडाळा 0 खटाव 3 कोरेगांव 2  माण 1 महाबळेश्वर 0 पाटण 0 फलटण 0 सातारा 2 वाई 0  व इतर 0
आणि नंतरचे वाढीव 2 असे  आज अखेर एकूण 14 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 19 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

सत्ता संघर्षाची सुनावणी ५ सदस्यांच्या खंडपीठाकडे वर्ग ; शिवसेना कोणाची याबाबतही फैसला दोन दिवसांनीच...?

वेध माझा ऑनलाइन - महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर नेमका काय निर्णय होणार? यासंदर्भातल्या सुनावणीवर आज सकाळपर्यंत अनिश्चितता होती. अखेर हा विषय आजच्या वेळापत्रकात समाविष्ट करण्यात आल्यानंतर अपेक्षेप्रमाणे या प्रकरणाची सुनावणी ५ सदस्यांच्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आलं आहे. या प्रकरणाची सुनावणी आता २५ ऑगस्ट रोजी होणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून यावेळी नमूद करण्यात आलं आहे. याशिवाय, धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नेमकं कुणाचं? या मुद्द्यावर आज दुपारी ३ वाजता नियोजित असलेली सुनावणी देखील दोन दिवसांसाठी पुढे ढकलण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

यासंदर्भातील पाच याचिकांचा समावेश सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा, न्यायमूर्ती हिमा कोहली व न्यायमूर्ती सी.टी. रवीकुमार यांच्या त्रिसदस्यीय पीठाच्या मंगळवारच्या दैनंदिन व पुरवणी कार्यसूचीत सोमवारी रात्रीपर्यंत करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे मंगळवारच्या सुनावणीबाबतही रात्री उशिरापर्यंत अनिश्चितता होती. मात्र, आज सकाळी कपिल सिब्बल यांनी यासंदर्भातील याचिकांवर तातडीने सुनावणी घेण्यासाठी हा विषय कार्यसूचीमध्ये समाविष्ट करण्याची विनंती केली होती. त्यानुसार आज दुपारी साडेबाराच्या सुमारास यावर सुनावणी घेण्यात आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटातील आमदारांना बजावलेल्या आमदारांच्या नोटीसा, शिवसेना नेते सुभाष देसाई, मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी शिंदे सरकारची वैधता, विधानसभा अध्यक्षांची निवड आदी मुद्दय़ांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यासंदर्भातील पाच याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत.

Monday, August 22, 2022

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार ; सर्वोच्च न्यायालयानं हे प्रकरण पटलावर घ्यायला दिली मान्यता...

वेध माझा ऑनलाइन - महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. दुपारी साडेबारा वाजता तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. वारंवार तारीख पुढे जात असल्यानं सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेनेच्या वकिलांनी हे प्रकरण मेन्शन केलं होतं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं हे प्रकरण पटलावर घ्यायला मान्यता दिली आहे. 

यापूर्वी 3 आणि 4 ऑगस्ट अशी सलग दोन दिवस सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. तेव्हापासूनच सातत्यानं हे प्रकरण पुढे ढकललं जात होतं. शिवसेनेसाठी हे प्रकरण अत्यंत महत्त्वाचं असल्यामुळे त्यांनी आज हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या वतीनं तातडीनं मेन्शन करण्यात आलं. त्यामुळे आज अखेर या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. 
दरम्यान, महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात होणारी सुनावणी गेल्या 24 तासांत दुसऱ्यांदा लांबणीवर गेली होती. सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीबाबत अनिश्चितता होती. सुप्रीम कोर्टाच्या सप्लिमेंट्री लिस्टमध्ये महाराष्ट्राच्या कामकाजाचा आजसाठी समाविष्ट नव्हतं. त्यामुळे सुनावणी आज होण्याची शक्यता कमीच दिसत होती. अशातच वारंवार तारीख पुढे जात असल्यानं सुप्रीम कोर्टात आज शिवसेनेच्या वकिलांनी हे प्रकरण मेन्शन केलं होतं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं हे प्रकरण पटलावर घ्यायला मान्यता दिली आहे. त्यामुळे आज या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. 
महाराष्ट्रात नवनिर्वाचित शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं असलं, तरी सत्तापेच मात्र कायम आहे. कारण महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच अद्याप सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत 'तारीख पे तारीख'चं सत्र सुरु झालं आणि जूनपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणाच्या सलग चार तारखा लांबणीवर गेल्या. 
यापूर्वी हे प्रकरण 22 तारखेला सहाव्या क्रमांकावर सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात होतं. पण त्यावेळीही सुनावणी पुन्हा लांबणीवर गेल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांनी जोर धरला आहे. दरम्यान, सध्याचे सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा यांच्या कारकिर्दीत प्रकरणातच या सत्तासंघर्षाचा ऐतिहासिक फैसला होणार की, मोठ्या खंडपीठाकडे प्रकरण सोपवलं जाणार? हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.

आजचे सातारा जिल्हा कोरोना रिपोर्ट्स


वेध माझा ऑनलाइन - सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 3 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 0 जणांचा मृत्यू झाला आहे तर 14 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 0 खंडाळा 0 खटाव 1 कोरेगांव 0  माण 1 महाबळेश्वर 0 पाटण 1 फलटण 0 सातारा 0 वाई 0  व इतर 0
आणि नंतरचे वाढीव 0 असे  आज अखेर एकूण 3  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 14 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

आता काँग्रेसमधील एक माजी मुख्यमंत्री शिंदे गटात जाणार ? हे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी सभागृहात गैरहजर होते...

वेध माझा ऑनलाइन - एकनाथ शिंदे  यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीच्या धक्क्यातून अद्यापही शिवसेना सावरताना दिसत नाही. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंचा एकामागून एक बैठकांचा सपाटा सुरू असून, आदित्य ठाकरे प्रचंड सक्रीय झाले आहेत. यातच एकनाथ शिंदे गटाला दिवसेंदिवस राज्यभरातून पाठिंबा वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे आता अन्य पक्षातूनही शिंदे गटात येणाऱ्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. यातच आता काँग्रेसमधील एक माजी मुख्यमंत्री शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. याचे कारण म्हणजे शिंदे गटातील कृषितमंत्री अब्दुल सत्तार यांची भेट.

अब्दुल सत्तार यांनी नांदेडमध्ये काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी बंद दाराआड झालेली बैठक सध्या राजकारणात चर्चेचा विषय बनली आहे. राजकीय वर्तुळात या बैठकीचे अनेक अर्थही काढले जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे सरकारच्या आढावा बैठकीला आल्यानंतर अब्दुल सत्तार हे अशोक चव्हाण यांना त्यांच्या निवासस्थानी भेटण्यासाठी गेले होते. ही बैठक सुमारे अर्धा तास चालली. विशेष म्हणजे यावेळी कुणालाच आत येऊ दिले नाही
दरम्यान, याबाबत बोलताना, अशोक चव्हाण यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायला गेलो होतो. यांना संपूर्ण महाराष्ट्राविषयी चांगले ज्ञान आणि समज आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचीही चांगली जाण आहे. त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी भेट घेतली असे त्यांनी सांगितले. 

अशोक चव्हाण नाराज?
ही भेट शिष्टाचाराचा एक भाग असल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी चव्हाण हे पक्षनेतृत्वावर नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली होती. एवढेच नाही तर एकनाथ शिंदे सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशीही ते सभागृहात गैरहजर होते. दरम्यान, अलीकडेच अस्लम शेख यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या बंगल्यावर भेट घेतली होती. या भेटीनंतर अस्लम शेख लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. एवढेच नाही तर त्यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचेही नाव समोर येत होते. हे दोन्ही नेते काँग्रेस सोडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होऊ शकतात, असा दावा केला जात असल्याचे सांगितले जात आहे.

आता नगरपालिका निवडणुका लवकर होणार नाहीत...!

वेध माझा ऑनलाइन - 92 नगरपरिषदांसाठी ओबीसी आरक्षण लागू होणार की नाही याचा फैसला लांबणीवर गेला आहे. आज सर्वोच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीत, पाच आठवडे स्थिती जैसे थे ठेवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. तसेच, या संदर्भात सुनावणीसाठी विशेष खंडपीठ गठीत केलं जाणार आहे. दरम्यान न्यायालयाच्या या निर्देशांमुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, ती म्हणजे, आता या काळात निवडणुका होणार नाहीत. तसेच, या निवडणुकांमध्ये आरक्षण लागू होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. 

92 नगरपरिषदांसाठी ओबीसी आरक्षण लागू होणार अथवा नाही यासंदर्भातला फैसला आता लांबणीवर पडला आहे. ओबीसी आरक्षणाचा सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निकाल आगामी 92 नगरपरिषदांना लागू होत नव्हता. मात्र या निकालावर राज्य सरकारनं पुनर्विलोकन याचिका दाखल केली होती. यावर आज सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं पाच आठवडे स्थिती जैसे थे ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय विशेष खंडपीठ गठित करणार असल्यानं ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.
न्यायालयाच्या या निर्देशांमुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, ती म्हणजे, आता या काळात निवडणुका होणार नाहीत. तसेच, या निवडणुकांमध्ये आरक्षण लागू होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. कारण गेल्या सुनावणी वेळी सर्वोच्च न्यायालयाच्या एका खंडपीठानं स्पष्टपणे सांगितलं होतं की, तुम्ही वारंवार आमच्याकडे येतात. पण आम्ही तुम्हाला यापूर्वीच सांगितलं आहे की, निवडणूक आयोगानं ही निवडणूक नोटीफाय केल्यानंतर तुम्हाला आरक्षण लागू करता येणार नाही. आणि जर तसं केलं, तर मात्र तो न्यायालयाचा अवमान मानला जाईल. पण आता खंडपीठानं पाच आठवडे स्थिती जैसे थे ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. आणि त्यानंतर विशेष खंडपीठ गठीत करणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे निर्णयाची शक्यता न्यायालयानं खुली ठेवली असल्याचं म्हणता येईल.

Sunday, August 21, 2022

उद्धव- राज एकत्र येणार...? शर्मिला ठाकरेंच सूचक विधान...

वेध माझा ऑनलाइन - राज्यात सत्तांतर झाल्यावर शिवसेनेचं मोठं नुकसान झालं. त्यानंतर शिवसेना आणि मनसे म्हणजेच शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि मनसेचे राज ठाकरे यांनी एकत्र यावं असा काहीसा सूर काही कार्यकर्त्यांकडून येत होता. त्यानंतर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार का? हा प्रश्न विचारल्यावर राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या प्रश्नावर राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी दिलेल्या उत्तरावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. शर्मिला ठाकरे या प्रश्नावर उत्तर देताना म्हणाल्या की, "साद घातली तर येऊदेत." त्यानंतर आता त्यांच्या या वक्तव्याची चर्चा सुरू झाली असून ठाकरे बंधू एकत्र येणार का? या चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेनेने पुढाकार घेतला तर ही युती होऊ शकते असाही विश्वास व्यक्त केला जात आहे.
शर्मिला ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलं असून राज्यात सत्तांतर झाल्यावर शिवसेनेचं मोठं नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत ४० आमदार घेऊन शिवसेनेला बंड करत राज्यात भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. त्यानंतर आता शिवसेना आपली संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. यावेळी दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यायला पाहिजे असं मत अनेकांकडून व्यक्त करण्यात येत होतं. या चर्चेविषयी विचारले असता राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी, "त्यांनी साद घातली तर येऊदेत" असं वक्तव्य केलं.

सातारा जिल्ह्याचे आजचे कोरोना रिपोर्ट्स

वेध माझा ऑनलाइन - सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 6 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 1 जणांचा मृत्यू झाला आहे तर 9 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 0 खंडाळा 0 खटाव 0 कोरेगांव 3  माण 0 महाबळेश्वर 0 पाटण 0 फलटण 0 सातारा 2 वाई 0  व इतर 1
आणि नंतरचे वाढीव 0 असे  आज अखेर एकूण 6  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 9 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

कराड दक्षिणचा रखडलेला विकास येत्या अडीच वर्षात गतिमान करणार ; डॉ. अतुल भोसले : वाठार येथे ५.५० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन...

वेध माझा ऑनलाइन - गेल्या अडीच वर्षांपूर्वी जनमताच्या विरुद्ध जात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमुळे कराड दक्षिणमध्ये विकासाची गंगा रखडली होती. पण राज्यात नुकतेच पुन्हा भाजपा-शिवसेना युतीचे सरकार आल्यामुळे, आता येणाऱ्या अडीच वर्षात कराड दक्षिणचा विकासाचा बॅकलॉग भरुन काढण्याचा कसोशीने प्रयत्न करणार असल्याची ग्वाही, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी दिली. वाठार (ता. कराड) येथे विविध विकासकामांच्या भूमीपूजन व उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
दरम्यान कराड दक्षिणमधील गावांच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे 
असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले...

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत जलजीवन मिशन अंतर्गत वाठार गावासाठी मंजूर झालेल्या ५.५० कोटी रुपयांच्या २४ बाय ७ नळपाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन डॉ. भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी रोजगार हमी योजनेअंतर्गत रेठरे-वाठार शिव पाणंद रस्ता (१३ लाख ५८ हजार), मालखेड-वाठार शिव पाणंद रस्ता (१३ लाख २४ हजार), इनाम पाणंद रस्ता (७ लाख ३० हजार) अशा एकूण ३४ लाख रुपयांच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले.

याप्रसंगी य. मो. कृष्णा कारखान्याचे संचालक दत्तात्रय देसाई, दयानंद पाटील, जि. प. सदस्य गणपतराव हुलवान, भाजप तालुकाध्यक्ष धनाजी पाटील, सरपंच शोभाताई पाटील, उपसरपंच सचिन पाटील आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना डॉ. भोसले म्हणाले, की राज्यात भाजपा-शिवसेनेचे युतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात पुन्हा एकदा विकासाची गंगा गतिमान करण्यास प्रयत्नशील आहेत. नव्या सरकारने सत्तेवर आल्याबरोबर शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यास सुरवात केली आहे. लोकाभिमुख कारभार करणाऱ्या या सरकारच्या माध्यमातून कराड दक्षिणमध्ये मोठ्या प्रमाणावर विकासनिधी आणण्याचा आमचा मानस असून, कराड दक्षिणमधील गावांच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.

दरम्यान, यावेळी डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते जि.प. सदस्य गणपतराव हुलवान यांच्या निधीतून मंजूर झालेल्या बाळोबा मंदिर सुशोभीकरण (९ लाख), स्मशानभूमी रंगकाम, श्री म्हसोबा मंदिर सोलर लॅम्प (२ लाख), श्री म्हसोबा मंदिर व हुनमान मंदिर सुशोभीकरण (३ लाख), श्री भैरोबा मंदिर बंदिस्त गटार बांधकाम (२ लाख), बेघर वस्ती व चर्मकार वस्ती येथे पाण्याच्या टाकीची उभारणी (३ लाख), राम मंदिर सुशोभीकरण (३ लाख), बौद्ध वस्ती शौचालय उभारणी (१.२० लाख), रेठरे रस्ता ड्रेनेज पाईपलाईन व काँक्रिटीकरण (१७ लाख) व एलईडी लॅम्प उभारणी (१.२० लाख), जि.प. शाळा किचन शेड (३लाख), हायमास्ट दिवा उभारणी (१.५० लाख) अशा एकूण ४८ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमीपूजन व उद्‌घाटनही करण्यात आले.

यावेळी कृष्णा सहकारी बँकेचे संचालक प्रमोद पाटील, हर्षवर्धन मोहिते, जयवंतराव भोसले नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन दत्तात्रय पाटील, सदाशिव भोसले, अभिषेक मोरे, ग्रा. पं. सदस्य अभिजित पाटील, मालखेडचे उपसरपंच युवराज पवार, सोसायटीचे चेअरमन बाजीराव माने, ओंकार पाटील, राहुल पाटील, उमेश मोहिते, धनाजी जाधव, अनिल मोहिते, तानाजी पाटील, देवानंद पाटील, महेश मोहिते, सागर साळुंखे, दिनकरारव मोरे, पांडुरंग पाटील, पांडुरंग गावडे, सुनील शिंदे, चंद्रकांत देसाई, जगन्नाथ देसाई, रमेश पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पवार यांनी सुरू केली स्वखर्चाने रस्त्याची दुरुस्ती... शहरातून होतय कौतुक...

वेध माझा ऑनलाइन - कराड शहरात समाविष्ठ झालेला सुर्यवंशी मळा बर्गे वस्ती शिंदे वस्ती वडार वस्ती हुसेन मोहल्ला या भागातील रस्ता पावसामुळे खूपच खराब झाला आहे याबाबत प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पवार यांनी तो रस्ता स्वखर्चाने दुरुस्त करण्याचे काम हाती घेऊन शहरासमोर एक आदर्श निर्माण केला आहे 

एखाद्या वार्डातील काम वारंवार तक्रार करूनही प्रशासन करत नसेल किंवा त्या कामाला... आज या...उद्या या...असे म्हणत... उशीर करत असेल तर त्या भागातील लोक अक्षरशः पालिकेत हेलपाटे मारून हतबल झाल्याचे आपण अनेकदा पाहीले आहे...मग त्याच वार्डातील एखादा दानशूर तिथंल्या लोकांच्या पाठीशी उभा राहतो... आणि ती समस्या स्वखर्चाने सोडवतो... अशीच काहिशिं परिस्थिती शहरातील सूर्यवंशी मळा याठिकाणी सध्या पहायला मिळत आहे...
त्याठिकाचा रस्ता झालेल्या पावसामुळे खूपच खराब झाला असल्याने तेथील लोकांची मोठी गैरसोय होत आहे गाड्या घसरून अपघात होणे लहान मुले वृद्ध लोकांना त्या रस्त्यावरून जाताना कसरत करून जावें लागणे अशा अनेक घटना तिथे होत आहेत...  तेथील लोक पालिका प्रशासनाकडे याबाबत तक्रार घेऊन गेले तर प्रशासनाने त्याबाबतची कसलीच दखल घेतली नाही अशा तक्रारी तेथील लोक बोलून दाखवु लागले आहेत...तेथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पवार यांना ही बाब लक्षात आली तेव्हा त्यांनी त्या रस्त्याबाबत आपण स्वतः स्वखर्चाने काम करून घ्यायचा निर्णय घेतला व तेथील रस्त्याचे काम सुरू केले... त्या ठिकाणी एकूण 3 ते 4 हजार लोकवस्ती आहे, शेकडो कुटुंब आहेत... या सर्वांना त्या खराब रस्त्याचा त्रास होणार नाही यासाठी आता प्रवीण पवार सरसावले आहेत... त्या ठिकाणी ड्रेनेज लाईनची खुदाई करून ठेवली होती... त्यामुळे त्याठिकाणी पावसाने मोठया प्रमाणात चिखल झाला आहे... त्या रस्त्याचे डांबरीकरणदेखील काही वर्षांपूर्वी आणि एकदाच झाल्याचे बोलले जात आहे... अशा प्रकारची अवस्था असलेल्या त्या परिसरातील लोकांना आता प्रवीण पवार यांच्या प्रयत्नामुळे पुन्हा सर्व नागरी सुविधा त्याठिकाणी नक्की मिळतील अशी आशा आता वाटू लागली आहे...

Saturday, August 20, 2022

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठी फूट पडण्याची भीती, सोनिया गांधी बॅकफूटवर, हायकमांडने मोठा निर्णय बदलला...

वेध माझा ऑनलाइन - महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडू शकतं. शिवसेनेत पडलेली फूट हे त्याचं ताजं उदाहरण आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्या फुटीनंतर आता काँग्रेसमध्ये मोठी फूट पडणार असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांचं नाव त्यामध्ये आघाडीवर होतं. अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती. पण त्यावर चव्हाणांनी या चर्चा खोट्या असल्याचं सांगत स्पष्टीकरण दिलं होतं. पण तरीही काँग्रेसचा मोठा गट फुटणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे काँग्रेस हायकमांडने मोठा निर्णय घेतला आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या बहुमत चाचणीच्या वेळी काँग्रेसचे 11 आमदार सभागृहात अनुपस्थित होते. त्यामुळे काँग्रेस हायकमांड या 11 आमदारांवर कारवाई करणार असल्याची माहिती समोर आली होती. या आमदारांमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांचंदेखील नाव होतं. या कारवाईमुळे अशोच चव्हाण भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा जोर धरु लागल्या होत्या. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले तर मोठा फटका काँग्रेसला बसू शकतो. कदाचित महाराष्ट्रातील अनेक काँग्रेस आमदार त्यांच्यासोबत भाजपमध्ये जावू शकतात. या भीतीने काँग्रेस हायकमांडने त्या 11 आमदारांवर कारवाई न करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे 11 आमदारांवर कारवाई करण्याची शिफारस निरीक्षक मोहन प्रकाश यांनी केली होती. पण आता कारवाई करण्यात येणार नाही, अशी माहिती मिळत आहे.


नेमकं प्रकरण काय?
एकनाथ शिंदे यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावेळी काँग्रेसच्या अनेक आमदारांच्या अनुपस्थितीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच त्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाईची मागणी केली होती.
विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 20 जूनला मतदान पार पडलं होतं. या निवडणुकीत काँग्रेसच्या दोन उमेदवारांपैकी एकाचा पराभव झाला होता. काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांचा विजय झाला. तर चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. या निवडणुकीत काँग्रेसच्या सात आमदारांची मते फुटल्याची बातमी समोर आली होती. या घटनेप्रकरणी देखील पक्षात खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकरणी कारवाईची मागणी केली होती. पक्षश्रेष्ठींनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. त्यामुळे आमदारांना नोटीस बजावण्यात आली आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडे ही कारवाई मागणी केली होती. एका दलित उमेदरावाचा पराभव ही बाब गांभीर्याने घ्यायला हवी. या प्रकरणी चौकशी व्हायला हवी. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी अनेक आमदारांची सभागृहात अनुपस्थिती हे देखील योग्य नाही, असंदेखील पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले होते. त्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोहन प्रकाश यांना याप्रकरणी निरीक्षक म्हणून नेमलं होतं. त्यानंतर मोहन प्रकाश यांनी महाराष्ट्रात येवून तपास केला आणि त्याचा अहवाल हायकमांडकडे सुपूर्द केला होता. तसेच 11 आमदारांवर पक्ष शिस्तीचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाईची शिफारस केली होती. पण कारवाई केली तर काँग्रेसमध्ये मोठी फूट पडेल अशी चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेस हायकमांडने कारवाई न करण्याचा निर्णय घेतला आहे.

विश्वासदर्शक ठरावावेळी अनुपस्थित राहिलेल्या काँग्रेस हायकमांडची 'या' आमदारांना दिली होती नोटीस
अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री
विजय वडेट्टीवार, माजी मंत्री
झिशान सिद्दिकी, आमदार वांद्रे पूर्व
धीरज देशमुख, लातूर ग्रामीण
कुणाल पाटील, धुळे ग्रामीण
राजू आवळे, हातकणंगले
मोहन हंबर्डे, नांदेड दक्षिण
शिरीष चौधरी, रावेर
माधवराव पाटील जवळगावकर, 
हदगाव-हिमायतनगर



आजचे सातारा जिल्ह्याचे कोरोना रिपोर्ट्स

वेध माझा ऑनलाईन - सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 8 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 0 जणांचा मृत्यू झाला आहे तर 4 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 1 खंडाळा 0 खटाव 1 कोरेगांव 0 माण 0 महाबळेश्वर 1 पाटण 0 फलटण 2 सातारा 1वाई 1 व इतर 1
आणि नंतरचे वाढीव 0 असे  आज अखेर एकूण 8  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 4 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

मुंबई पोलिसांना धमकीचा मेसेज केल्याप्रकरणी विरारमधून एक संशियत पोलिसांच्या ताब्यात ; चौकशी सुरु ...

वेध माझा ऑनलाईन - मुंबई पोलिसांना धमकीचा मेसेज केल्याप्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. 26/11 सारखा हल्ला करण्याची मेसेजवरुन धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी विवारमधून एका संशियत व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरु आहे. एटीएस आणि मुंबई पोलीस याबाबत अधिक तपास करणार आहेत. दरम्यान, पाकिस्तानमधील एका क्रमांकावरुन मुंबई ट्रॅफिक पोलिसांच्या whatsapp वर धमकीचा मेसेज आला होता. यामध्ये भारतामधील सहा व्यक्ती आमच्यासोबत असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यांचे नंबरही धमकीच्या मेसेजमध्ये देण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरु केला होता. 

पोलिसांनी सर्व क्रमांक ट्रॅक करण्याचं काम सुरु केलं होतं. यातील बरेच क्रमांक उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये लोकेट होत होते. पण एक नंबर विरार येथून ट्रव्हल करत असताना निदर्शनास आले. त्यानंतर लगेच एक स्पेशल पोलीस पथक रवाना झालं अन् त्याला ताब्यात घेण्यात आलं. याबाबत अद्याप पोलीस अथवा एजन्सीकडून माहिती मिळालेली नाही. पण सध्या त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं असून चौकशी सुरु आहे. तो व्यक्ती कोण आहे? काय काम करतो? त्याचं बॅकग्राऊंड काय? त्या व्यक्तीचं व्हेरिफिकेशन करण्यात येणार आहे. त्या व्यक्तीचा नंबर पाकिस्तानमध्ये बसलेल्या व्यक्तीला कसा मिळाला? याचा तपास करण्यात येणार आहे. तो व्यक्ती दोषी आढळला तरच त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. 

आदित्य ठाकरेंचे बॅनर फाडले ; काय आहे बातमी ?

वेध माझा ऑनलाइन - युवासेनेचे प्रमुख आमदार आदित्य ठाकरे आजपासून जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यातील शिवसेनेचे पाच आमदार शिंदे गटात गेल्यानंतर शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे बंडखोर आमदार किशोर पाटील, गुलाबराव पाटील आणि चिमण आबा पाटील यांच्या मतदार संघात जाणार आहेत पाचोरा, धरणगाव, पारोळा, मालेगावमध्ये आदित्य ठाकरे हे शिवसैनिकाशी संवाद साधणार आहेत. दरम्यान आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याआधी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 
आदित्य ठाकरे यांचा आज धरणगावात ज्या मार्गाने प्रवेश होणार आहे. त्याच मार्गावरील बॅनर फाडल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली आहे. यामुळे काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता. आदित्य ठाकरे यांचा शिव संवाद यात्रा दौरा आज दुपारच्या दरम्यान धरणगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकजवळ आयोजित केला आहे. यानिमित्ताने धरणगाव शहरात शिवसेना आणि युवा सेनेकडून आदित्य ठाकरे यांचे स्वागत बॅनर जागोजागी लावले आहेत.  शुक्रवारी मध्यरात्री काही अज्ञातांकडून हे बॅनर फाडल्याचा प्रकार घडला आहे. जवळपास सहा ते सात ठिकाणी हे बॅनर फाडण्यात आले आहेत.  या घटनेमुळे शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला आहे. 

26/11 सारखा मुंबईवर हल्ला करणार असल्याची पाकिस्तानातून आली धमकी ; मुंबईत हाय अलर्ट...

वेध माझा ऑनलाइन - 26/11 रोजी मुंबईत झालेला दहशतवादी हल्ला महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. या दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप लोकांनी आपले जीव गमावले होते. अशातच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. 26/11 सारखाच हल्ला पुन्हा करण्याची धमकी पाकिस्तानमधून देण्यात आली आहे. 26/11 सारखा दहशतवादी हल्ला करण्याची धमकी मुंबई ट्राफिक पोलिसांना देण्यात आली आहे.

ट्राफिक पोलिसांच्या कंट्रोल रुममधील व्हॉट्सअॅप नंबरवर धमकीचा मेसेज आला आहे. या मेसेजमध्ये ६ दहशतवादी भारतात पोहोचल्याचा दावा केला गेला आहे. तसंच लवकरच मुंबईत २६/११ सारखा हल्ला करण्याची धमकी यात दिली गेली आहे. या मेसेजनंतर एकच खळबळ उडाली असून मुंबई पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला आहे

Friday, August 19, 2022

आपल्या जिल्ह्यात डॉल्बी वाजलीच पाहिजे ; खा उदयनराजे यांचा आक्रमक पवित्रा

वेध माझा ऑनलाइन - आपल्या जिल्ह्यात मी तर म्हणतो, डाॅल्बी पाहिजेच अन् वाजलीच पाहिजे, असे आक्रमकपणे भाजप खा. छ. उदयनराजे भोसले यांनी सांगितले आहे.

सातारा येथे छ. उदयनराजे यांनी माध्यमांशी संवाद साधला. छ. उदयनराजे भोसले म्हणाले, ज्या लोकांनी डाॅल्बी विकत घेतले आहे, त्यांनी काय करायचे. तुम्ही त्यांची डाॅल्बी घ्या, त्याचे पैसे द्या अन् तुम्हांला त्या डाॅल्बीचे जे काही करायचे ते करा. ज्यांनी गुंतवणूक केली आहे. त्याचा तुम्ही विचार करणार आहे की नाही. डाॅल्बी व्यावसायिकाचे सर्व काही व्यवस्थित असते, तर त्यांनी गुंतवणूक केली असती का?

 कुठला तरी लोकप्रतिनिधी सांगतो, हे करा, ते करू नका. कोण हे सांगणार ? डाॅल्बीला परवानगी दिली पाहिजे, अन् का नाही दिली पाहिजे याच शासनाने उत्तर द्यावे, परंतु डाॅल्बी वाजलीच पाहिजे. 2-3 तास डाॅल्बी चालली म्हणजे असे काय आभाळ कोसळते ?. ज्याचा उदरनिर्वाह या व्यवसायावर अंबलवून आहे, त्यांचे सगळं कोसळेल. तेव्हा डाॅल्बी चालू झालीच पाहिजे.

पिस्तुल लावून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे बंधू सुरेश थोरात यांच्याविरोधात गुन्हा दाखल ;

वेध माझा ऑनलाइन - अहमदनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे चुलत बंधू आणि काँग्रेस नेते सुरेश थोरात यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पिस्तुल लावून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी थोरात यांच्यासह 60 जणांवर गुन्हा दाखल. थोरात यांच्याविरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दुसरीकडे डॉ. चत्तर यांच्या स्वानंद चत्तर या भावाने काल दुपारी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात सोशल मीडियात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्यावरून सुरेश थोरात आणि इतर ग्रामस्थांनी संगमनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर रात्री उशिरा सुरेश थोरात यांसह इतर 60 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चत्तर यांनी थोरात यांच्यावर गुन्हा दाखल करताना मात्र सोशल मीडियात केलेल्या पोस्टचा उल्लेख टाळला आहे.

स्टेट बँक सोडून अन्य सर्व सरकारी बँका विकून टाका ; नरेंद्र मोदींच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य अरविंद पनगढ़िया यांचा सल्ला ; अर्थविश्वात भूकंप ;

वेध माझा ऑनलाइन - मोदी सरकार सरकारी बँकांचे खासगीकरण करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. याविरोधात बँक कर्मचाऱ्यांच्या संघटना वेळोवेळी संपाचे हत्यार उगारतात. असे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य आणि निती आयोगाचे माजी उपाध्यक्ष अरविंद पनगढ़िया यांनी दिलेल्या सल्ल्याने अर्थविश्वात भूकंप आला आहे अरविंद पनगढ़िया यांच्यासोबत संयुक्तपणे नॅशनल काउंसिल ऑफ अप्लायड इकोनोमिक रिसर्च चे महासंचालक पूनम गुप्ता यांचा एक पॉलिसी पेपर उघड झाला आहे. यामध्ये त्यांनी स्टेट बँक सोडून अन्य सर्व सरकारी बँका विकून टाकण्याचा सल्ला दिला आहे. यावर रिझर्व्ह बँकेने देखील प्रतिक्रिया दिली आहे. आरबीआयने आपले हात झटकले आहेत.

एसबीआयसोडून अन्य सर्व सरकारी बँका विकल्याने फायद्यापेक्षा जास्त नुकसानच होण्याची शक्यता आरबीआयने व्यक्त केली आहे. आरबीआयने याबाबत सावध भूमिका घेतली आहे. या प्रकरणात सावधगिरीने पुढे जाण्याचा सल्ला सरकारला देण्यात आला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या मोठ्या प्रमाणावर खाजगीकरणामुळे फायद्यापेक्षा तोटे अधिक असू शकतात, असे आरबीआयचे म्हणणे आहे
RBI च्या बुलेटिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात असे म्हटले आहे की खाजगी क्षेत्रातील बँका नफा वाढविण्याकडे अधिक लक्ष देतात. याउलट, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आर्थिक समावेशनाला चालना देण्यासाठी कामगिरी बजावली आहे. थेट लाभ हस्तांतरण ही केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची सर्वात यशस्वी योजना आहे. या योजनेंतर्गत नागरिकांना अनेक गोष्टींवर केंद्र सरकारकडून वेगवेगळ्या स्वरूपात अनुदान दिले जाते. त्याच्या यशाचे श्रेय सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनाच जाते.
खाजगीकरण ही नवीन संकल्पना नाही आणि त्याचे फायदे आणि तोटे सर्वांना माहीत आहेत. खाजगीकरण हा पारंपारिकपणे सर्व समस्यांवर मुख्य उपाय आहे, परंतू सावध दृष्टीकोण ठेवला जावा असे आर्थिक विचारसरणीला वाटत आहे. हे खासगीकरण आर्थिक समावेशन आणि आर्थिक प्रसारणाचे सामाजिक उद्दिष्ट 'शून्यावर' घेऊन जाऊ शकते, असे आरबीआयने म्हटले आहे.

आजचे सातारा जिल्ह्याचे कोरोना रिपोर्ट्स

वेध माझा ऑनलाईन - सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 13 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 1 जणांचा मृत्यू झाला आहे तर 22 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 4 कराड 0 खंडाळा 0 खटाव 3 कोरेगांव 0 माण 0 महाबळेश्वर 1 पाटण 0 फलटण 1 सातारा 2 वाई 1 व इतर 0
आणि नंतरचे वाढीव 1 असे  आज अखेर एकूण 13  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 22 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

Thursday, August 18, 2022

दहीहंडीदरम्यान गोविंदा जखमी झाल्यास शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार मिळणार - राज्यातील सर्व शासकीय, पालिका रुग्णालयांना सूचना...

वेध माझा ऑनलाइन - आज दहीहंडी असून  कार्यक्रमा दरम्यान कोणत्याही गोविंदास दुखापत झाल्यास शासकीय रुग्णालयांमध्ये त्यांना मोफत उपचार देण्यात यावेत अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानसभेत केली होती.
त्यानुसार राज्यातील सर्व  शासकीय दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये,  महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हापरिषदेचे दवाखाने यांना नि:शुल्क वैद्यकिय उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
यासंदर्भात काढण्यात आलेला शासन निर्णय हा स्थायी असून यावर्षी पासून दर वर्षासाठी लागू राहील

महाराष्टावर आता लोडशेडिंगचे संकट ; काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन - महाराष्ट्रासह 13 राज्यांवर आधीची देयकं न दिल्यामुळे लोडशेडिंगचं संकट उभं ठाकलं आहे. महाराष्ट्र, तामीळनाडू, तेलंगणा, मध्य प्रदेश, मिझोराम, झारखंड, बिहार, राजस्थान, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि छत्तीसगड या राज्यांना आधीची बिलं न भरल्यामुळे पॉवर एक्सचेंज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विजेची खरेदी आणि विक्री करता येणार नाही, अशी माहिती आहे.

विजेची खरेदी विक्री न करता आल्यामुळे विजेचा तुटवडा भासला जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय उर्जा मंत्रालयाने बिल न भरणाऱ्या डिसकॉम आणि जेनको यांच्याबाबत केलेल्या नियमांमुळे या राज्यांना विजेचा तुटवडा जाणवू शकतो. 19 ऑगस्टपासून उर्जा मंत्रालयाचा लेट पेमेंट सरचार्ज म्हणजेच एलपीएस नियम लागू होणार आहे. एलपीएस नियमानुसार डिसकॉमनी मागच्या 7 महिन्यांचे बिल जेनकोंना दिलं नाही तर त्यांना पॉवर एक्सचेंज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून वीज खरेदी अथवा विक्री करता येणार नाही. या नियमामुळे 13 राज्यांच्या डिसकॉमवर कारवाईची टांगती तलवार आहे. डिसकॉमकडून मोठ्या प्रमाणावर बिलं भरली न गेल्यामुळे निर्बंध घातले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.एक डझनपेक्षा जास्त राज्यांची बिलं अजूनही भरण्यात आलेली नाहीत, या 13 राज्यांचे जवळपास 5,085 कोटी रुपयांचं बिल देणं बाकी आहे.


शंभूराजे, बोलत असताना मधे बोलायचं नसतं; अजितदादांनी शंभूराज देसाईंना झापल ...

वेध माझा ऑनलाइन - शेतकऱ्यांना मानसिक आधार देण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात, असं सांगताना अजित पवारांनी २००३ मध्ये केलेल्या कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचं उदाहरण दिलं. मात्र, यावेळी अचानक मध्येच “आता भरपूर पाऊस झालाय” असं शंभूराज देसाई यांनी म्हणताच अजित पवार त्यांच्यावर चांगलेच संतापले. “शंभूराजे, आपण एकत्र काम केलं आहे. बोलत असताना मधे बोलायचं नसतं. पाऊस चांगला झाला म्हणताय. कोरडा दुष्काळ नाही, ओला दुष्काळ पडलाय. काय सांगताय पाऊस चांगला झाला? ओला दुष्काळच आहे ना? मी उदाहरण देत होतो. तुमच्याच मतदारसंघात पवनचक्क्या उभ्या केल्या. काहींनी सांगितलं की याची पाती मोठी आहेत म्हणून ढग अडले आहेत. काहीजण त्या तोडायलाही निघाले होते. लोकांना समजून घ्यायचं असतं. म्हणून मी म्हटलं दुष्काळाच्या काळात कृत्रिम पाऊस पाडायचा प्रयत्न झाला”, अशा शब्दांत अजित पवारांनी आपला संताप व्यक्त केला आणि शंभूराज देेेसाई याना चांगलंच झापल

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असून त्यात अतिवृष्टी आणि मदतनिधीच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी राज्य सरकारला धारेवर धरलं. तसेच, यावेळी सत्ताधारी पक्षातील मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर अजित पवार चांगलेच भडकले.

अजितदादा पुढे म्हणाले राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक भागांमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. काही ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एनडीआरएफच्या नियमांच्याही दुप्पट मदत जाहीर केल्याचा दावा केला आहे. मात्र, ही मदत तुटपुंजी असल्याची टीका विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत आज बोलताना केली. 
“राज्यात एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झाली की अनेक भागातल्या जमिनी पावसामुळे खरवडून गेल्या आहेत. तिथे एनडीआरएफचे नियम काहीही मदत करू शकत नाहीत. या जमिनींवर २-४ वर्ष तरी काही पिकणार नाही. काही ठिकाणी दुसऱ्याच्या जमिनीतला गाळ वाहून तिसऱ्याच्या जमिनीत गेला. सगळी पिकं अडचणीत आहेत. हे असताना तुम्ही घोषणा केली की एनडीआरएफच्या दुप्पट मदत जाहीर केली. पण ती मदत तुटपुंजी आहे. शेतकऱ्याचा सगळा खर्च प्रत्येक एकराला ११ ते साडेअकरा हजार खर्च येतो. पण तुम्ही हेक्टरी फक्त १३ हजार ६०० रुपये मदत जाहीर केली आहे. त्या शेतकऱ्यानं काय करावं?” असा सवाल अजित पवारांनी आपल्या भाषणात केला आहे.

आजचे सातारा जिल्ह्याचे कोरोना रिपोर्ट्स

वेध माझा ऑनलाइन - सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 14 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 0 जणांचा मृत्यू झाला आहे तर 15 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 3खंडाळा 0 खटाव 0 कोरेगांव 1 माण 0 महाबळेश्वर 0 पाटण 3 फलटण 0 सातारा 4 वाई 1 व इतर 1
आणि नंतरचे वाढीव 1 असे  आज अखेर एकूण 14  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 15 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

कायद्याचे पालन करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा ; कराडचे पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांचे आवाहन ;

वेध माझा ऑनलाइन - न्यायालयाच्या नियमांचे पालन करून सार्वजनिक गणेश मंडळांनी नियमावली बाबत माहिती घेवूनच गणेशोत्सव साजरा करायचा आहे अन्यथा पोलिसांची कारवाई होणार असल्याचा इशारा वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी आज शहरातील 
गणेशोत्सव मंडळांच्या आयोजित बैठकीत दिला.
गणेशोत्सव काळात कायदा, सुवव्यवस्था राखून पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न  करावा असेही आवाहन यावेळी पो नि पाटील यांनी केले

आज अरबन बँक शताब्दी हॉल येथे शहरातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळाची  बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्याधिकारी रमाकांत डाके, डीवायएसपी डाॅ. रणजित पाटील यांच्यासह गणेश मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कराड पालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस-भाजपने काढलेल्या रॅलीच्या शक्तीप्रदर्शनाने स्पष्ट केली कराडकरांची मानसीकता ? शहरात चर्चा...

वेध माझा ऑनलाइन - येथील पालिकेची निवडणूक थोड्याच दिवसांवर येऊन ठेपली आहे ही निवडणूक काँग्रेस व भाजप कडून पक्षीय स्तरावर लढली जाणार आहे तर काहीजण आघाडी म्हणून ही निवडणूक लढवतील असे चित्र असणार आहे मात्र जनतेला ही निवडणूक कशी हवी आहे याचाही कानोसा घेणे आता गरजेचे आहे शिवजयंती व 15 ऑगस्ट रोजी शहरात पार पडलेल्या रॅलीमधील गर्दीने भाजप - काँग्रेसमधेच या निवडणुकीतून प्रमुख लढत होईल की काय ? अशी शंका निर्माण केली आहे...त्याचेही कारण आहे...!

आजपर्यंत शहरात आघाडी चे राजकारण सुरू आहे मात्र याच तालुक्यातील मलकापूर असेल किंवा राज्यस्तरीय झालेले पदवीधर चे ईलेक्शन असेल या दोन्ही स्तरावर निवडणुकीत पक्षीय लेव्हलवर लोकांची मतदानासाठी पसंती दिसून आली आहे याचाच अर्थ ग्रामीण किंवा शहरी पदवीधर मतदार हा आता पक्षीय राजकारणाकडे आकर्षित होत असल्याचे यातून दिसून येतय
ग्रामपंचायत असो, पंचायत समिती नगरपरिषद जिल्हा परिषद असो अशा ठिकाणीदेखील सध्या हीच पद्धत पुढे होताना दिसत आहे...

कोणत्याही पक्षीय धोरणांमध्ये विचारधारेला महत्व असते... म्हणजेच प्रत्येक  राजकीय पक्ष आपल्या विचारधारेशी बांधील असतो... त्यामुळे लोकांना कोणती विचारधारा निवडायची आणि मतदान करायचे याचाही चॉईस असतो...
आघाडीच्या राजकारणामध्ये व्यक्ती सापेक्ष मूव्हमेंट होतात... त्यामध्ये व्यक्तीकडे बघून मतदान व्हावे अशी अपेक्षा असते... त्याच प्रकारचे राजकारण आजपर्यंत येथे होत गेले आहे मात्र गेल्या काही टर्म पासून याच ट्रेंड ला बदलण्याची मानसिकता लोकांची दिसते आहे याचाच परिणाम म्हणून थेट लोकांमधून लोकप्रतिनिधी निवडताना लोकांचा प्रतिसाद पक्षीय लेव्हलवर मिळताना दिसतोय... यामध्ये स्थानिक आघाडीला लोक पसंत करताना दिसत नाहीत... आघाडीच्या राजकारणात एका विशिष्ठ व्यक्तीचा विचार लादण्याचा काहीसा प्रकार अनेक ठिकाणी होताना दिसून येत असतो मात्र पक्षीय पातळीवर असे चालत नाही... तर पक्षीय विचार त्या व्यक्तींनी आपल्यात व समाजात रुजवावा लागतो असे होऊन जो लोकांना पटतो तो पक्ष निवडून येतो... अशी साधारण पद्धत असते

कराड शहराची मानसिकता पहायची झाल्यास शिवजयंती व 15 ऑगस्ट या दिवशी अनुक्रमे भाजप व काँग्रेस ची रॅली निघाली... त्यामधून या दोन्ही पक्षाचे शक्तिप्रदर्शन झाले... दोन्ही पक्षांना  जनतेचा हजारोच्या संख्येने प्रतिसाद मिळाला तर, दुसरीकडे 15 ऑगस्ट दिवशी इतर अनेक रॅली देखील झाल्या त्यातूनही निवडणुकीच्या तोंडावर शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्नही झाला...  मात्र या दोन पक्षांच्या तुलनेत त्यामधून लोकांची गर्दी तितकीशी दिसली नाही... म्हणजेच काँग्रेस व भाजप या दोन विचारधारेकडे लोकांनी आपापल्या चॉईस ने गर्दी केली, त्यातूनच पक्षीय लेव्हलवर येथील निवडणूक व्हावी हीच मानसीकता लोकांची होणाऱ्या पालिका निवडणुकीला आहे का? असा शहराला प्रश्न पडला आहे...
लोकांना सध्या निवडणुकीबरोबर नेत्यांकडून विश्वासही हवा आहे आघाडीच्या राजकारणात तो सध्यातरी दिसत नसल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत... म्हणजेच आज  एकमेकांना विरोध करणारे उद्या एकाच स्टेजवर एकमेकांसाठी मते मागताना दिसतात... एवढे  विचारशून्य राजकारण राज्यात अनेक ठिकाणी होताना दिसते... आणि  हेच लोकांना नको आहे... लोक आता शहाणे झाले आहेत... सोशल मीडियामुळे लोकांच्यात विचार जागृति निर्माण होऊन काय चांगले -वाईट लोकांना कळू लागलंय त्यामुळे विचारांशी बांधील राजकारणाची लोक अपेक्षा करत आहेत...आणि म्हणून पक्षीय पातळीवरील निवडणुकीचा पर्याय लोकांनी निवडला आहे ? अशी चर्चा आहे...त्यासाठी कराडात भाजप -काँग्रेसच्या निघालेल्या रॅलीतून  त्या - त्या विचारधारेच्या लोकांनी केलेल्या गर्दीने येथील पालिका निवडणुकीसाठी पक्षीय निवडणूक हवी असल्याचा मेसेज शहराला दिला आहे का ? असाही प्रश्न जाणकारांना पडला आहे...

Wednesday, August 17, 2022

विमानात प्रवाशांना पुन्हा मास्क सक्ती, नागरी हवाई वाहतूक संचालनालयानाचे निर्देश...


वेध माझा ऑनलाइन - कोरोनाची वाढता रुग्णसंख्या पाहता मास्क बंधनकारक असण्याचा नियम विमानतळावरील, तसेच विमानातील सर्व कर्मचारी, प्रवासी यांच्यासाठी लागू असेल.
 देशात कोरोनाची साथ वाढत असल्यामुळे केंद्र सरकारने आता विमानतळावर व विमानांमध्ये प्रवासी व कर्मचाऱ्यांना मास्क घालणे बंधनकारक केले आहे. यासंदर्भात नागरी हवाई वाहतूक संचालनालयाने आदेश दिले आहेत 
मास्क बंधनकारक असण्याचा नियम विमानतळावरील, तसेच विमानातील सर्व कर्मचारी, प्रवासी यांच्यासाठी लागू असेल. हा नियम पायलट, हवाई सुंदरी, फ्लाईट अटेंडंट यांनाही लागू आहे.
 
दिल्ली, पंजाबमध्येही मास्कसक्ती
 राजधानी दिल्ली,  पंजाबमध्येही मास्कसक्ती करण्यात आली आहे. दैनंदिन कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. प्रशासनाने कोरोना नियमावली जारी केली आहे. त्यामध्ये मास्क अनिवार्य करण्यात आला आहे.  सर्व शैक्षणिक संस्था, सरकारी आणि खासगी कार्यालय तसेच इनडोअर आणि आउटडोअर बैठक, मॉल आणि सर्व सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.  कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता  मोठ्या समारंभाचं आयोजन करु नका, गर्दी टाळा असे आवाहन करण्यात आले आहे.