Monday, August 8, 2022

सध्या कोयना धरणात 68. 90 टीएमसी इतका पाणीसाठा...सातारा जिल्ह्याला दिला रेड अलर्ट...

वेध माझा ऑनलाइन - गेल्या काही दिवसापासून गायब झालेल्या पावसाने पुन्हा कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मूसळधार सुरूवात केली आहे. सातारा जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे. सध्या धरणात 17 हजार 52 क्यूसेक आवक सूरू आहे. धरणात गेल्या चोवीस तासात 2. 21 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. पुढील दोन दिवस घाट परिसरात मूसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तावली आहे. दरम्यान सध्या कोयना धरणात 68. 90 टीएमसी इतका पाणीसाठा आहे सातारा, पुणे जिल्ह्याला हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे

कोयना नवजा परिसरात 207 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना येथे 92 मि. मी तर नवजा येथे 115 मि. मी पावसाची नोंद झाली आहे. तर महाबळेश्वरला 130 मिलिमीटर पाऊस नोंदला गेला आहे..सध्या कोयना धरणात 68. 90 टीएमसी पाणीसाठा असून धरण 65. 46% टक्के भरले आहे. धरणातील आवक ही वाढली झाली असून सध्या 17 हजार 52 क्युसेक आवक सुरू आहे. 

No comments:

Post a Comment