Friday, August 5, 2022

सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना स्मृतिदिनी मान्यवरांकडून अभिवादन

वेध माझा ऑनलाईन - कृष्णाकाठच्या सहकार, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विकासाचे प्रणेते आणि कृष्णा उद्योग समूहाचे शिल्पकार सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पा) यांच्या ९ व्या स्मृतिदिनी त्यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केले. य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, माजी चेअरमन मदनराव मोहिते, श्री. पृथ्वीराज भोसले, कृष्णा महिला औद्योगिक संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तरा भोसले, कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले, सौ. गौरवी भोसले, श्री. विनायक भोसले, सिद्धार्थ घाटगे यांच्यासमवेत कराड व वाळवा तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कृष्णा हॉस्पिटलच्या प्रांगणातील आप्पासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी सहकार व ज्येष्ठ नागरिक चळवळीचे नेते अरुण रोडे, ज्येष्ठ नेते डॉ. अशोक गुजर, कराडच्या नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते सौरभ पाटील, धनलक्ष्मी पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीप चव्हाण, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त जयवंतराव जगताप, शिवाजीराव थोरात, माजी आमदार आनंदराव पाटील, कृष्णा कारखान्याचे संचालक श्रीरंग देसाई, सयाजी यादव, अविनाश खरात, जे. डी. मोरे, दयानंद पाटील, बाजीराव निकम, निवासराव थोरात, बाबासाहेब शिंदे, जितेंद्र पाटील, धोंडिराम जाधव, क़ृष्णा कृषी विकास परिषदेचे अध्यक्ष शेतीमित्र अशोकराव थोरात, माजी संचालक सुजीत मोरे, ब्रम्हानंद पाटील, सर्जेराव पाटील, कृष्णा सहकारी बँकेचे संचालक रणजीत लाड, नारायण शिंगाडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष धनंजय पाटील, रेठरे बुद्रुकच्या सरपंच सौ. सुवर्णा कापूरकर, पैलवान आनंदराव मोहिते, प्रमोद पाटील, दिपक जाधव, शशिकांत जाधव, सचिन साळुंखे, उद्योगपती रवींद्र जाधव, मलकापूरचे माजी नगरसेवक हणमंतराव जाधव, बाळासाहेब घाडगे, इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष पैलवान भगवानराव पाटील, जयवंतराव साळुंखे, माणिकराव पाटील, पैलवान दादासो थोरात, मोहनराव जाधव, आनंदराव जमाले, डॉ. सारिका गावडे, महानंद डेअरीचे अध्यक्ष विनायकराव पाटील, कुबेर माने, राहुल पाटील, धनाजी जाधव, मोहनराव जाधव, राजू मुल्ला, अमित चव्हाण, बाजार समितीचे माजी सभापती सुनील पाटील, प्रदीप पाटील, विक्रमसिंह मोहिते, आबा गावडे, दादा शिंगण, डॉ. राजेंद्र पाटील, सौ. अश्विनी शेटे, उमेश शिंदे, आर. डी. स्वामी, सुभाष शहा, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब निकम, अधिकराव निकम, शेणोलीचे सरपंच जयवंत कणसे, उपसरपंच अमोल पाटील, जयरामस्वामी मठाचे मठाधिपती विठ्ठल महाराज, जयंत बेडेकर, अख्तर आंबेकरी, विनायक पावसकर, प्रदीप थोरात, माजी सरपंच बबन दमामे, एम. के. कापूरकर आदींसह मान्यवर उपस्थित होते.


No comments:

Post a Comment