Sunday, August 7, 2022

जयंत बेडेकरांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद ; आ बाळासाहेब पाटील यांचे गौरवोद्गार

वेध माझा ऑनलाइन - सोमवार पेठेतील सामाजिक कार्यकर्ते जयंत बेडेकर यांनी कोरोना काळात केलेलं काम हे खूप मोठंआहे कोरोनामुळे ज्यावेळी येथील मृत्युदर अधिक होता त्यावेळी लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते  अशा काळात बेडेकर यांनी लोकांसाठी  अक्षरशः रस्त्यावर उतरून काम केले आणि हे खरोखरच कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार आ बाळासाहेब पाटील यांनी आज येथे  काढले 


सामाजिक कार्यकर्ते जयंत बेडेकर यांचा वाढदिवस येथील कृष्णबाई कार्यालयात आज त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने साजरा करण्यात आला त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आ बाळासाहेब पाटील बोलत होते

यावेळी लोकशाही आघाडीचे नेते सुभाषकाका पाटील माजी नगराध्यक्ष विद्याराणी साळुंखे माजी नगरसेवक बाळासाहेब उमराणी, विलास कुंभार
 अर्बन बँकेचे संचालक विठ्ठल शिखरे गटनेते सौरभ पाटील आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती
आ बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले कोविड असो किंवा मागील शहरातील निर्माण झालेली पूरस्थिती असो या दोन्ही वेळी बेडेकर यांनी केललं काम हे शहरातील लोकांसाठी मोठेच होते जिल्ह्यात सर्वप्रथम ऑक्सिजन मशीन कराडमध्ये आणल्या गेल्या त्यानंतर या विषयी जिल्ह्यात प्रसार झाला त्याबाबतही बेडेकर यांचे कराडमधील कार्य वाखाणण्याजोगेच होते त्यांच्या पुढील सामाजिक कार्यास मी शुभेच्छा देतो त्यांच्याकडून अधिकाधिक समाज कार्य होवो अशी सदिच्छा व्यक्त करतो अशा शब्दात आ बाळासाहेब पाटील यांनी शुभेछ्या देत बेडेकर यांचे यावेळी अभिनंदनही केले

सत्काराला उत्तर देताना जयंत बेडेकर म्हणाले लोकांचे आशीर्वाद व प्रशासनाने केलेले सहकार्य यामुळे समाजात कार्य करणे शक्य झाले असेच माझे कार्य याहीपुढे अखंड चालू राहणारच आहे आपल्या सर्वांचे आशीर्वाद कायमच पाठीशी राहुद्या

दरम्यान यावेळी जयंत बेडेकर त्यांच्या पत्नी सौ बेडेकर यांनी त्यांचे औक्षण केले तसेच श्री व सौ बेडेकर यांच्या हस्ते यावेळी केक कापण्यात आला आमदार बाळासाहेब पाटील यांनी बेडेकर याना केक भरवत पुन्हा त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या 
शहरातील अनेक आजी माजी नगरसेवकानी व विविध  क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या

No comments:

Post a Comment